Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 17, 2026Updated:July 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 जुलै 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 26 आषाढ शके 1948; तिथि : तृतीया 06:27, चतुर्थी 28:42; नक्षत्र : मघा 18:34;
    • योग : व्यतिपात 22:45; करण : वणिज 17:29;
    • सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    विनायक चतुर्थी

    करीदिन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    श्रेष्ठ कथालेखक बाबुराव बागूल

    टीम अवांतर

    मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबुराव‌ बागूल यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी नासिक जिल्ह्यातील विहीतगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण विहीतगाव येथे तर मुंबई येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले.

    सुरुवातीच्या काळात लाँड्रीमधला मार्कर, दवाखान्यातील कंपाऊंडरचा सहाय्यक अशा नोकऱ्या केल्यानंतर, दादरच्या कोहिनूर मिलमध्ये आणि नंतर माटुंगा येथे रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये कामगार म्हणून त्यांनी बारा वर्षे काम केले. लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी 1968 साली रेल्वेच्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला.

    हेही वाचा – आषाढीच्या स्वादातली भक्ती

    मार्क्स, लेनिन, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच गॉर्की, चेकॉव्ह आणि शरतचंद्र चतर्जी इत्यादींच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रभाव त्यांच्या साहित्यनिर्मितीला प्रेरक ठरला. जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे (कथासंग्रह) आणि सूड (कादंबरिका) या बागुलांच्या साहित्यकृती गाजल्या. सामाजिक विषमतेचा बळी होऊन झोपडपट्टीत नाही तर गावकुसाबाहेर राहणारा दु:ख-दैन्याने ग्रासलेला आणि अन्याय-अत्याचारांविरुद्ध बंड करून उठणारा शोषित, दलित, अपमानित माणूस बागुलांच्या कथांचा केंद्रबिंदू होता.

    अस्सल अनुभव, विद्रोहाची खंबीर भूमिका आणि तिच्याशी सुसंगत अशी एक प्रकारची रांगडी भाषा यामुळे बागुलांच्या साहित्यकृतींना त्यांचे वेगळे, पृथगात्म रूप प्राप्त करून दिले. काव्यात्मता आणि भेदक कल्पनाशक्ती यांची देणगी बागुलांना लाभली. त्यामुळे दारुण वास्तवाची त्यांनी निर्माण केलेली चित्रे वास्तवाच्या पलीकडील व्यापक अर्थपूर्णता सूचित करणारी होती. मरण स्वस्त होत आहे या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार योजनेत हरि नारायण आपटे पारितोषिक मिळाले. आंबेडकर भारत (भाग 1) या पुस्तकातील सतरा कथांमधून इंग्रजी चौथीपासून बी.ए. उत्तीर्ण होईपर्यंतचे डॉ. आंबेडकर यांचे जीवन उभे केले आहे. त्यांच्या अनेक कथांचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अनुवाद झालेले आहेत.

    1960 नंतरचे मराठी साहित्याचे दशक ढवळून काढणाऱ्या आघाडीच्या दलित साहित्यिकांत त्यांचा समावेश होतो. ‘आम्ही’ नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले होते. नागपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या निकायसारख्या काही दलित नियतकालिकांशी सल्लागार लेखक म्हणूनही त्यांचा संबंध आला. महाराष्ट्र बौद्ध साहित्यसभेने 1972 साली महाड येथे आयोजित केलेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1975 मध्ये फाय फाऊंडेशनची शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली. मुंबईच्या धारावी येथे 1999 मध्ये भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बागुल यांनी भूषविले होते. याशिवाय बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’जनस्थान पुरस्कार’ 2007 साली त्यांना देण्यात आला. तसेच महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराचे देखील ते मानकरी ठरले. 26 मार्च 2008 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. मात्र इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा. आरोग्याच्या कोणत्याही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. जुनी कर्जे फेडण्यासाठी काही उपाययोजना आज करू शकता. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण अगदी किरकोळ निष्काळजीपणामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात.

