Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 29 जून 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 08 आषाढ शके 1948;  तिथि : पौर्णिमा 29:26 ; नक्षत्र : मूळ 28:03;
    • योग : शुक्ल 14:25; करण : विष्टि 16:16;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वटपौर्णिमा

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रशांत चंद्र महालनोबीस

    टीम अवांतर

    जागतिक सांख्यिकी विज्ञानाच्या (संख्याशास्त्राच्या) क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबीस यांचा जन्म 29 जून 1893 रोजी कलकत्ता येथे झाला. कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजातून भौतिकीची बी.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर  केंब्रिज विद्यापीठाची भौतिकी आणि गणित या विषयांतील एम्.ए. पदवी त्यांनी संपादन केली.

    केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत आल्यावर महालनोबीस यांनी सांख्यिकीच्या तीन क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. बहुचरात्मक विश्लेषणात त्यांनी दोन समष्टींतील फरक दर्शविणारी ‘अंतर’ ही संकल्पना व ती मोजण्यासाठी D2 संख्यानक (सांख्यिकीय राशी) शोधून काढली. अंतर या संकल्पनेचा त्यांनी पुढे अधिक विस्तारही केला.

    हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    फिशर यांनी विकसित केलेल्या प्रयोगांच्या अभिकल्पासंबंधीच्या क्रांतिकारी पद्धती महालनोबीस यांनी भारतात कृषी प्रयोगांसाठी वापरण्याकरिता पुढाकार घेतला. या कार्यात त्यांना राजचंद्र बोस यांचे मोठे सहाय्य झाले. 1958मध्ये त्यांनी नॅशनल सँपल सर्व्हेमार्फत गोळा केलेल्या माहिती आशयाच्या विवरणासाठी आंशिक आलेखीय विश्लेषणाची पद्धती विकसित केली. या पद्धतीमुळे अशा माहितीचा अर्थ लावणे गणितीय दृष्ट्या अधिक सुलभ झाले.

    राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांतील पर्याप्त  गुंतवणुकीचे निर्धारण करण्यासाठी अर्थमितीय प्रतिरूपे त्यांनी  विकसित केली. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर पंडित नेहरूंच्या सल्लागार मंडळातील आर्थिक वृद्धी आणि विकासाबाबतच्या प्रश्नांसंबंधीचे एक तज्ज्ञ या नात्याने महालनोबीस यांनी राष्ट्रीय विकास योजना तयार करण्याचे बहुतांश वेळ कार्य केले.

    महालनोबीस यांना अनेक अमेरिकन, युरोपीय आणि आशियाई देशांतील संस्थांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या प्रदान केल्या होत्या. ऑक्सफर्डचे वेल्डन पदक आणि पारितोषिक, कलकत्ता विद्यापीठाचे सर्वाधिकारी सुवर्ण पदक, चेकोस्लोव्हाकिया ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सुवर्ण पदक यासारखे अनेक सन्मान त्यांना मिळालेले होते. भारत सरकारने 1968 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांची मानाची पदे त्यांनी भूषविली. भारतातील सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे संख्या हे नियतकालिक 1933 मध्ये महालनोबीस यांनी स्थापन केले आणि सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान त्यांनी प्राप्त करून दिले. विश्वभारतीच्या विश्वभारती पत्रिका या नियतकालिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले.

    टॉक्स ऑन प्लॅनिंग, ॲन ॲप्रोच ऑफ ऑपरेशनल रिसर्च टू प्लॅनिंग इन इंडिया,  एक्सपिरिमेंट्स इन स्टॅटिस्टिकल सँपलिंग सारखे ग्रंथ, तसेच अनेक वाङ्मयीन आणि तत्त्वज्ञानविषयक लेख, निबंध त्यांनी लिहिले. 28 जून 1972 रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. 2006पासून त्यांचा जन्मदिवस म्हणजे 29 जून हा दिवस  ‘सांख्यिकी दिन’ म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो.


    आजचे राशिभविष्य

    मेष – इतरांशी आज  वैयक्तिक गोष्टी बोलण्याऐवजी, शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्साहवर्धक आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जे दीर्घकाळ नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. पाहुण्यांच्या येण्याने घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीही दिवस अनुकूल आहे; उच्च शिक्षणाशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात.

