Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
शोभा भडके भाग – 5 आज आरूचं (आराधना) कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचंय होतं, त्यामुळे ती राम आणि भावनासोबत ‘प्रमोदिनी फॅशन डिझायनर कॉलेज’मध्ये आली होती. रामने सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण केल्या… तोवर भावना आणि ती कॉलेज पाहात होत्या. “चला, झालं काम निघूया आपण आता…” राम त्यांच्याजवळ येत म्हणाला. “दादा, झालं एडमिशन माझं! कधीपासून यायचं कॉलेजला?” आरुने उत्सुकतेने विचारलं… तिचा आनंद ओसंडून वाहात होता. त्यासाठी कितीतरी गोड गोड बोलावं लागलं होतं… सकाळी लवकर उठून कामात मदत करायला लागली होती… चुलीवर भाकरी केल्या होत्या… एवढंच काय तर, शेतात भाऊ आणि दादाला पण मदत केली होती! उद्देश काय तर, एकच, आई आणि भाऊची मर्जी मिळवायची होती……
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥31॥ जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥398॥ कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥399॥ ना तरी वृक्षाचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥400॥ तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा देणारे श्याम बेनेगल टीम अवांतर ख्यातनाम भारतीय दिग्दर्शक आणि पटकथाकार श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद मध्ये त्रिमुलागिरी येथे झाला. श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती आणि त्यांच्या या छंदाला कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले. बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पदवी मिळवल्यानंतर ते मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. 1962मध्ये त्यांनी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥387 ॥ तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥388॥ तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥389॥ ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥390॥ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥29॥ यो मां पश्यति…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – विचारपूर्वक गुंतवणूक करा, पुढील काळात चांगला लाभ होऊ शकतो. आज मान्यवर संस्थेकडून सन्मान मिळू शकतो. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायात फायदेशीर ठरेल. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, नवीन मित्र देखील बनवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळू शकेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वृषभ – दिवसभर व्यग्र राहाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सासरच्यांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. महत्त्वाच्या वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग कराल. चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक कराल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित रहाल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – दिवस खर्चिक असेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात विरोध होईल, त्यामुळे सावध रहा.…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. येत्या 19 डिसेंबर 2025 ला माझा सिनेमा रीलीज होतोय, ‘आशा’… आशा रुग्णसेविकांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा खूप छान झालाय. त्याचा प्रत्यय पण आलाय. हा चित्रपट महाराष्ट्र राज्य पुरस्काराचा मानकरी ठरलाय, तेही चार पुरस्कारांचा… उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री! देश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने धम्माल उडवली. थिएटरमध्ये जाऊन बघा बरं हा सिनेमा सगळ्यांनी! Enjoy करा… तर, तुम्ही ओळखलं असेलच की, आजचा लेख ‘आशा’ सिनेमाशी जोडलेला आहे. भर नवरात्रीमध्ये जळगाव-धुळ्यामध्ये आम्ही सिनेमाच शूटिंग करत होतो. रिंकू राजगुरू, खरंतर फार लहान वयात उगवलेली चांदणी (स्टार). बरेचदा अशी…
आराधना जोशी साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 20 मिनिटे हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त हेही वाचा – Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
पराग गोडबोले आज पुण्याची फेरी होती, ऑफिसच्या कामासाठी… मागच्या वेळी घाटात बराच वेळ अडकलो होतो, त्यामुळे या वेळी विषाची परीक्षा नको परत, म्हणून आधीच ट्रेनचं तिकीट काढून ठेवलं! इंद्रायणी नेहेमीप्रमाणे दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे त्या गाडीचा योग नव्हताच नशिबात… मग लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम, अशा लांबच्या गाडीचं मिळालं तिकीट. गाडी सकाळी साडेसात वाजता कल्याण, साडेदहाला पुण्यात! ऐसपैस बसून जाण्यासाठी मस्त AC 3T चं तिकीट काढलं. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या कुर्सीयानात बसून, अवघडलेला प्रवास करण्यापेक्षा हे खूप छान… किमतीनं हे तिकीट जास्त पडतं, पण प्रवास आरामाचा आणि सुखाचा होतो! साडेसातची गाडी पकडायला, बायकोच्या धोशामुळे साडेसहालाच घरून निघालो. जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास संपवून, स्टेशनवर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥25॥ यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥26॥ बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥378॥ याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥379॥ आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला – । बाहेरा नोहे ॥380॥ जरी…

