Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026

    एका घासात विठ्ठल…

    July 18, 2026

    मराठी असे…

    July 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, ॲड. अमोल दोरवट, ॲड. दोरवट, लेखक ॲड. अमोल दोरवट, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष, ज्योतिषशास्त्र, लग्न म्हणजे काय, ग्रहांची गती, 27 नक्षत्र, राशिचक्र, वेध भविष्याचा, भविष्याचा वेध, काय आहे भविष्य,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ॲड. अमोल दोरवट

    जे नक्षत्रांमधून (किंवा तारका समूहांमधून) भ्रमण करतात त्यांना ग्रह म्हणतात. राशिचक्र 27 नक्षत्रांचे बनलेले आहे, ज्याची सुरुवात अश्विनीपासून होते. हाच प्रदेश 12 समान भागांत विभागलेला असून ते 12 राशी (किंवा चिन्हे) आहेत, ज्यांची सुरुवात मेष राशीपासून होते. ग्रहांची नावे सूर्यापासून सुरू होतात. जन्मवेळी उगवणाऱ्या राशीला लग्न (किंवा उदय राशी) म्हणतात. या लग्नावर आणि ग्रहांच्या एकमेकांशी संयोग आणि वियोगावरून, मनुष्याच्या शुभ आणि अशुभ फळांचा निर्णय केला जातो.

    टीप : ग्रह राशिचक्रामधून भ्रमण करताना नक्षत्रांमधून (तारकागृहे / नक्षत्रमंडळे) जातात.


    नक्षत्रांची नावे अशी आहेत –

    1. अश्विनी, 2. भरणी, 3. कृत्तिका, 4. रोहिणी, 5. मृगशिरा (मृगशीर्ष), 6. आर्द्रा, 7. पुनर्वसू, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा फाल्गुनी, 12. उत्तरा फाल्गुनी, 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूळ, 20. पूर्वाषाढा, 21. उत्तराषाढा, 22. श्रवण, 23. धनिष्ठा, 24. शतभिषा (शततारका), 25. पूर्वा भाद्रपदा 26. उत्तरा भाद्रपदा 27. रेवती

    हेही वाचा – ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    लग्न म्हणजे काय?

    लग्न हा जन्मकुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. तो म्हणजे जन्मवेळी जन्मस्थानाच्या अक्षांशावर पूर्व क्षितिजावर उगवणारी राशी. राशीचे असे उगवणे, हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे (गतीमुळे) दिसते. पृथ्वीच्या या फिरण्याच्या वेगामुळे राशिचक्रातील प्रत्येक अंश पूर्व क्षितिजावर उगवताना भासतो.

    साधारणपणे, एका राशीला क्षितिजावरून जाण्यास सुमारे दोन तास लागतात; त्यामुळे प्रत्येक अंशाला उगवण्यासाठी चार मिनिटे लागतात. तथापि, हा कालावधी त्या जन्मस्थानाच्या अक्षांशावर अवलंबून असतो.

    ग्रहांची गती (Daily Average Speed)

    प्रत्यक्षात सूर्याला स्वतःची गती नाही; पृथ्वीच्या फिरण्यामुळे तो चालत असल्याचा भास होतो. इतर ग्रह, तसेच राहु-केतू यांना मात्र वेगवेगळ्या गती आहेत.

    हेही वाचा – नक्षत्रांच्या पुराणकथा

    ग्रहांची दररोजची सरासरी गती (जी निश्चित नाही) साधारणत: पुढीलप्रमाणे आहे –

    सूर्य : 1°

    चंद्र : 13° ते 15°

    मंगळ : 30′ ते 45′

    बुध : 65′ ते 100′

    शुक्र : 62′ ते 82′

    गुरु : 5′ ते 15′

    शनी : 2′

    राहू / केतू : 3′

    या विविध गतींमुळे ग्रह परस्परांशी वेगवेगळ्या दृष्ट्या (aspects) तयार करतात. हे दृष्टिसंबंध त्यांच्या रेखांशांतील अंतरावर अवलंबून असतात. ज्योतिषशास्त्रात या दृष्ट्यांचा मोठा उपयोग आहे. यावर विचार करावा, असे ऋषी सुचवतात.

    (संदर्भ ग्रंथ : बृहत् पराशरी होरा शास्त्र)
    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 19, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 28…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026

    एका घासात विठ्ठल…

    July 18, 2026

    मराठी असे…

    July 18, 2026

    ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत

    July 18, 2026

    मधुमेह नियंत्रणासाठी आहार मार्गदर्शन

    July 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आटु वेगु विंदाणु, आशा शंका प्रतारणु

    July 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 363
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 495
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 238
    • मैत्रीण 24
    • ललित 788
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026

    एका घासात विठ्ठल…

    July 18, 2026

    मराठी असे…

    July 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.