Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शार्वीची वेगळी खेळी
    ललित

    शार्वीची वेगळी खेळी

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 13, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, पल्लवी खरोसे आंबेकर, लेखिका पल्लवी आंबेकर, पार्थ आणि गरिमा पांडे, अग्रवाल इंडस्ट्रीतील लव्हस्टोरी, गरिमा पार्थ प्रेमकथा, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, शार्वीचे पार्थवर प्रेम, शार्वीच्या प्रेमभावना, अग्रवाल इंडस्ट्रीत प्रेमत्रिकोण, अग्रवाल इंडस्ट्रीत लव्ह ट्रँगल, पार्थचा शार्वीला नकार, शार्वी पार्थवर नाराज, शार्वीकडून डॅडीला इमोशनल ब्लॅकमेल, शार्वीमुळे राहुल अग्रवाल दु:खी
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 10

    पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचं त्याच्यावर जास्त प्रेम होतं आणि पहिल्यांदाच तिला कोणीतरी नकार दिला… तिचा इगो हर्ट केला. ती हॉटेलमधून डायरेक्ट घरी निघून आली. चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. तिने तिची पर्स खाली हॉलमध्ये फेकून दिली आणि तडक आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये जाऊन तिने दरवाजा रागातच धाडकन बंद केला.

    तिचा एकंदरीत अवतार बघून आई शर्वरी समजून गेली की, ‘नक्कीच तिचं काहीतरी बिनसलंय. यामागे काहीतरी मोठं कारण असावं.’ नक्की काय झाल आहे ते पाहण्यासाठी शर्वरी तिच्या रुमकडे गेली, पण दरवाजा लॉक होता. तिने दरवाजा ठोठावला, आवाजही दिला तरी शार्वीने दरवाजा काही उघडला नाही. खूप वेळ वाट बघून मग ती खाली निघून गेली. खाली जाऊन तिने राहुलला फोन केला आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्याने लगेचच ‘येतो’ म्हणून फोन ठेवून दिला.. पी. ए.ला सांगून त्याने सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या आणि तडक घरी निघून आला.

    घरी आल्या आल्या तो आधी मुलीच्या रूमकडे गेला. त्याने दरवाजा वाजवला, पण ती काही दरवाजा उघडायला तयार नव्हती. शेवटी त्याने सर्व्हन्टला मास्टर-की आणण्यास सांगितलं. त्यानेही पटकन आणून दिली. त्याने घाईतच दरवाजा उघडला आणि तिच्याकडे गेला तर ती रडत असलेली त्याला दिसली.

    हेही वाचा – शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    तिला ठीक बघून त्याला समाधान वाटलं. पण ती रडत होती… तो तिच्याजवळ गेला आणि “प्रिन्सेस” म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसं ती वळली आणि त्याच्या कमरेला मिठी मारून रडू लागली.

    “प्रिन्सेस काय झाल..? का रडतेय डॅडला पण सांगायचं नाही का?” तिला रडताना बघून त्याने विचारले.

    “डॅड मी त्याच्यावर खूप प्रेम करते, पण तो मला नाही बोलला…” ती मुसमूसत म्हणाली.

    “कोण बावळट मुलगा आहे, जो माझ्या प्रिन्सेसला नाही बोलला! कोण आहे तो सांग मला… बघतो तुला नाकारायची त्याची कशी हिम्मत झाली ते…” तो रागात म्हणाला.

    “आपल्याच ऑफिसमध्ये आहे तो कामाला…” तिने नाक वर ओढत सांगितलं.

    “आपल्या ऑफिसमध्ये कामाला…? म्हणजे तू एका सामान्य मुलावर प्रेम करतेस! मला वाटलं तू एक प्रिन्स निवडला असशील… पण एक एम्प्लॉयी! नाही हे अशक्य आहे..” तो रागात तिथून उठत म्हणाला.

    “पण डॅड… मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तो जर मला नाही मिळाला तर, मी मरून जाईन! मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत… तो मला हवाय डॅड कोणत्याही किमतीवर…” ती तिच्या डॅडला इमोशनल करत म्हणाली.

