Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सूर्याचें आसन मोडलें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सूर्याचें आसन मोडलें…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 25, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय सहावा

    जो मुळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥ क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥215॥ मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥ भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥217।। धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥ नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ॥219॥ व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥220॥  तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीये ॥221॥ नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥222।। तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥223॥ विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥224॥ तैसी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ॥225॥ तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरुढलें । अंकुरेंशीं ॥226॥ तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥227॥ सहजें बहुतां दिवसांची भूक । वरि चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥228॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एकाग्र अंतःकरण, करूनि सद्गुरुस्मरण…

    अर्थ

    जो अपानवायू मूळबंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. ॥214॥ खवळून तो अपानवायू माजतो आणि पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो आणि तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. ॥215॥ मग ती अपानवायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणीची पोटातील कुजकी घाण बाहेर काढते. ॥216॥ त्या अपानवायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे, तो मग कोठ्यात प्रवेश करतो आणि तेथे असलेले कफ आणि पित यांचा थारा राहू देत नाही. ॥217॥ सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो आणि हाडामधील मज्जा बाहेर काढतो. ॥218॥ नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. परंतु त्याने भिऊ नये. ॥219॥ (तो) रोगांना दाखवतो; परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो, आणि शरीरात जे पृथ्वीचे तसेच पाण्याचे अंश आहेत, ते एकात एक कालवतो. ॥220॥ अर्जुना, (कोंडलेला अपानवायू असे प्रकार करतो तो) दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. ॥221॥ केशराने न्हालेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन निजावे ॥222॥ त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते. ॥223॥ ती नागीण जशी मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी, किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणूकाय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, ॥224॥ याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली आणि नाभीजवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते. ॥225॥ त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा ॥226॥ त्याप्रमाणे वेढ्याला सोडीत असलेली आणि लीलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. ॥227॥ आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते आणि तशात तिला डिवचल्याचे निमित्त होते. मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते. ॥228॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसी शरीराबाहेरलीकडे, अभ्यासाची पाखर पडे…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे

    August 18, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    By Team AvaantarAugust 19, 2026

    अध्याय तेरावा आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तैं सरों नेणें रससोये…

    सार्थ ज्ञानेश्वरी : ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे

    August 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…

    August 18, 2026

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 400
    • अवांतर 205
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 540
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 249
    • मैत्रीण 24
    • ललित 859
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.