    वृषभ – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. आपल्या विरोधकांच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेणे टाळा. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधी एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपल्या सभोवतालच्या लोकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा, कारण प्रत्येक व्यक्ती तुमची हितचिंतक नाही हे लक्षात ठेवा.

    मिथुन –  आरोग्याबद्दल काही किरकोळ चिंता असल्या तर आज त्यात हळूहळू सुधारणा होईल. वडिलधाऱ्यांची सेवा केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल, शिवाय त्यांचे आशीर्वादही लाभतील. संततीच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य दिशा दाखवावी लागेल. कामाबद्दलची किरकोळ चिंता कायम राहू शकते.

    कर्क – आज कोणतेही जोखमीचे उपक्रम टाळणे शहाणपणाचे ठरेल. कोणताही मोठा व्यवहार किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. एखादी मनापासूनची इच्छा पूर्ण झाल्याने आनंद मिळेल.  आईच्या प्रकृतीबाबत तुम्हाला थोडी धावपळ करावी लागू शकते. शेजारच्यांशी असणारे कोणतेही वाद वाढण्यापूर्वी ते शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.

    सिंह – तुमच्याबाबतचा आदर आणि प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. तुमचे गोड शब्द आणि वागणूक लोकांना प्रभावित करेल, यामुळे तुमचे नातेसंबंधही अधिक दृढ होतील. महत्त्वाची कामे इतरांवर सोपवणे टाळा. आज कोणत्याही संघर्षापासून दूर राहा. तापट स्वभावावर थोडे नियंत्रण ठेवले, तर कौटुंबिक वातावरण सुधारेल.

    कन्या –  प्रत्येक काम आज विचारपूर्वक करावे लागेल. कामाच्या जास्त दबावामुळे घाई होऊ शकते, म्हणून संयम ठेवा. अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार टाळा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणुकीचे निर्णय घ्या. वाहनासाठी दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च येऊ शकतो. निधीअभावी थांबलेले कोणतेही काम तुम्ही आज पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न कराल.

    तुळ – आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी सांघिक कार्यामुळे वेळेच्या आधीच ध्येये साध्य करू शकाल. न मागितलेला सल्ला देणे टाळा, कारण त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक भागीदारीत प्रवेश करण्यापूर्वी, प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करा. प्रवास करताना स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.

    वृश्चिक –  व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नफा आणि प्रगतीचा आहे. आपल्या विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आज महत्त्वाचे ठरेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना सन्मान किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरदार जातकांसाठी आज कामाचा ताण जरा कमी असेल.

    हेही वाचा – अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    धनु – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. एखादा प्रलंबित व्यवहार किंवा महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. कोणतेही व्यावसायिक वाद टाळणे उत्तम ठरेल. तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या बाबतीत आईचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरदार जातकांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

    मकर – कठोर परिश्रम आणि संयम ही आज तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल. कामाचा ताण थोडा जास्त असू शकतो, पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराकडून एखादे सुखद सरप्राइज मिळू शकते. संततीच्या भविष्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची माहिती घ्याल. व्यावसायिकांसाठी काही जुने व्यवहार चिंतेचे कारण बनू शकतात.

    कुंभ – आजचा दिवस संमिश्र, पण आशेने भरलेला असेल.  आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. एखादा जुना वाद किंवा चूक समोर येऊ शकते, त्यामुळे संयम बाळगा. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    मीन – आजचा दिवस आनंदाचा ठरणारा असेल. नवीन सदस्याच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. खर्च नियंत्रणात ठेवणे आणि बचत किंवा गुंतवणुकीचे नियोजन करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती आज मजबूत होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर नवीन पदासाठी अर्ज करण्याकरिता आजचा दिवस अनुकूल आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 25…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    ग्रह आणि आपण… ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    July 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026

    आषाढीच्या स्वादातली भक्ती

    July 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें

    July 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 361
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 492
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 237
    • मैत्रीण 24
    • ललित 783
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.