Author: Team Avaantar

आराधना जोशी पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : विड्याची पाने धुवून‌ पूर्णपणे वाळायला – 45 मिनिटे प्रत्यक्ष कृतीसाठी – 10 मिनिटे एकूण वेळ : 55 मिनिटे साहित्य मध्यम आकाराची विड्याची पाने – साधारणपणे 35 (पाने आकाराने लहान असतील तर, 40 घेतली तरी चालतील) चुना – पाव टीस्पून काथ पावडर – पाव टीस्पून कच्ची बडीशेप – 4 टेबलस्पून कातरलेली सुपारी – 2 टेबलस्पून (इथे मसाला सुपारी वापरली तरी चालेल) खोबऱ्याचा किस – अर्धी वाटी लवंग – 5 ते 7 हिरवी वेलची – 5 ते 7 ओवा – अर्धा टेबलस्पून ज्येष्ठमध पावडर – 1 टेबलस्पून खडीसाखर – दीड टेबलस्पून…

Read More

माधवी जोशी माहुलकर भाग – 1 चंद्रपुरला असतांना 1995 साली आम्ही पहिल्यांदा ताडोबा या जंगलात गेलो होतो. तो माझा पहिला जंगल सफारीचा अनुभव असल्यामुळे त्याबद्दल खूप उत्सुकता होती. त्यावेळेस आजच्यासारखे जंगल सफारीचे खूप कडक नियम नव्हते. गेट पास काढला की, आपण आपल्या वाहनाने जंगल फिरू शकत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा हे जंगल बघितले त्याच क्षणी ते माझ्या मनात ठसले. पुढे अनेकवेळा मग ताडोबाला जाण्याचा योग येत गेला. जितक्या वेळेस मी तिथे गेले, तितक्या वेळेस या जंगलाचे एकेक नवीन रूप दृष्टीस पडतं गेलं. पहिल्यांदा ताडोबाला जाण्याचा प्लॅन झाला तेव्हा, मनामधे खूप संमिश्र विचार होते. वाघ दिसेल, न दिसेल हा प्रश्न मनामध्ये…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।  नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥22॥ आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगों काई किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥160॥ काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥161॥ तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगीं । जाणसी तूं ॥162॥ मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 04 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 09:32; नक्षत्र : विशाखा 22:08 योग : विष्कंभ 22:49; करण : बव 22:47 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ 15:22; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:31 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 ललिता पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कायदेशीर वादात यश मिळेल. आज असा एखादा…

Read More

सतीश बर्वे बाबांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी मी सुचेताला कळवली होती. ते ऐकून तिकडे अमेरिकेत तिच्या घरी काय परिस्थिती झाली असेल याची मला इथे मुंबईत राहून जाणीव होती. मला जास्त काळजी आजोबावेड्या केदारची होती. तीन आठवड्यांपूर्वी बाबांना हस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं कळल्यावर सुचेता एकटीच अगदी दोन-तीन दिवसांसाठी येऊन बाबांना भेटून गेली होती. केदारची पदव्युत्तर परीक्षा अगदीच तोंडावर असल्याने तो इच्छा असूनही तिच्यासोबत येऊ शकला नव्हता. सुचेताशी काल रात्री फोनवर बोलताना केदारही माझ्याशी बोलला… बोलताना ढसाढसा रडत होता. “काका, आजोबांना माझा मेसेज वाचून दाखव प्लीज…” अशी विनवणीही त्यानं केली. त्याने लिहिले होते – “तुम्हाला माझ्यासाठी थांबायचं आहे आजोबा! मला खात्री आहे की,…

Read More

ॲड. कृष्णा पाटील माझा मित्र नंदूने नवीन बांधलेल्या घराचा ‘गृहप्रवेश’ कार्यक्रम होता. खूप वर्षांनी खपून त्याने दोन मजली घर बांधलं होतं. समोर अंगण ठेवून चहूबाजूंनी लाल चिऱ्याचे दगडी कंपाऊंड केलं होतं. कष्टाने मिळवलेली बरीच रक्कम या संपूर्ण कामासाठी खर्ची पडली होती. आयुष्यातली खूप वर्षे ती कमाई करण्यासाठी घालवली होती. कारण, सर्व सोयीसुविधा असलेलं घर बांधायचं… हे नंदूचं फार दिवसांपासूनचं स्वप्नं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. म्हणूनच गृहप्रवेश करताना त्याला अतीव आनंद होणं, स्वाभाविक होतं. तर, त्या दिवशी नंदू खूप आनंदी होता. कार्यक्रम दुपारचा होता. खूप उत्साहाने आणि आग्रहाने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नातेवाइक अन् मित्रांना बोलावलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी हार,…

Read More

आराधना जोशी नवीन वर्ष सुरू झाले की, बहुतांश सर्वांच्याच नजरा गणेशोत्सवाकडे लागलेल्या असतात. तसं पाहिलं गेलं तर, पावसाळ्याला होणारी सुरुवात ही सण-उत्सवांची सुरुवात असते. आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याने पावसाचा शिडकावा उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या जीवाला जसा आल्हाददायक असतो, तसाच धरणीमातेसाठी देखील! या काळात सर्वत्र दिसणारी हिरवाई मन प्रफुल्लित करणारी असते. सणावारात हाच आनंद विविध उत्सव साजरा करताना दिसतो. दहिहंडी, गणपती झाले की, तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रीचे. रास गरबा, दांडिया खेळायला उत्सुक असणारी तरुणाई गणपती विसर्जनापासूनच याची तयारी सुरू करताना दिसते. नऊ रात्रींसाठी असणारे वेगवेगळे पोशाख, त्यावर मॅचिंग दागदागिने, मोजडी, अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू यांनी तरुणाईला आकर्षित केलं आहे.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगीं ॥151॥ कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥20॥ देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥ याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥ जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ॥154॥ देखें प्राप्तार्थ जाहले ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 03 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 07:05; नक्षत्र : स्वाती 19:07 योग : वैधृती 21:52; करण : वणिज 20:17 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि घरातील वातावरण आनंददायी असेल. एखादा महत्त्वाचा प्रवास दौरा होण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 3 आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली. घरातून रागात बाहेर पडलेले मोहन आणि आशा…

Read More