Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नाक दाबलं की, तोंड उघडतं
    ललित

    नाक दाबलं की, तोंड उघडतं

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 22, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, साने काका, सानेकाकू, एसीला विरोध, सानेकाका एकटेपणा, साने काकूंची हुशारी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    साने काका म्हणजे अगदी आदर्शवादी व्यक्तिमत्व. गांधीवादी विचारसरणीचा मेरूमणी. साधी राहणी, उच्च विचारसरणी अगदी जन्मभर जपलेली… नशीब, बुशशर्ट आणि पॅन्ट तरी घालतात. पंचा नेसून लाज अगदीच उघड्यावर पडेल, म्हणून हा पोशाख नाईलाजाने स्वीकारलाय म्हणे त्यांनी. जुनं ते सोनं यावर त्यांचा अगदी ठाम विश्वास. जुना खरखरणारा रेडियो, खिळखिळी झालेली, गंजलेली आणि गांजलेली जुनीपुराणी सायकल, हल्ली फक्त बाळांसाठी वापरले जाणारे, पण यांचे अत्यंत आवडते असे लंगोट, या सगळ्या वस्तूंचं प्राणपणाने रक्षण करण्याकडे यांचा ओढा… जग काही का म्हणेनात मग! लंगोट आरोग्य रक्षणा करता चांगला असतो यावर त्यांचा ठाम विश्वास, म्हणून अजूनही त्याला कवटाळून बसलेले साने काका म्हणजे मूर्तीमंत नमूना आहेत. गॅलरीच्या दांडीवर वाळत पडेलेले असतात लंगोट, त्यांच्या आरोग्याचा झेंडा जगासमोर फडकवत.

    त्यांचे सगळे मित्र हल्ली छान Dettol, Park Avenue, Gillette सारखे चकचकीत दाढीचे साबण वापरतात, नव्या युगाचे रेझर वापरतात… पण हे मात्र प्लास्टिकच्या जीर्ण डबीतला, गेल्या जमान्याचा गोल दाढीचा साबण वापरतात… जुन्या पद्धतीची ब्लेड वापरतात… आवडतं जुन्यात रमणं त्यांना.

    बरीच वर्षे ते मोबाइल वापरायचे नाहीत, पण हल्ली घरचे सगळे खनपटीला बसल्यावर अगदी साधा फोन त्यांनी घेतलाय. सगळेजण स्मार्ट फोन वापरत असताना, हे मात्र त्यांचा नोकिया मिरवत असतात, साधेपणाचं प्रतीक म्हणून! बाजारात सुंदर सुंदर छत्र्या उपलब्ध असताना, हे मात्र जुनी, कापडी बांधणीची दांडुकाछाप छत्री वापरतात… चालताना आधार होतो म्हणून.  किती उदाहरणं द्यावी अशी?

    त्यांच्या उच्चपदस्थ लेकाने नुकताच एक प्रशस्त फ्लॅट घेतला 3 BHK! खूप पैसे खर्च करून छान सजवला… एक खोली स्वतःला, एक लेकाला आणि एक आईबाबांना, अशी सुंदर सोय केली. आईबाबांच्या खोलीत स्वतंत्र टीव्ही… त्यांना हवा तो कार्यक्रम, हवा तेव्हा बघता यावं म्हणून! तो टीव्हीही अगदी कुरकूर करतच लावून घेतला त्यांनी. त्यांच्या मते, बाहेरच्या खोलीतला एक टीव्ही पुरेसा होता. करायचेत काय दोन एका घरात? असा त्यांचा रोकडा सवाल होता, पण झाले कसेतरी राजी…

    ही सगळी कामं सुरू असताना, तिन्ही खोल्यांना एसी बसवायचा विषय निघाला. किती टनांचा, कुठल्या कंपनीचा वगैरे चर्चा सुरू झाली… आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे साने म्हणाले, “आमच्या खोलीत नको एसी. उगाच काहीतरी फॅड. काही एवढं उकडत वगैरे नाहीये. इतकी वर्षं विना-एसी जगलोय की! मला तर पडल्या पडल्या झोप लागते. पंखा आहे ना डोक्यावर, पुरे झाला तो. उगाच पैसे खर्च करायचे आणि विजेची बिलं भरत बसायची, निष्कारण…” इत्यादी इत्यादी!

