Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…
    ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यApril 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भरपावसातला नाश्ता, ढोकळा आणि कांदाकचोरी, सासू शकुताई सून रितू, सासू सुनेचे नाते, प्रेमळ सून रिता, प्रेमळ सासू शकुताई, रिता कुणालचे मातृप्रेम
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी - (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बाहेर विजा कडाडत आहेत… वातावरण कुंद… पाऊस भरून आलेला… शकुताई त्यांच्या रूममध्ये होत्या. शाल पांघरून पडल्या होत्या. आज त्यांचा मुलगा कुणाल आणि सून रितू घरीच होते. दुपारचे साधारण चार वाजले असावेत. अचानक त्यांना रितूचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी कान टवकारले.

    “कुणाल, तू जातो की नाही नाश्ता घ्यायला? किती दिवस झाले, पण तू ऐकतच नाहीस.”

    “अगं, बाहेर तर बघशील? किती भरून आलं आहे. रस्त्यात मीच पावसात सापडेन!”

    “असू दे. भिजलास तरी चालेल. पण आज जाच.”

    शकुताई आश्चर्यचकित झाल्या. एवढ्या पावसाळी वातावरणात कुणालला नाश्ता आणायला पाठवते आहे रितू? त्यांनी पुन्हा कान टवकारले.

    “उद्या आणला तर नाही चालणार का?”

    “नाही. आजच आणायचा आहे. उद्या आपण दोघेही ऑफिसला असू. उद्या वेळ मिळणार नाही.”

    “मग अधेमधे सुटीच्या दिवशी?”

    “पण त्या दिवशी पाऊस असेल का? पाऊस पडत असतानाच नाश्ता खाण्यात मजा असते.”

    शकुताईंना वाटले बाहेर जावे आणि सांगावे सुनेला की, कशाला एवढ्या पावसात माझ्या मुलाला बाहेर पाठवते? पण त्यांनी विचार केला कशाला त्या दोघांच्या मधे पडावे? लग्नाला जेमतेम सहा-सात महिने झालेत. तिला खावेसे वाटतं असेल नाश्ता?

    हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

    पण दुसऱ्या क्षणी त्यांना वाटले की, इतकंही का ऐकून घ्यावे कुणालने? स्पष्टपणे नाही सांगता येत नाही का? तेवढ्यात पुन्हा रितूचा आवाज ऐकू आला…

    “निघ आता. उगाच टाइमपास करू नकोस. कार घेऊन जा आणि खेतेश्वर स्वीट्सकडून नाश्ता घेऊन ये. तो मस्त गरम काढून देतो आपल्यासमोरं.. आणि पॅकही करून देतो.”

    पुढच्या क्षणी दार उघडल्याचा आणि नंतर कार चालू केल्याचा आवाज आला… शकुताईंनी डोळे मिटून झोप घेण्याचा प्रयत्न केला. पण कशी झोप येणार? सहा-सात महिन्यांत आपला मुलगा इतका सुनबाईच्या आहारी गेला की, कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण असताना बायकोचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेर पडला. छे! त्यांना अचानक आठवले त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या बाळूला सगळे ‘बायकोचा बैल’ म्हणतात. तिला विचारल्याशिवाय तो काहीच करत नाही. आपल्या कुणालचीही ती अवस्था होईल का? त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अजूनपर्यंत तर रितू त्यांच्याशी चांगली वागत होती. पण पुढे जाऊन कुणाल तिच्या कह्यात गेला तर? आपली घरात तरी किंमत राहील का? आधीच हे वारलेले. माझी बाजू घेणारे कोणीच नाही. त्यांना घाम फुटला.

    नाही, नाही… माझा कुणाल तसा नाही. किती काळजी घेतो तो आपली. अगदी जेवायला बसायच्या अगोदर आईचं जेवण झाले का, हे विचारतो मगच जेवतो… त्या उठल्या. टी-पॉयवर ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्यायल्या.

    बाहेर पाऊस सुरू झाला आणि त्यांना पुन्हा कुणालची काळजी वाटू लागली. एवढ्या पावसाचा पोरगा गेलाय बाहेर…

    काही वेळाने कार घराजवळ आल्याचा आवाज आला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. बरे झाले पावसाचा जोर वाढण्याआधी पोरगा आला घरी! आजकालच्या पोरींना काही समजतच नाही. नवरा म्हणजे नोकर वाटतो त्यांना… आणि कसला नाश्ता मागवलाय काय माहीत?

    त्या पुन्हा पलंगावर झोपल्या. तेवढ्यात कुणाल त्यांच्या रूममध्ये आला.

    “आई, गरम नाश्ता आणला आहे, खाऊन घे.”

    त्यांचे मन अगदी भरून आले… ‘पोराला काळजी आहे आपली.’ तरीही त्या म्हणाल्या, “नको रे, तुम्ही खा… तरुण पोरं… मला कशाला?”

    “चल आई, रितू तुझी वाट पाहत आहे. तुला माहीत आहे ना? तू काही खाल्याशिवाय आम्ही काही खात नाही.”

    शकुताई नाईलाजाने उठल्या आणि डायनिंग हॉलमध्ये आल्या. तिथे एका डिशमध्ये त्यांच्या आवडीचा ढोकळा आणि भलीमोठी कांदा-कचोरी ठेवलेली होती. त्यांना येताना बघून रितू म्हणाली,

    “या आई पटकन. गरम आहे तोवर खाऊन घ्या. तुम्हाला आवडतात ना कचोऱ्या आणि ढोकळा म्हणून मुद्दाम मागवले आहे?”

    हेही वाचा – सासू, सून अन् लेक…

    “काय?” शकुताईंनी काहीसे आश्चर्याने रितूकडे पाहिले.

    “हो ना, काल-परवाच फोनवर तुम्ही नणंदबाईंना सांगत होत्या ना की, असा अवकाळी पाऊस पडला की मामंजी तुमच्यासाठी ढोकळा आणि कांदा-कचोरी आणायचे म्हणून… कारण अशा पडत्या पावसात खायला तुम्हाला ते फार आवडायचे. मग मी कुणालला मुद्दाम पाठवले आज. एकतर इतर दिवशी आम्ही घरी नसतो. आज अनयसा रविवार आहे… पाऊसही पडतो आहे… मामंजी नसले तरी काय झाले, आम्ही आहोत ना?”

    शकुताई आपल्या सुनेकडे बघतच राहिल्या. बघता बघताच त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. रितू पटकन त्यांच्याजवळ आली.

    “काय झाले आई? मामंजींची आठवण आली का?”

    आपले डोळे पुसत शकुताई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,

    “नाही गं. माझी सून किती छान आहे, हे आज समजले मला!”

    शकुताईंनी पटकन कांदा-कचोरीचा एक तुकडा तोडला आणि रितूला भरवला… आता रितूचेही डोळे पाण्याने भरले होते.

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Most Popular

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.