Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…
    ललित

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, पल्लवी खरोसे आंबेकर, लेखिका पल्लवी आंबेकर, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, शार्वीचे पार्थवर प्रेम, पार्थचा शार्वीला नकार, शार्वीचा इगो हर्ट, शार्वीकडून डॅडीला इमोशनल ब्लॅकमेल, पार्थची आई विभा, विभाचा पती राजेश, राजेश राहुल अग्रवाल बिझनेस पार्टनर, राजेशची हत्या, हत्याप्रकरणी राहुल आरोपी, विभाचा राहुलवर संताप
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 11

    पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचा इगो हर्ट झाला होता. ती रागातच घरी आली आणि आपल्या रूममध्ये गेल्यावर दरवाजा लावून घेतला.

    “राहुल बघ ना, कालपासून ना ती दरवाजा उघडतेय, ना काही खातेय… ऐकायलाच तयार नाही. तू बघना एकदा तिच्याशी बोलून तुझं तरी ऐकते का…” शार्वीच्या काळजीने आई शर्वरी म्हणाली.

    ‘हं… बघतो…” ती दरवाजा उघडत नाही, हे ऐकून त्यालाही टेंशन आलं. तो उठला आणि तिच्या रूमकडे गेला. त्याने परत मास्टरकीने दरवाजा उघडला आणि आत गेला… त्याला माहिती होतं की, ती अशी नाही ऐकणार!

    तो गेला तेव्हा ती झोपली होती. चेहरा पूर्ण कोमेजला होता. गालावर अश्रूचे वाळलेले डाग होते. आपल्या प्रिन्सेसला अशा अवस्थेत बघून त्याला कसंतरी झाल. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काहीतरी ठरवून तो बाहेर निघून आला…

    हेही वाचा – शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    तो गेला तसं शार्वी उठून बसली. आता तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. ती तिच्या योजनेत यशस्वी झाली होती. तिला माहिती होतं की, डॅडकडून काहीही कसं मिळवायचं. उठून ती फ्रेश व्हायला गेली, कारण रडत बसणाऱ्यातली ती नव्हती.

    0000

    राहुल डायरेक्ट त्या मुलाच्या म्हणजेच पार्थच्या घरी गेला. त्याने कल्पना केल्यापेक्षा तो एरिया त्याला जरा ठीक वाटला. त्याच्या ड्राइव्हरने दरवाजा उघडला तसा तो त्याचा कोट झटकत खाली उतरला आणि पार्थच्या घराकडे निघाला. त्याने दारावरची बेल वाजवली. विभानेच म्हणजे पार्थच्या आईने दरवाजा उघडला. विभाला तिथं बघून राहुल अग्रवाल जागीच थांबला. तीही त्याला आपल्या घरच्या दरवाज्यात बघून शॉक झाली. पण भानावर येत तिने त्याला आत घेतलं.

    “आता काय बाकी राहील आहे, जे तू इथे आलास?” त्या त्याला अगदी रुक्षपणे म्हणाल्या.

    “वाहिनी प्लीज, असं नका बोलू माझ्याशी…” तो काकूळतीने म्हणाला.

    “तुझ्या या तोंडाने मला वहिनी म्हणू नकोस. ज्या दिवशी तू माझ्या राजेशला बिझनेससाठी मारलंस त्याच दिवशी तुझी वहिनी मेली. मी आता कोणाचीही वहिनी नाही, समजलं? आणि इतक्या वर्षांनी तू का आला आहेस, ते सांगण्याची कृपा करशील का..?” त्या रागाने म्हणाल्या.

    “मी इथे पार्थबद्दल बोलण्यासाठी आलो होतो, तो कुठे आहे?” तो इकडे तिकडे बघत म्हणाला.

    “पार्थ! तुझं आता पार्थकडे काय काम आहे? सगळ्यांना दूर केलंस तसं त्यालाही करायचं आहे का? हं?” त्याच्यावर नजर रोखत त्यांनी विचारलं.

    “नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. पार्थ आणि माझी मुलगी शार्वीबद्दल मी बोलायला आलो होतो. पण वाटलं नव्हतं आपली भेट अशी होईल…” तो त्यांना म्हणाला.

    “ते सगळं ठीक आहे, तू तुझं काम बोल आणि चालता हो इथून…” त्या रागाने म्हणाल्या.

    “ते… माझी मुलगी शार्वी पार्थवर प्रेम करते. तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे… नाहीतर ती जीव देण्याची धमकी देत आहे, म्हणून आलो आहे इथं. प्लीज त्यांच्या लग्नासाठी होकार द्या आणि तिला तुमच्या घरची सून बनवा,” तो रिक्वेस्ट करत म्हणाला.

    हेही वाचा – शार्वीची वेगळी खेळी

    “मला तुझ्यासारख्या खुनी माणसाच्या घरात कोणतेही संबंध जोडायचे नाहीत. आधी जोडून बघितले… त्याचीच तर शिक्षा भोगतोय आम्ही. आता माझ्यात अजून एवढी शक्ती नाही की, मी अजून एक धोका सहन करू शकेन…” त्या काहीतरी आठवत म्हणाल्या.

    “वाहिनी, तो माझा जिवलग मित्र होता. तो मला माझ्या भावापेक्षाही जास्त होता. मी त्याचा कसा जीव घेईन? तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि तोही तुमच्या घरच्यांनी केलाय!” तो म्हणाला.

    “घरच्यांनी? आणि ते का करतील असं?” त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला.

    “सांगतो…” तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला.

    क्रमश:
    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026 ललित

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026 ललित

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    By हेमा पाटीलAugust 20, 2026

    भाग – 9 मोगऱ्याच्या वेलापाशी विचारात गढलेली उमा आपल्या पोटात काय असेल, मुलगा की मुलगी?…

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 402
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 541
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 863
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.