Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home »  ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!
    ललित

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारJune 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, श्री जुईली प्रेमकथा, श्री जुईली विरहकथा, श्री जुईची प्रेमकहाणी, श्रीसाठी जुईलीचे झुरणे, जुईलीचा पुणे प्रवास, रेवतीसह जुईलीचा पुणे प्रवास, जुईलीसह रेवतीचा पुणे प्रवास, पुण्यात श्रीची भेट, गोवा पुणे ट्रेनला विलंब
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 20

    “जुये अगं थंडी असेल तिकडे या दिवसांत, स्वेटर घे आठवणीने.”

    “अगं आई आपल्यासारखाच पाऊस आहे तिकडे सुरू. पुणं असलं म्हणून काय झालं… तिकडेही पाऊसच!”

    “अगं होय का… मग छत्री घे.”

    “घेतलीये…”

    “खायच्या वस्तू ठेव गं या बॅगेत… पाठीला असेल ना ही…”

    “होय आई, ठेवते.”

    “मोजे कशाला हवेयत पाऊस आहे तिकडे तर?”

    “अगं आई मला झोपताना लागतात माहीत आहे ना…”

    “होय बाई घे. पण बाहेर घालू नकोस.”

    “आई! घरात घालायचे मोजे आहेत ना हे. बाहेर कशाला घालीन!” जुईली वैतागली तशी आई गप्पच झाली. जुईलीने ते बघितलं आणि तिच्या गळ्यात पडून म्हणाली, “आयू… अगं नीट व्यवस्थित जाईन मी. अज्जिबात काळजी करू नकोस. मी वन वुमन आर्मी आहे. स्ट्राँग अगदी. कळलं?”

    हेही वाचा – जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    “होय गं बयो… कळलं… काय करणार… आईचं काळीज…”

    “तू आई होशील तेव्हा कळेल तुला…” जुईली पटकन म्हणाली. “बरोबर ना? हेच ना पुढे?”

    त्याबरोबर आई खुदकन हसली. आणि जुईलीही तिच्यात सामील झाली.

    जुईलीची एक सॅक आणि एक लगेज बॅग असे दोन बॅग्ज तयार झाले. सगळं सामान तयार ठेवून जुईली रेवतीची वाट बघत बसली. बाबा रेवतीच्या बाबांना कॉल करत होते, इतक्यातच त्यांच्या गाडीचा बिल्डिंगखाली हॉर्न वाजला. रेवतीच्या गाडीचा हॉर्न घरातल्या सर्वांनाच परिचयाचा होता. त्यामुळे लगबगीने बाबा उठले. त्यांनी जुईलीची लगेज बॅग आपल्याकडे घेतली. “बाबा एक मिनिट! चार्जर राहिला माझा आणि इअरफोन पण!”

    “अगो बाई! तो आणि कसा विसरलीस? सलील कसा कानात गायचा मग तुझ्या!” आईने हसत म्हटले.

    “चला बाबा, घेतलं सगळं…”

    जुईली लगबगीने चार्जर आणि इअरफोन घेऊन बाहेर आली.

    “आयो, घाबरू नकोस तू… सलील मेरे कान में गायेगा. इअरपॉड्स पण आहेत घेतलेले, इअरफोन नसले तरी चालले असते,” जुईलीने सॅक घेत म्हटलं आणि बैठकीच्या खोलीतल्या गणपतीला नमस्कार केला.

    “येते गं आई…” म्हणून ती जायला निघाली. बाबा बॅग घेऊन आधीच जिना उतरू लागले होते.

    खाली रेवतीचे बाबा ड्राइव्हर सीटवर बसून वाट पाहत होते. मागे रेवती बसलेली. जुईलीचे बाबा आणि रेवतीचे बाबा दोघेही लहानपणापासूनचे मित्र. त्यामुळे दोघांचेही गुळपीठ चांगलेच जमायचे. जुईलीच्या बाबांनी गाडीची डिकी उघडून त्यात हातातली बॅग ठेवली आणि येऊन समोरच्या सीटवर बसले. जुईली रेवतीच्या शेजारी जाऊन बसली.

    “निघायचं का?” रेवतीच्या बाबांनी विचारलं.

    “गणपती बाप्पा मोरयाsss” म्हणून जुईलीच्या बाबांनी संमती दिली आणि गाडी निघाली.

    गाडी रेल्वे स्टेशनला पोहोचली तेव्हा कुठलीतरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली होती. कदाचित आत्ताच आली असावी म्हणून लोकांचा लोंढाच लोंढा स्टेशनमधून बाहेर येत होता. गर्दी ओसरू दे म्हणून सगळे थोडावेळ गाडीतच थांबले आणि प्लॅटफॉर्मवरची ट्रेन सुटल्यानंतर सगळे गाडीतून उतरले. जुईलीच्या बाबांनी डिकी उघडून जुईलीची आणि रेवतीची बॅग काढली. रेवतीची बॅग तिच्या बाबांनी हातात घेतली आणि सगळे स्टेशनच्या इमारतीकडे निघाले.

    “राजेश मी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आणतो आपले. तू जा पुढे यांना घेऊन,” जुईलीच्या बाबांनी रेवतीच्या बाबांना म्हटलं आणि ते तिकीट घ्यायला काऊंटरवर गेले. काही वेळाने त्या तिघांजवळ आले. प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर दोघीही बसल्या आणि त्यांचे बाबा एकमेकांशी गप्पा करण्यात दंग झाले.

    “रेवू, मला अजूनही नर्व्हसनेस वाटतोय गं…”

    “नको का जायला? सांगते थांब काकांना तुला घेऊन जायला. काकाssss” रेवतीने जुईलीच्या बाबांना हाक मारल्यामुळे बाबा तिच्याकडे बघू लागले. एवढ्यात जुईलीने रेवतीला कोपराने ढुशी दिली.

    “काही नाही काका… चहा आणू का म्हणत होते,” रेवतीने पटकन काहीतरी बोलून वेळ मारून नेली. बाबांनी हातानेच नकार दिला आणि ते पुन्हा तिच्या वडिलांशी बोलू लागले.

    “गप्प ना रेवू… आयत्या वेळी अशी कशी मस्करी करतेयस तू. मी माझं सांगतेय ना तुला. कसली घाई तुला! चालली लगेच काकांना सांगायला काकांची मांजर!”

    “ए… ठरलंय ना एकदा. मग परत परत काय ते तुणतुणं? गप्प बैस आता. पुरे कर तुझी कुरबुर. आता ठरलं तर ठरलं. जायचंय तर जायचंच!” रेवती रागावून म्हणाली, तशी जुईली गप्प बसली.

    हेही वाचा – श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    “आले थांब…” म्हणून रेवती स्टॉलवर चॉकलेट्स आणि काजू शेंगदाण्याचं पॅकेट आणायला गेली. जुईलीने मोबाइल उगीचच चेक केला. श्रीचं एकही नोटिफिकेशन नव्हतं. ती अजूनच उदास झाली.

    एवढ्यात रेल्वे अनाऊन्समेंट ऐकू आली –

    “सर्व प्रवाशांना सूचित करण्यात येते की, मडगाव येथून पुणे येथे जाणाऱ्या गोवा एक्सप्रेस रेल्वे क्र. 12779 गाडीच्या आगमनामध्ये आणि प्रस्थानामध्ये दोन तास विलंब झाला आहे. ​ही गाडी निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने येणार आहे. ​या विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांनी कृपया प्लॅटफॉर्मवर थांबून आपल्या गाडीच्या अद्ययावत वेळेसाठी रेल्वे सूचना फलकाचे निरीक्षण करावे… ​धन्यवाद.”

    रेवतीने स्टॉलवर जिथल्या तिथे रागाने पाय आपटला आणि इथे जुईली अजूनच तोंड पाडून बसली! दोघांच्याही बाबांनी माना हलवत आपली बसायची सोय बाजूच्या बाकड्यावर केली आणि आता त्यांच्या पुन्हा तेवढ्याच जोमाने गप्पा सुरू झाल्या.

    क्रमश:

    चला, प्रवासाची सुरुवात तर झाली. पण ट्रेन तर अजून दोन तास उशिराने येणार आहे. काय होतंय… बघूयात पुढच्या भागात

    स्नेहा सुतार

    Related Posts

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026 ललित

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026 ललित

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    By प्रणाली वैद्यJune 26, 2026

    भाग – 31 “मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण  अजूनपर्यंत मला त्याच्याशी…

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 341
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 739
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.