Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
शोभा भडके भाग – 2 “ए नकटेSS… उठ… घर आलं,” पवनने तिला आवाज दिला. राम आणि त्याने गाडीतून सामान खाली घेतलं. आरू आळस देत खाली उतरली आणि त्या दोघांच्या पाठोपाठ गेली. दारातच आत्या उभी होती. आत्याला पाहून आरूने पुढे होऊन पाया पडली, त्यावर ‘सुखी राहा’, असा आशीर्वाद देत आत्याने तिच्या गालावरून हात फिरवून, बोटे मोडून तिची दृष्ट काढली. “कसा झाला प्रवास?” आत आल्यावर आत्याने त्या दोघांना विचारलं. “छान झाला…” दोघांनी सोबतच सांगितलं. “बरं… थकला असाल तर जाऊन फ्रेश होऊन या, मी चहा टाकते दोघांसाठी.” “मला आत्ता नको आत्या… मी थोडावेळ झोपतो, प्रवासात नीट झोप झाली नाही,” राम म्हणाला. “बरं. तू…
माधवी जोशी माहुलकर खरंतर शेगाव कचोरीचे सारण हे इतर कचोऱ्यापेक्षा (जसे मूगडाळ कचोरी, प्याज कचोरी, मटर कचोरी) वेगळे असते. शेगावच्या तीरथराम शर्मांची जी कचोरी आहे, तिची बातच निराळी! त्यांचे जे वंशज आहेत भूपेश शर्मा त्यांच्याकडे रोजच्या सुमारे अडीच हजार कचोऱ्या तयार होतात… 20 किलो मैदा याकरिता वापरला जातो. काय खप असेल नाही या कचोरीचा!! तीरथराम शर्मांच्या या कचोरीच्या सारणात आणि मसाल्यात ते वारंवार बदल करत असतात; परंतु ते नेमके काय असतात, त्याबाबत शर्मा बंधू किंवा त्यांचे कामगार याबाबतीत ताकास तूर लागू देत नाही. आता मला माहीत असलेल्या शेगाव कचोरीची रेसीपी देते… साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्ज्याद् योगमात्मविशुद्धये ॥12॥ मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥186॥ तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्विकें भरे । जंव कठिणपण विरे । अहंभावाचें ॥187॥ विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥188॥ ऐसें ऐक्य हें सहजें । फावे तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥189॥ आतां आंगाते आंग करी । पवनातें पवनुचि वरी । ऐसी…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी! दिनविशेष ख्यातनाम चित्रकार बाबूराव सडवेलकर टीम अवांतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बाबूराव नारायण सडवेलकर यांचा जन्म 28 जून 1928 रोजी वेंगुर्ले (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये तर, महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली आणि त्याच प्रेरणेने त्यांनी 1950 साली मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1952 मध्ये रंग आणि रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका त्यांनी संपादन केली. त्यानंतर 1953 ते 1971 या काळात त्यांनी सर…
हर्षा गुप्ते आवळा हे अतिशय गुणकारी फळ मानले जाते. आवळ्यात पाणी (81%), प्रथिने (0.5%), स्निग्ध पदार्थ (0.1%), क्षार (0.5%), कर्बोदके (13-14%) आणि तंतू असतात. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. तसेच त्यामध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिकादाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा आणि बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ तयार करतात. या आवळ्यापासून त्यापासून लोणचे, मुरांबा (मोरावळा), सुपारी इत्यादी पदार्थ करतात. आपण आज आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत. एकूण कालावधी – अर्धा तास साहित्य हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट…
विवेक वैद्य दवाखान्यात गर्दी नसली की (ती कधी असते म्हणा!) मी जवळच असलेल्या मन्नूभाईच्या किराणा दुकानात गप्पा मारायला जातो. समोरच फ्लायओव्हर आहे. आम्ही पुलाखालचे व्यावसायिक… त्यामुळे लिमिटेड धंदा असणारे! पुढे पूल खाली उतरतो तिथे जागा असते, आडोसा असतो तिथे काही टपऱ्या आहेत… पान, चहा वगैरे. रात्री तिथे 1-2 भिकारी झोपतात. त्यातला एक वयस्कर किंचित स्थूल म्हातारा मन्नूभाईकडे किरकोळ माल घ्यायला येतो म्हणून मी ओळखतो. तर त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होतो. थंडीचे दिवस होते. तो म्हातारा दुकानात आला. त्याच्याकडे एक नवेकोरे ब्लँकेट होते. “हे विकायचे आहे.” मी आणि मन्नूभाईने ब्लँकेट बघितले, खरोखच ते उत्तम होते… ऊबदार. बहुदा कोणीतरी दानशूर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जेथ अमृताचेनि पाडें । मुळेंहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥173॥ पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें । निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ॥174॥ हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंद झुळके ॥175॥ बहुतकरूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥176॥ पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि संधी दोन्ही घेऊन येईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती होईल. कामावर तुमची कामगिरी लक्षात घेतली जाईल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये मोकळेपणाने राहणे महत्त्वाचे आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वृषभ – काम थोडे संथ गतीने चालेल, पण तुमचा संयम तुमची ताकद बनेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबात शांततेचे आणि खेळीमेळीचे वातावरण असेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. एखादी मोठी खरेदी करायची इच्छा होईल पण बजेटनुसार निर्णय घ्या. मिथुन – तुमचे संवाद कौशल्य विशेषत्वाने बहरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचा आदर केला जाईल.…
नितीन फलटणकर (भाग – 1) प्रसंग 1 स्टेजवर लख्ख प्रकाश…. खोलीत पसारा पडलेला…. बेडवरील चादर आर्धी खाली लोळतेय तर अर्धी बेडवर… पंखा सुरू… टीव्हीही सुरू…. पण तिथे मात्र कोणीच नाही… तितक्यात बाहेरून केतन आणि त्याचा मुलगा किरण दोघांचाही प्रवेश… केतन : हातपाय धुवून घे… कपडे बदल मी जेवायला वाढतो. किरण : नको मला… भूक नाही. मी डबा खाल्लाय शाळेत. केतन : रहा उपाशी… (किरण धावत आत जातो… ताटात भाजी-पोळी वाढून घेतो. पटापट खायला लागतो.) किरण : तू रागावू नको ना बाबा…! केतन : मी रागोवलेलो नाही. पण तुला एंटरटेन करायला मला मुळीच वेळ नाही. पटकन खा. काही हवं का सांग,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥11॥ तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥163॥ जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥164॥ जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥ अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसीं रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥ जया आड जातां…

