Wednesday, February 11, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…

Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. मग काहीतरी क्लृप्ती लढविली जाते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या प्रकारची अळुवडी, फ्राय इडली अन् गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात.

  • अळूवडी गुंडाळून करणे खूप जणांना जमत नाही. अशी वडी करायला वेळही लागतो. यासाठी सोपी आणि झटपट रीत म्हणजे अळूची पाने मिक्सरमध्ये आवश्यक तेवढ्या चिंचेच्या कोळात वाटणे आणि या मिश्रणात नेहमीप्रमाणे बेसन, तिखट, गूळ वगैरे घालून कोथिंबीर वडीप्रमाणे वडीचा रोल करून वाफवून तळणे. चिंचेच्या कोळात वाटण्याचे कारण असे की, पाणी जास्त वापरले जाऊन मिश्रण सैल होऊ नये. चुकून मिश्रण सैल झालेच, तर एका पसरट भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण थापून कुकरमध्ये वाफवणे व नंतर कापून तळणे. या वड्या चवीला अप्रतिम लागतातच, पण दिसायलाही हिरव्यागार दिसतात. कशाच्या केल्या आहेत हे ओळखताही येत नाहीत. विशेष म्हणजे, अशा वड्यासाठी भाजीचा अळूही वापरता येतो.
  • लसूण जर जास्ती हवा असल्यास त्याच्या पाकळ्या तव्यात थोड्या परताव्यात. त्यामुळे साली पटकन निघतात आणि वेळही वाचतो.

हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…

  • केक, पुडिंग, खीर इत्यादी पदार्थ शिजवताना आपण खाण्याचे रंग वापरतो; पण हे रंग काही वेळेस तब्येतीस अपायकारक ठरू शकतात. अशावेळी हे करून पाहा – केशर दुधात चुरून केशरी / पिवळा रंग करा. हिरवा रंग करण्यासाठी (पुलावसाठी) पालकाच्या पानांच्या रसात भात शिजवा. गुलाबी / लाल रंगासाठी (मिल्कशेक, आइस्क्रीम, दूध इत्यादीसाठी) बीट घ्या. साल काढा. किसा आणि कीस खडखडीत वाळवा. त्यांची मिक्सरमध्ये पूड करा आणि रंगाऐवजी ते वापरा. केशरी / पिवळा रंग वरीलप्रकारे गाजरे किसून वाळवून आणि पूड करून वापरा. पुदिन्याची पाने या प्रकारे करून हिरवा रंग बनवा.
  • नेहमीप्रमाणे इडलीचे पीठ करून ठेवावे. इडली फ्राय सर्वांनाच खूप आवडतात. पण त्याला तेल खूपच लागते. त्यासाठी पर्याय म्हणून कढईत अर्धा ते पाऊण चमचा तेल घालावे. त्यात सात-आठ मोहरीचे दाणे घालावेत. ते तडतडल्यावर इडलीचे पीठ एक डावभर घालावे आणि झाकून ठेवावे. चार-पाच मिनिटांनी खालून खरपूस लाल झाल्यावर परतावे आणि दोन ते तीन मिनिटांनी काढावे. एकदम खमंग इडली फ्राय होतात. सुरुवातीला जरा वेळ लागतो. पण एकदा कढई तापली की, भराभर सुटून येतात. अजिबात चिकटत नाहीत. ‘निर्लेप’ कढई असेल तर अगदी थोडे तेल लागते. मोहरीचा स्वादही खमंग येतो.
  • पातळ पोह्यांचा चिवडा करून झाल्यानंतर लगेचच कढई गरम असताना कढईत कडेने दोन चमचे तूप सोडा. तुपाचा स्वाद आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहणे, या दोन्हींचा फायदा होतो.

हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे!

  • आपण नेहमी कांदा, बटाटा, केळी, मिरची यांची भजी करतो. गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी करून बघा. ज्यांना डाळीचे पीठ सोसत नाही, पोटात वात धरतो, त्यांनी गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी करावी. ही अजिबात बाधत नाही. वृद्ध माणसांसाठी तर फारच चांगली. ही भजी फारच चांगली फुगतात आणि कुरकुरीत होतात. पाने भज्यासकट चावून खावीत म्हणजे डाळीचे पीठ बाधत नाही. ही पाने औषधी आहेत.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!