    वृषभ – खर्च नियंत्रणात ठेवणे भविष्यात फायदेशीर ठरेल. नोकरीच्या ठिकाणी लवकरच तुमच्याकडे एक महत्त्वाची योजना दिली जाईल. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा, थोडासा निष्काळजीपणासुद्धा अडचणी निर्माण करू शकतो. रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळू शकते. एक महत्त्वाचा सौदासुद्धा तुमच्या बाजूने होऊ शकतो.

    मिथुन – कामाच्या ठिकाणी सतर्कता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. वरिष्ठांचा सल्ला गांभीर्याने घ्या, कारण त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यास मदत होईल. संततीच्या शिक्षणाबाबत काही चिंता निर्माण होऊ शकतात, पण योग्य निर्णय घेऊन त्या दूर होतील. परिस्थिती आव्हानात्मक झाल्यास, घाबरण्याऐवजी संयम बाळगा. उच्च शिक्षण आणि नवीन संधीचे मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुले होतील.

    कर्क – एखादी चांगली बातमी घेऊन येणारा आजचा दिवस असेल. संततीशी संबंधित चांगली बातमी आनंद देईल. तुमच्या मेहनतीला आणि समर्पणाला फळ मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कोणत्याही सरकारी कामात प्रगती होऊ शकते. चालताना आणि गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत मिळेल, ज्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करता येईल.

    सिंह – आज नातेसंबंधांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. वैवाहिक जीवनातील प्रेम आणि सामंजस्य पूर्वीपेक्षा अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तणावही हळूहळू दूर होईल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.  तुमची एखादी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. घाईचे निर्णय घेणे टाळा. आज तुमची कृती जितकी विचारपूर्वक असेल, तितकी ती अधिक फायदेशीर ठरेल.

    कन्या – आजचा दिवस तुम्हाला संयम आणि विवेकबुद्धीचे महत्त्व शिकवेल. एखाद्या सरकारी गोष्टीबद्दलची चिंता वाढू शकते, मात्र परिस्थिती लवकरच तुमच्या बाजूने फिरेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी, काही कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात. कायदेशीर बाबींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे इष्ट ठरेल.

    तुळ – आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणे योग्य ठरणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो त्यामुळे तुम्ही नवीन संधी शोधायला सुरुवात करू शकता. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकते.

    वृश्चिक – आज स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. किरकोळ शारीरिक समस्यांकडेही दुर्लक्ष करू नका. आईने तुमच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली, तर ती पार पाडा.  कौटुंबिक व्यवसायात काही आव्हाने निर्माण होऊ शकतात, परंतु तुमच्या भावांच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने ती सोडवली जातील. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.

    हेही वाचा – सलग 131 डॉट बॉल्स…

    धनु – नेतृत्व आणि जबाबदारीच्या पदांवर असलेल्यांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. कामे पुढे ढकलत राहण्याच्या सवयीमुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. आज पूर्ण एकाग्रतेने काम केले, तर येणारा काळ तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग खुले करू शकतो. विद्यार्थ्यांना आपली तयारी अधिक जोमाने करण्याची गरज आहे.

    मकर – मालमत्ता किंवा नवीन गुंतवणुकीबद्दल गांभीर्याने विचार कराल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून अडकलेला पैसा परत मिळवण्याचीही शक्यता आहे. मजबूत आर्थिक स्थितीमुळे आत्मविश्वास वाढवेल.  भविष्य सुरक्षित करण्यासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. ऑनलाइन व्यवसायात गुंतलेल्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी आणि  सर्व व्यवहारांचा काळजीपूर्वक विचार करावा.

    कुंभ – कठोर परिश्रम हे आज तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांचा सल्ला ऐकणे तुमच्या हिताचे आहे. उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.

    मीन –  बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली सरकारी कामे आज पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र महत्त्वाचे करार अंतिम करण्यात काही विलंब होऊ शकतो, त्यामुळे धीर धरा. नवीन सदस्य किंवा पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम राहील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 545
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.