Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…
    ललित

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारJune 20, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, श्री जुईली प्रेमकथा, श्री जुईली विरहकथा, श्री जुईची प्रेमकहाणी, श्रीसाठी जुईलीचे झुरणे, जुईला श्रीचीच आठवण, जुईच्या विचारात श्रीच, दिवाळीची लगबग, जुईलीची रांगोळी, आईचा फराळ, गोव्यातील दिवाळी, श्रीच्या जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा, जुईलीच्या श्रीला दिवाळीच्या शुभेच्छा
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 19

    आतापर्यंत आपण पाहिलं की, श्री अचानक जुईलीशी बोलायचा बंद झाल्यामुळे जुई अस्वस्थ झाली. तिच्या मैत्रिणीने, रेवतीने, तिला श्रीला भेटायला जायची कल्पना सांगितली आणि जुईलीला ती आवडली. दिवाळीनंतर दोघांचंही गोव्याहून श्रीला भेटायला पुण्याला जायचं ठरलं. म्हणता म्हणता दिवाळी आली…


    दिवाळी येणार, आनंद फुलणार,

    अंगण सजणार, घरोघरी

    आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी…

    आईने पहाटे गाणं लावलेलं आणि जुईली बाहेर बसून रांगोळी काढत होती. जुईलीने पिंटरेस्टवरून काही दिवाळीचे रांगोळी डिझाईन्स ‘सेव्ह’ करून ठेवलेले. त्यातली एक निवडून ती रांगोळी घालायला बसलेली खरी, पण आज हवी तशी रांगोळीच जमत नव्हती… का कोण जाणे माहीत नाही, पण दिवाळीत पहिल्यांदाच जुईलीला रांगोळी घालताना मन लागत नव्हतं. हातातून मनापासून कलाकुसर निघत नव्हती. त्यामुळे जुईली जरा अस्वस्थ झाली.

    “अगं जुये, टेन्शन घेऊ नकोस. आवर पटकन,” आईला जुईलीची अस्वस्थता लगेच लक्षात आली.

    “छान जमतेय गं. हे फूल किती सुंदर दिसतंय इथे…” आईने कौतुक करत म्हटलं.

    “आई, आधीसारखा उत्साह नाहीच ना गं आताच्या दिवाळीत! आधी बघ कसं… सगळे आपापल्या परीने सजावट करायचे. आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, मग फराळ… सगळं कसं आनंदित दिसायचं. मुलांचा तर किती धुडगूस असायचा. आता काहीच उरलं नाही ना गं!”

    हेही वाचा – …होई का असे तुलाच स्मरताना?

    “अगं, हातात ते यंत्र आलं ना… सगळे त्याच्यातच! दिवाळी पण आता त्यातच साजरी होते. सगळं ‘व्हर्च्युअल’ झालंय बाई… आता आनंद, दुःख, उत्साह, शुभेच्छा सगळं ‘व्हर्च्युअल’… कुठेय तो ओलावा, ते प्रेम…. बघ ना, विचार कर. कुठे बदललं सगळं नेमकं? मोबाइल हातात आल्यापासून… नाहीतर सगळं किती छान असायचं.”

    “हो गं आई. दिसतात हल्ली सेलिब्रेट करताना माणसं… पण तेही मोबाइल हातात घेऊनच! मोबाइलशिवाय नाहीच कुणी!! एकतर ‘सेल्फ्या’, ‘फोटो’, नाहीतर व्हिडीओ… त्याशिवाय, साजरे होतायत कुठे हल्ली सण…”

    “नाहीतर काय, नकोते एकेक!” ताटातली शेवटची पणती रांगोळीच्या मध्यभागी ठेवून आई आत जायला निघाली.

    “अगं आई, तो बघ ना रेशमकाकूंच्या घरातला कंदील कसला भारी वाटतोय ना. अगदी आधी जशा नेवऱ्या नेवऱ्या करायचे, कात्रीचं फूल, त्या फुलात फूल… अगदी ‘अँटिक’!”

    “हो गं, काकांनी आणि त्यांच्या मुलांनी बनवलाय म्हणे. पाच दिवस करत होते. पोरं ऑफिसवरून येऊन काम करत बसायची. बघ किती बारीक बारीक काम केलंय. आतला भाग पण फिरतोय तसा बनवलाय बघ.”

    “भारीच!”