    हेही वाचा – माझ्यातल्या ‘मी’ची कथा

    साने काकू म्हणाल्या, “अहो, नाही परवडली ही चैन आपल्याला कधी… आता लेक देतोय एवढा तर, घेऊया की आपल्याही खोलीला लावून… किती कोतेपणा आणि आडमुठेपणा करताय?”

    साने ठाम होते, नाही म्हणजे नाही… “मी माझ्या तत्वांना मुरड घालायचा नाही, सांगून ठेवतोय.” काकूंनाच मन मारावं लागलं नेहेमीप्रमाणे.

    दोन खोल्यांमध्ये एसी लागले आणि काका, काकूंची खोली तशीच राहिली.

    होता होता उन्हाळा आला. सूर्य आग ओकायला लागला, अंगातून घामाच्या धारा वाहायला लागल्या नेहेमीप्रमाणे. काकांचा लेक, सूनबाई आणि नातू आपापल्या खोल्यांमध्ये मस्त एसी लावून झोपायला लागले आणि काकू मात्र, हेकट आणि आडमुठ्या नवऱ्याच्या हट्टापायी, ऐपत असूनही उकाड्यात तळमळू लागल्या. काकांना त्याचं सोयरसूतक नव्हतं. त्यांनी आपला अहंकार कुरवाळत, स्वतःबरोबर बायकोला पण वेठीला धरलं होतं. आता, एसीमध्ये छान वाटतं, झोप शांत आणि स्वस्थ लागते… हे काही काकांना ठाऊक नव्हतं असं नाही, पण तत्व कुरवाळत बसायला फार आवडायचं त्यांना, कितीही त्रास झाला तरी!

    हे असं सगळं सुरू असताना, लाडका नातू एकदा जेवताना आजोबांच्या देखत आजीला म्हणाला, “आजी, त्यांना झोपायचं असेल तसंच, तर झोपूदे. तू माझ्या खोलीत ये झोपायला. परत एकदा गोष्टी सांग मला, लहानपणी सांगायचीस ना तश्याच…”

    काकूंनी डोळे मिचकावले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन, त्याच रात्रीपासून त्यांचा बाडबिस्तरा हलला नातवाच्या खोलीत… सोबत विक्सची बाटली, अमृतांजनची डबी वगैरे ऐवज घेऊन!

    हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!

    ती गेल्यावर काका एकटे पडले. हा असा पवित्रा आपली सौभाग्यवती घेईल हे त्यांना अपेक्षितच नव्हतं. आयुष्यभर त्यांच्या ‘हो’ला ‘हो’ करत आलेल्या काकू, आता असं छोटंसं बंड करून त्यांना खिजवतील, अशी अपेक्षाच केली नव्हती त्यांनी. एकटेपणाची भीती वाटणारे काका अस्वस्थ झाले. फोबिया होता त्यांना… झोप येईना एकट्याला, कारण रोज शेजारी आधाराला बायको असायची. आपल्याला काही झालं तर काय करणार, कोणाला कळणार? वगैरे प्रश्न त्यांना छळू लागले आणि काकांची तगमग वाढली.

    असे चार दिवस गेले आणि एके दिवशी अस्वस्थ झालेले काका, हळूच काकूंना म्हणाले, “अगं, मला एकट्याला नाही झोप येत. नको नको ते विचार येतात मनात. तू आपली परत ये पाहू आपल्या खोलीत.”

    काकू गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, “आता माझी किंमत कळतेय होय? एकटेपणा सोसवणार नाही तुम्हाला हे पक्कं ठाऊक होतं मला. येईन, पण एका अटीवर!!”

    “कळली तुझी अट… तयार आहे मी एसी बसवून घ्यायला. नको छळूस आणखी मला!!”

    दुसऱ्याच दिवशी सकाळीच एसीवाला माणूस हजर झाला एसी लावायला… काकांना कळेच ना, एवढी जलद कृती कशी झाली ते! मुलगा, सून, नातू आणि आपली पत्नी यांनी रचलेला तो कट होता, आपल्याला नामोहरम करायला, हे काकांना कळायला काहीच वाव नव्हता…

    एसी लागला त्याच दिवशी काकू आपल्या खोलीत परतल्या, नाठाळ काकांना वठणीवर आणल्याच्या गोड समाधानात.

    उगाच कशाला वितंडवाद? नाक दाबलं की, तोंड उघडतं, ते हे असं.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    By रेवती निलेश पांडेApril 15, 2026

    दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या…

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.