Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 23 भाद्रपद शके 1947; तिथि : अष्टमी 27:05; नक्षत्र : रोहिणी 08:40 योग : वज्र 07:34, सिद्धी 28:54; करण : बालव 16:02 सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ 20:03; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:42 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अष्टमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा… दिनविशेष अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर टीम अवांतर मराठी नाट्य तसेच हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते डॉ.…
डॉ. प्रिया गुमास्ते (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टन्ट) आनंद आणि उत्साहात पार पडलेल्या वसंत ऋतूतील महिन्यांनंतर हळूहळू ऊन जाणवू लागते आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो. महिने : ज्येष्ठ आणि आषाढ (Mid May – Mid July) ऋतुवर्णन तीक्ष्णांशुरतितीक्ष्णांशुर्ग्रीष्मे सङ्क्षिपतीव यत् ॥26॥ प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते । ग्रीष्मात (उन्हाळ्यात) सूर्यकिरण शक्तिशाली (तीक्ष्णांशु) होतात. नदीकाठ सुकतात आणि वनस्पती निर्जीव दिसू लागतात. या ऋतूत व्यक्तीची शक्ती कमी होते. पाचक अग्नि सौम्य स्थितीत असतो. सूर्य अताशी पुष्पासारखा लाल दिसतो आणि पाण्याचा साठा आटत जातो. झाडाची पाने गळून पडतात आणि आजूबाजूला हिरवळ नसते. सर्व सजीव प्राणी त्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या स्रोतांचा शोध घेतात. हेही वाचा…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची आहे, ही प्राथमिक बाब समजून घेतली. मनात आरोग्याची इच्छा असेल तर, मार्ग नक्कीच सापडतो, ही बाब देखील आपण लक्षात घेतली. पण प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, निरामय आरोग्य प्राप्तीची नुसती इच्छा पुरेशी नाही तर, त्यासाठी आणखीन एक मुलभूत बाब आवश्यक आहे… आणि ती म्हणजे स्वतःसाठी पर्यायाने आरोग्यासाठी वेळ काढणे आणि हाच या लेखाचा विषय आहे. वेळेची उपलब्धता आपल्या सर्वांनाच, आपल्यातील प्रत्येकाला एका दिवसाचे 24 तास उपलब्ध आहेत. आता या उपलब्ध वेळेचा विनियोग करण्याचे प्रत्येकाचे गणित वेगवेगळे असते. हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी…
आराधना जोशी सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितरांसाठी करावयाचे विधी कृष्ण पक्षात आणि विशेषत: अमावस्येला करतात. कारण, माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस आणि एक रात्र (माणसाचा कृष्ण पक्ष म्हणजे त्यांचा दिवस आणि शुक्लपक्ष म्हणजे रात्र), असे मानले जाते. विशेषत:, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. यानिमित्ताने अन्नदान केले जाते आणि यासाठी विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ केले जातात. त्यापैकीच एक आमसुलाची चटणी. त्याची रेसिपी पाहूया. साहित्य आमसुले (कोकम) – 10 ते 12 जिरं – 1 टीस्पून मिरी – 2 ते 3 दाणे गूळ – साधारणपणे 1 वाटी मीठ – चवीनुसार आलं -…
