Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!
    ललित

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलAugust 20, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, हेकेखोर सासू पारूबाई, उमाची सासू पारूबाई, उमाचे माहेरपण, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, उमा आणि अनघा मामी, उमा मामी मैत्रिणी, उमा अनघा मैत्रिणी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 9

    मोगऱ्याच्या वेलापाशी विचारात गढलेली उमा आपल्या पोटात काय असेल, मुलगा की मुलगी? या विचाराने त्रस्त झाली आहे.

    “उमा, कुटं हायंस?  चल की जेवायला….” अशी हाक मारत आई बाहेर आली म्हणून उमा विचारांच्या आवर्तातून बाहेर आली. आई जर अचानक तिच्यासमोर येऊन उभी राहिली असती, तर आपली पोरगी कसल्या भीतीने एवढी त्रासली आहे, याचे तिला कोडे पडले असते.

    ती आईच्या मागोमाग आत गेली. जेवण झाल्यावर मामा परत गेला. मामी आणि आईने मागचे सगळे आवरले. नंतर आई शेताकडे गेली.

    आता मामी आणि उमा दोघीच घरात होत्या. दोघींच्या गप्पा रंगल्या. गप्पांच्या ओघात उमाने मामीला विचारले,

    “तुम्हाला काय वाटते मामी, मला मुलगा होईल का मुलगी?”

    “काय का होईना, त्याच्यापाशी काय आहे? आईला आपलं बाळ प्रिय असतं, मग तो मुलगा असला काय किंवा मुलगी!”

    “पण बाकीच्यांची अपेक्षा असेल तर?” उमा म्हणाली.

    “ही काय तुझ्या हातातली गोष्ट आहे का?  कशाला नाही तो विचार करतेस? उलट आता तू आनंदी रहायला हवंय. पोटात बाळ आहे तुझ्या. काय होईल ते होईल, बाळ-बाळंतीण सुखरूप असले म्हणजे झालेऍ तुला कुणी काही म्हटले का?”

    हेही वाचा – उमाच्या मनात नवी शंका

    “थेट म्हटले नाही, पण  त्यांच्या बोलण्यातून जाणवते की, त्यांना वंशाला दिवा हवाय.”

    “आले लक्षात. सासूबाईंची अपेक्षा असणार. लक्ष देऊ नकोस. आपल्या तब्येतीकडे लक्ष दे. स्वतःची काळजी घे. एकदा बाळ घरात आले की, सगळ्या अपेक्षा गुंडाळून ठेवतील बघ त्या.” मामी समजूतीच्या स्वरात म्हणाली.

    “असे नाही झाले तर?”

    “पुढचे पुढे बघता येईल. आत्तापासूनच कशाला डोक्यात घेऊन बसलीयस? नवरा काय टाकणार आहे का तुला? सासूनं काहीपण बोलू दे. ऐकून घ्यायचं, अन् खाली मान घालून गप्प बसायचं. ओरडून ओरडून आपल्या मनानं गप्प बसंल. उगा तोंडाला लागलं तर, भांडणं होतात आणि नात्यात पण बिघाड होतो… मला बघितलंय का कधी आज्जीला उलट बोलताना? त्यांची बडबड मला ऐकायलाच येत नाही आता, इतके मी दुर्लक्ष करायला शिकलेय.”

    हे ऐकून उमा खुदकन हसली. ती आजीची बडबड ऐकायचीच की!

    मामीशी बोलल्यामुळे तिला जरा हलके वाटले. मनावरचे मणामणाचे ओझे दूर झाले.

    “बरं, मामी आता भेळ खावीशी वाटतेय,” उमा म्हणाली.

    “आत्ता करते. हिरवी मिरची घालू की तिखट?”

    “तिखट घाला. मस्त झणझणीत करा, अन् चिंच जरा जास्तच घाला.”

    “चिंच जास्त खाऊ वाटतीय? मग मुलगीच होणार,” मामी हसत हसत म्हणाली ते ऐकून उमा म्हणाली,

    “पहिली बेटी धनाची पेटी.”

    “हो का? अन् मघाशी कसले खूळ आले होते मग!” मामी म्हणाली.

    हेही वाचा – कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    यावर हसत हसत उमा म्हणाली,

    “मला आज मिळणार आहे का भेळ? नाही तर माझ्या बाळाचा कान फुटेल. माझे डोहाळे पुरवा आधी, मग प्रश्न विचारा.”

    यावर मामी हसतच भेळ करायला उठल्या.

    क्रमश:
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026 ललित

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026 ललित

    मनावरचा घाव

    August 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    By दीपक तांबोळीAugust 19, 2026

    चपला काढून जसा सचिन घरात शिरताच, त्याच्या बायकोने, सुचिताने एक पाकीट त्याच्या हातात दिलं. “काय…

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 402
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 541
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 862
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.