    त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि रागात खाली निघून गेला. ती फक्त ते गेले, त्या दिशेला पाहत होती. पण आपल्या डॅडला कसं मनवायचं, ते तिला चांगलंच माहिती होतं…

    तो खाली आला तसं शर्वरीने त्याला विचारलं… त्याने तिला सगळं सांगितलं की, कशी त्याची डफर मुलगी एका एम्प्लॉयीच्या प्रेमात पडली आहे. पण हे नातं होणं जवळ जवळ अशक्य आहे!

    0000

    इकडे पार्थ ओफिसमध्ये आला. त्याने त्यांचं काम आवरलं आणि गरिमाला घेऊन तो त्यांच्या नेहमीच्याच ठिकाणी आला.

    “काय झालं पार्थ तू एवढा शांत का आहेस? काही झालं आहे का..?” तिने काळजीने विचारले.

    “हं… तू म्हणत होतीस तेच झालं… आज शार्वी मॅमने मला प्रपोज केलं, तेही डायरेक्ट लग्नासाठी!” तो म्हणाला.

    “मग? मग काय झालं? तू काय बोलला त्यांना?” तिने त्याला हळू आवाजात विचारले. त्या आवाजात एक वेगळीच भीती होती.

    “काही नाही… मी त्यांना एवढंच सांगितलं की, मी दुसरं कोणावर तरी प्रेम करतो आणि लवकरच लग्नही करणार आहोत…” तो तिच्याकडे बघत म्हणाला.

    “मग काय बोलल्या त्या…” अस्वस्थ होत तिने विचारलं. कारण तिला माहिती होतं की, तिची बॉस एवढ्यावर शांत नाही बसणार. नक्कीच काहीतरी करणार. कारण एवढ्या दिवसाच्या सहवासात तिने तिचा स्वभाव चांगल्या प्रकारे ओळखला होता.

    “काहीच नाही, मी लगेचच निघून आलो. जास्त वेळ थांबलो असतो, तर कदाचित विषय अजून वाढला असता… अजून एक, मी आपल्याबददल आईशी बोललो आहे. लवकरच आपण लग्न करू…” तो तिला आश्वस्त करत म्हणाला. तिने त्याच्या खांद्यावर हळूच डोकं ठेवलं. थोडावेळ बसून ते घरी निघून गेले..

    0000

    शार्वी हाऊस

    “राहुल बघ ना, कालपासून ना ती दरवाजा उघडतेय, ना काही खातेय… ऐकायलाच तयार नाही. तू बघना एकदा तिच्याशी बोलून तुझं तरी ऐकते का…” ती शार्वीच्या काळजीने म्हणाली.

    ‘हं… बघतो…” ती दरवाजा उघडत नाही, हे ऐकून त्यालाही टेंशन आलं. तो उठला आणि तिच्या रूमकडे गेला. त्याने परत मास्टरकीने दरवाजा उघडला आणि आत गेला… त्याला माहिती होतं की, ती अशी नाही ऐकणार!

    हेही वाचा – शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    तो गेला तेव्हा ती झोपली होती. चेहरा पूर्ण कोमेजला होता. गालावर अश्रूचे वाळलेले डाग होते. आपल्या प्रिन्सेसला अशा अवस्थेत बघून त्याला कसंतरी झाल. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काहीतरी ठरवून तो बाहेर निघून आला…

    तो गेला तसं शार्वी उठून बसली. आता तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. ती तिच्या योजनेत यशस्वी झाली होती. तिला माहिती होतं की, डॅडकडून काहीही कसं मिळवायचं. उठून ती फ्रेश व्हायला गेली, कारण रडत बसणाऱ्यातली ती नव्हती.

    क्रमश:
    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026 ललित

    पुण्यकर्म

    October 6, 2026 ललित

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    फूल ना फुलाची पाकळी

    By दिलीप कजगांवकरOctober 6, 2026

    राज हा सदानंद आणि सावित्रीबाईंचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्षं तो आई-बाबांसह…

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.