    “आता चल आत. आवरून, पोहे वैगेरे बनवायला मदत कर मला जरा.”

    “हो गं आई येते थांब. झालंच…”

    आई आत गेली तशी शेवटचं रांगोळीतलं पान बनवून जुईली उठली. रांगोळीचा डबा घेऊन आत गेली. घरात येऊन तिने मोबाइल हातात घेतला आणि व्हॉट्सअॅप चेक केलं…

    ‘Happy diwali’

    ‘दिवाळीच्या शुभेच्छा’

    ‘दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा’

    ‘शुभ दीपावली’

    यासारखे मेसेजेस व्हॉट्सअॅपवर येत होते. सर्वांना रीप्लाय करून तिने श्रीचं प्रोफाइल उघडलं. तो ऑनलाइन होता. ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ तिने टाईप करायला घेतलं, एवढ्यात त्याचाच मेसेज आला. ‘दिवाळीच्या तुला आणि तुझ्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!’

    हेही वाचा – जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    तिची खरी दिवाळी आता सुरू झाली. ‘दिवाळीच्या तुलाही खूप शुभेच्छा!’ तिने रीप्लाय केला. ‘कुठे आहेस रे, किती मेसेजेस करतेय, काय हे वागणं!’ तिने पुन्हा मेसेज केला. तिला वाटलं की, याला सगळे जाब विचारावेत. किती दिवस किती वाट पाहिली याचं सगळं उट्टं काढावं आज. पण दिवाळी असल्याने ती संयमित फक्त एवढंच बोलली.

    पलीकडून काहीच रीप्लाय आला नाही. काही वेळाने ब्लू टिक झाला मेसेज आणि ‘मी आहे’ असा मेसेज आला.

    ‘हे काय आता? मी काय बोलतेय, तू काय बोलतोयस. ‘मी आहे’ म्हणजे? असं असतंय का? मजा बघतोय का हा माझी… आनंद घेतोय. आसुरी आनंद! काय मिळतंय हे करून? का करतोय हे सगळं? मला बाहेर फेकलंय याने? सगळ्यातून, स्वतःच्या जगातून, स्वतःतून? काय वागणं…’

    आईची हाक ऐकू आली, तसा जुईलीने डोळे पुसून मोबाइल ठेवून दिला. काही उपयोग नाहीये! काही कुणाला पडलेलं नाहीये. रागातच तिने किचनकडे मोर्चा वळवला. आई पोह्यांना फोडणी देत होती.

    “कुकरमधले वाटाणे काढ गं, थंड झालाय बघ कुकर.”

    “हो.” म्हणून जुईलीने कुकरला हात घातला. तिने आईला दिवाळी फराळात मदत करायला सुरुवात केली. बाबांचं अभ्यंगस्नान आटोपून ते देवपूजा करायला देवघरात गेले. इकडे आता आई आंबड्याचं सासांव करायच्या तयारीला लागली. जुईलीने तिला आंबाडे तासून दिले. बाबांची पूजा होतेय तोवर सगळा फराळ हा हा म्हणता तयार झाला. रवा लाडू, बेसन लाडू, चकल्या, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, अनारसे, चिवडा, शेव तयार होतेच. आता बटाटा पोहे, गोड पोहे, रोसाचे पोहे, वाटाण्याची उसळ, आंबड्याचे सासांव सगळं तयार झालं. जुईलीने दोन पाटांभोवती रांगोळी काढली. बाबा आणि जुईली पाटावर बसले, त्यांना आईने औक्षण केलं. फराळाची ताटं पुढ्यात आली आणि तिघेही फराळाला बसले.

    जुईलीची दिवाळी आनंद पसरवत होती. पण मनात मात्र एकच ज्योत तेवत होती… एकच ध्यास… श्री, श्री आणि श्री…

    क्रमश:

    दिवाळी तर झाली, आता पुढे काय? बघुयात पुढच्या भागात…

    स्नेहा सुतार

    Related Posts

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026 ललित

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026 ललित

    शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!

    June 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    By प्रदीप केळुस्करJune 20, 2026

    पूर्वार्ध साईनाथ नाट्यमंडळाची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. मंडळाचा दिग्दर्शक…

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!

    June 19, 2026

    नमकीनचं दुकान अन् त्याचा सेठ…

    June 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन

    June 20, 2026

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026

    Dnyaneshwari : वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे

    June 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 334
    • अवांतर 190
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 461
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 21
    • ललित 720
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.