Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, July 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…
    मैत्रीण

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेJuly 7, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, वटपौर्णिमा, आईची साडी, आजीची साडी, आईची नऊवारी साडी, आईच्या साडीची आठवण, वटपौर्णिमेची पूजा, नवऱ्याबरोबरचे सात जन्माचे कॉन्ट्रॅक्ट, नवऱ्याबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    नुकतीच वटपौर्णिमा झाली. माझा भलताच आवडता सण. अगदी लहान असल्यापासून! आईसोबत पूजेचं समान आणणे. तिला पूजेचं तबक भरायला मदत करणे… यात मी पुढे असायची. कधी कधी नव्हे तर, बरेचदा आईचा ओरडा खायची, चापट किंवा धपाटा सुद्धा खाल्ला… ‘सारखी लुडबूड करू नकोस’ असं म्हणून! सकाळ उजाडली की, मी तिला घरकामात मदत करून तयार व्हायचे. आई मात्र वर्षानुवर्षे एकच, मामाच्या मोठ्याईची (तिच्याच आईची) अंजिरी रंगाची (सोन्याची जर असलेली) जरीकाठी नऊवारी नेसायची (तिच्याकडे एकच नऊवारी साडी होती). वडाची पूजा झाल्यावर खेतवाडी आठवी गल्लीमध्ये नाना आजोबांच्या घरी जायचा शिरस्ता होता. तिथे जाऊन मामी आजी आणि बाकीच्या बऱ्याच बायकांना वाण देऊन घरी परत यायचं हा परिपाठ.

    नाना आजोबांचा कडक नियम होता, वटपौर्णिमेला घरी वाण द्यायला बायकांनी नऊवारीच नेसायची. त्यामुळे आई वर्षानुवर्षे तीच एक साडी नेसत होती. त्या साडीत तिच्या आईचा स्पर्श, प्रेम, आशीर्वाद पण होताच की! मी सुद्धा ती साडी खूप वेळा नेसली आहे. किती दिवस टिकणार ती बिचारी. माझ्या आजीच्या लग्नातली साडी माझ्या लग्नानंतर आईने तांबा काट्यावर जाऊन मोडली. साडी अगदीच विरली होती…

    हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…

    ओह, मी घसरले साडी पुराणावर! तर, अशी असायची माझी लहानपणीची वटपौर्णिमा. नाना आजोबा गेल्यावर मात्र आई वडावर नेहमीची, पण नवीन साडी नेसून जायला लागली. तिथेच हळदीकुंकू करून घरी यायची.

    मला मात्र दांडगी हौस. माझ्या लग्नानंतर माझी एकही वटपौर्णिमा हुकली नाही. आजारपण नाही, अडचण नाही काही नाही… कितीतरी वेळा सकाळी 7 वाजताच्या शिफ्टला मी पहाटे 4 वाजता वड पुजला आहे! दरवर्षी नवीकोरी साडी नेसून पूजेचं तबक घेऊन भर दुपारी सुद्धा अगदी अनवाणी पूजेला गेले आहे. कोरोना काळात मनाविरुद्ध तुळशीमध्ये वडाची फांदी खोचून पूजा केली.

    एकेवर्षी वटपौर्णिमेला मी साताऱ्यात शूट करत होते. ‘तारा फ्रॉम सातारा’ नावाची हिंदी सीरियल. घरी नवरा खूश. सात जन्मांचं कॉन्ट्रॅक्ट रीन्यू (renew) होणार नाही. मुले पण बाबासोबत खुशीत होती. झालं भलतंच! त्या दिवशी माझं शूट नव्हतं. मी हॉटेल वर एकटीच असणार होते. साताऱ्यात एक कुटुंब भेटलं. माझे फॅन होते ते. म्हणाले, “ताई, उद्या सुट्टी आहे ना तुम्हाला, मग आमच्या घरी याल का?” मी विचारलं की, “तुमच्या घराजवळ वड आहे का? मला पूजा करायला मिळेल का?” ते “हो” म्हणाले… मग मी तयार झाले. त्या वर्षी मी फ्रॉक घालून वड पुजला. फोटो काढून घरी पाठवले. कॉन्ट्रॅक्ट रीन्यू झालंच!

    हेही वाचा – Emotional scene : खरे अश्रू अन् खोटे अश्रू!

    माझ्या मुलीच्या पहिल्या पूजेला जावई आला होता आमच्याबरोबर, बायकोचे फोटो काढायला. सुनेची पहिली पूजा कोविड काळात झाली. घरासमोर तुळशीमध्ये फांदी खोचून…

    यावर्षी विरारमधली पहिली वटपौर्णिमा. अगदी माझ्या बेडरूमच्याच मागे छान फोफावलेला वटवृक्ष… भोवताली पार… सकाळपासून बायकांचे आवाज… लगबग, गप्पा, हसणं… खिडकीतून बघितलं, छान नटून थटून पूजेसाठी आल्या होत्या. सोबतीला नवरे पण! कौतुकाने फोटो काढत होते. पण माझी मात्र पूजा हुकली. सासुबाई गेल्या. अगदी चारच दिवस झाले  होते. भडभडून आलं… माझी पहिली पूजा आठवली. आम्ही दोघींनी घरच्या बाल्कनीत पूजा केली होती. यापुढे दरवर्षी आईंची आठवण तर राहणारच प्रत्येक वटपौर्णिमेला!

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    आजची ती…

    June 23, 2026 मैत्रीण

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026 मैत्रीण

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    आजची ती…

    By Team AvaantarJune 23, 2026

    नीलिमा कदम जांगडा चपाती शेकताना जेव्हा कधी कधी वाफ हातावर येते, तेव्हाच्या पोळल्याच्य वेदना कुकरचा,…

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026

    पित्याचा निर्णय!

    July 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन

    July 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 352
    • अवांतर 193
    • आरोग्य 127
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 480
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 24
    • ललित 764
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.