शशी सामंत मुंबईचा माणूस कधी स्वस्थ बसत नाही. मी सुद्धा तसाच! कामाशिवाय इतर गोष्टी करायला वेळच पुरत नसतो. क्रिकेट, सिनेमाची आवड हळूहळू कमी होत गेली आणि दोनेक वर्षांपूर्वी मोकळा वेळ मिळत गेला, तो फक्त मी गंभीर आजारी झाल्यावरच! सोबतीला कोरोनाची साथ पिच्छा सोडत नव्हती. औषधे, गोळ्या घेणे आणि घरातच जखडून बसणे, याशिवाय वेगळा कार्यक्रमच नव्हता. टीव्हीवरच्या पाणीदार कार्यक्रमाची आवड मुळातच नव्हती. शरीराला हालचाल नव्हती, निदान डोक्याला तरी काम मिळावं म्हणून लिहायला सुरुवात केली. आठवेल ते पण क्रमवार लिहित गेलो. आयुष्यभर कधी टायपिंग केलं नव्हतं, पण तेही प्रयत्नाने आत्मसात केले. वाचनाची आवड जुनीच. मराठी-इंग्लिशमधली पुष्कळशी आत्मचरित्रे वाचून झाली होती. पण…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा सांगे सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥361॥ देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥362॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥363॥ जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥ पार्था नवल हें पाहीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 22 भाद्रपद शके 1947; तिथि : षष्ठी 07:23, सप्तमी 29.04; नक्षत्र : कृत्तिका 10:10 योग : हर्षण 10:31; करण : विष्टी 18:11 सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:43 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सप्तमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. व्यवसायात किरकोळ समस्या येऊ शकतात, ज्यामुळे चिंता वाढतील. मात्र प्रयत्नांनी कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभही…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण काही ingredients तसेच काही trends बद्दल माहिती घेतली. आता या लेखात आपण Sunscreen बद्दल माहिती आणि काही tips बघू. आपण आपल्या रोजच्या skin care routine मध्ये Sunscreen चा उल्लेख केला आहे. सूर्याचे UVB आणि UVA rays हे त्वचेसाठी हानीकारक आहेत. UVA Rays हे UVB Rays च्या तुलनेत जास्त हानीकारक असतात, ते त्वचेत खोलवर जाऊन नुकसान करतात. ज्यामुळे त्वचेला Pre-mature aging, Pigmentation, Sun burn इत्यादी समस्यांना तोंड द्यायला लागू शकते. म्हणूनच Sunscreen चा वापर हा अनिवार्य आहे. Sunscreen उत्पादनांवर SPF असे लिहिलेले असते, त्याचा अर्थ आहे. ‘Sun Protection Factor’. सामान्यतः SPF ची ताकद ही नंबरमध्ये…
प्रणाली वैद्य भाग – 4 शौनकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाटील झोपायला निघून गेले… मुलांनी तर मस्त कॅम्प फायर सुरू केलं… गाणी काय, डान्स काय, जोक काय मस्त धुडगूस चालला होता… गप्पांना तर ऊत आला होता…! इतक्यात कोणीतरी सकाळचा विषय छेडला आणि वातावरण एकदम पालटलं… पार्टी, पिकनिक मूडमध्ये असलेली मंडळी एकदम शांत झाली. मुलींमधून कोणी तरी ओरडलेच नको ना आता तो विषय! पण विषय संपला कुठे होता… भविष्य काय असेल कोणालाच ठाऊक नव्हते… आता किती प्रयत्न केले तरी,, वातावरण पहिल्यासारखे होत नव्हते… एक विचित्रसा दबदबा निर्माण झाला होता… कोणी विषय काढला? सगळे एकमेकांकडे पहायला लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह सारखेच होते… “कसले…
माधवी जोशी माहुलकर गौराक्का डोक्यावर देवीचा टाक असलेली पाटी घेऊन भर ऊन्हात झपझप चालत घराकडे निघाली होती, कपाळावरचा मळवट घामाने ओला झाला होता… त्याचे ओघळ तिच्या चेहऱ्यावर उतरत होते…. मधूनच ती ते ओघळ आपल्या हिरव्या साडीच्या पदराने पुसत होती… घर अजून बरंच लांब होतं, आज ऊन जरा जास्तच तापलं होत. तिला तहान लागली होती… डोक्यावरची देवीची पाटीपण जड होत होती. चालता चालता तिला रस्त्यात शाळा दिसली तशी ती थबकली, जावं का आतमध्ये? थोडं पाणी मागावं का तिथे? असा विचार ती करत होती. शाळेसमोरच्या पिंपळाच्या पारावर तिने डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि घामाने डबडबलेला चेहरा पुसला… ती पाणी मागण्यासाठी शाळेच्या दिशेने…

