दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 जुलै 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 16 आषाढ शके 1948; तिथि : सप्तमी 13:24; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 16:23;
- योग : शोभन 14:30; करण : बालव 24:58;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर
टीम अवांतर
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत वाढलेल्या आणि सूक्ष्मजीवशास्त्रात पदवीधर असलेल्या पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी झाला. त्यांनी संगीत क्षेत्रातील कारकीर्द निवडली. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय (ख्याल , ठुमरी , टप्पा इत्यादी) आणि सुगम लोकप्रिय प्रकार ( गझल , गीत , भजन इत्यादी) दोन्ही गातात.
पद्मजा यांनी गायक पंडित जसराज यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. नंतर सारंगी वादक पंडित राम नारायण आणि संगीत दिग्दर्शक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून पुढील प्रशिक्षण घेतले.
हेही वाचा – संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!
ही शुभ्र फुलांची ज्वाला, रंग बावरा श्रावण आणि घर नचले नाचेला या त्यांच्या तीन अल्बममध्ये कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस आणि शांता शेळके या कवी-कवयित्रींनी लिहिलेल्या मराठी कवितांचा समावेश आहे. त्यांचे मराठी गझलांचा अल्बम तसेच ‘हे गगना’, ‘हे स्पर्श चांदण्यांचे’ आणि ‘मेघा रे’ नावाचे अल्बम देखील आहेत. तर, ‘गीत नया गाता हूँ’ नावाच्या अल्बममध्ये पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता गायल्या आहेत. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या कविता देखील संगीतबद्ध करून गायल्या आहेत.
त्यांचा ‘जिंदगी की जुबान’ हा गझल अल्बम आणि भक्तीगीत गायक अनुप जलोटा यांनी संगीतबद्ध केलेला ‘मंगलदीप’ नावाचा हिंदी भजनांचा अल्बम आहे. त्यांच्या ‘रंग’ या अल्बममध्ये हिंदीतील सुफी शैलीतील गाण्यांचा समावेश आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – तुमची खरी क्षमता ओळखा आणि त्यातून तुमचे महत्त्व अधोरेखित होईल. कामाचा ताण असला तरी, कार्य-क्षेत्रात तुमचा आवाका पाहायला मिळेल. निर्धारित वेळेच्या आधीच काम पूर्ण करू शकता. पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानलालसेने नवीन मित्र जोडाल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा.
वृषभ – शारीरिक तसेच मानसिक सुदृढतेसाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. भाऊ-बहिणींपैकी कुणी तुमच्याकडे उधार मागू शकतात. सहभागी झालेल्या सामाजिक कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. ही यात्रा मानसिक तणावही देऊ शकते. नोकरदारांनी विरोधकांच्या कारस्थानांपासून सतर्क रहावे.
मिथुन – नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी काही काळ केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल. सहकारी फार काही मदत देऊ शकणार नाहीत. कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, हे लक्षात ठेऊन रागावर नियंत्रण ठेवा. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर घरच्यांसोबत बोलू शकता. तुमच्या काही गोष्टी घरच्यांना चिंतीत करू शकतात; परंतु, यातून मार्ग नक्कीच निघेल.
कर्क – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आजच्या दिवशी मोठी गुंतवणूक करणे टाळा. आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावले जाणार नाही, याची दक्षता घ्या. तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठ खूश होतील. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी येण्याची शक्यता आहे.
सिंह – अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक टाळा. तुमच्या उदार वागणुकीचा नातेवाईक फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा. नवीन नोकरी शोधत असाल तर, चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायासाठी प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.
कन्या – मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. कोणाला तरी उधार दिलेला पैसा किंवा आधी गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळू शकतो. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबीयांसमवेत संवाद साधा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर द्विधावस्था देखील दूर होईल.
तुळ – अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत आनंद साजरा कराल. संततीच्या यशामुळे अभिमान वाटेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाईल आणि तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल. व्यवसायात नवे करार होतील, पण कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. कामच्या धबडग्यात स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक – कलात्मक छंदांमुळे आनंद मिळेल. जवळच्या मित्राच्या मदतीने काही जातकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन बऱ्याच समस्या दूर करू शकते. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्याचे आज टाळा. त्याबाबत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण इष्ट ठरेल.
हेही वाचा – कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…
धनु – या राशीच्या जातकांना आज स्वतःला समजून घेण्याची आवश्यकता आहे. जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहात, असे वाटत असेल तर, स्वत:साठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे आकलन करा. अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालविताना काळजी घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल.
मकर – इतरांना दुखवू नका. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. चांगल्या कामगिरीबद्दल नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे करार होतील. पण समोरच्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता, कागदपत्रे नीट तपासून घ्या.
कुंभ – आजचा दिवस अनुकूल आहे, कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. रिकामा वेळ कुठल्या तरी अनावश्यक कामात खराब होऊ शकतो. त्यामुळे कोणालाही मदतीसाठी हो म्हणताना, विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखीम असलेली गुंतवणूक टाळा किंवा जाणकाराच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा. अन्यथा नुकसान होऊ शकते.
मीन – नोकरीच्या ठिकाणी आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल, त्याने वरिष्ठ खूश होतील. जे जातक मित्र किंवा नातेवाईकांसोबत मिळून व्यवसाय करत आहेत, त्यांनी आज खूप विचार करून निर्णय घ्यावेत, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल, यासाठी वैद्याकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.


