Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥53॥ जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥54॥ आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥55॥ एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥56॥ हें युगचि आघवें बुडावें । वरि आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रेंशीं मज ॥57॥ ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं एऱ्हवीं काढी । कवणु मातें ॥58॥ नाथिलें आपणपें एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्हीं ॥59॥ मागां जळत काढिलों जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥60॥ दुराग्रहें हिरण्याक्षें । माझी बुद्धिवसुंधरा सूदली काखे । मग मोहार्णवगवाक्षे । रिघोनि ठेला ॥61॥ तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥62॥ ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परि पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥63॥ तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥64॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    अर्थ

    देवा, गंधर्वनगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. ॥53॥ महाराज, सर्प कापडाचाच होता, (पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन) विषाच्या लहरी मात्र खर्‍या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो, असे भ्रमाने वाटणार्‍या जीवाला (मला) वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. ॥54॥ विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे, हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार, इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, याप्रमाणे हे अनंता, आपण माझे रक्षण केलेत. ॥55॥ ऐका, एरवी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की, आताच जरी सातही समुद्र एकवट झाले, ॥56॥ हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले (तरी चालेल), पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. ॥57॥ अशा अहंकाराच्या वाढीने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. (प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही, असा माझा कृतनिश्चय होता). पण आपण चांगले (जवळ) होता म्हणून ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते? ॥58॥ वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी (अर्जुन) आहे, असे मानले, आणि वास्तविक काही नाहीत, असे जे कौरव, त्यांस नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते. पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ॥59॥ ऐका, मागे (पूर्वी एकदा) जेव्हा आम्ही अग्नीत (लाक्षागृहात) जळण्याच्या बेतात होतो, तेव्हा तू आम्हाला बाहेर कढलेस. तेव्हा काय ते एका स्थूल देहासच भय होते, पण आता या (मोहरूपी) दुसर्‍या अग्नीच्या पीडेपासून चैतन्यासकट देहाला भय होते, ॥60॥ दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने, माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. ॥61॥ देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एकवेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसर्‍यांदा वराह अवतार घ्यावा लागला. ॥62॥ याप्रमाणे तुझी अनंत उपकारांची कृत्ये आहेत. त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू? परंतु (एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की) तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. ॥63॥ देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. कारण की, माझे अज्ञान साद्यंत नाहीसे झाले. ॥64॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    By Team AvaantarApril 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अहो वांसरू देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग…

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.