Author: स्नेहा सुतार

भाग – 20 “जुये अगं थंडी असेल तिकडे या दिवसांत, स्वेटर घे आठवणीने.” “अगं आई आपल्यासारखाच पाऊस आहे तिकडे सुरू. पुणं असलं म्हणून काय झालं… तिकडेही पाऊसच!” “अगं होय का… मग छत्री घे.” “घेतलीये…” “खायच्या वस्तू ठेव गं या बॅगेत… पाठीला असेल ना ही…” “होय आई, ठेवते.” “मोजे कशाला हवेयत पाऊस आहे तिकडे तर?” “अगं आई मला झोपताना लागतात माहीत आहे ना…” “होय बाई घे. पण बाहेर घालू नकोस.” “आई! घरात घालायचे मोजे आहेत ना हे. बाहेर कशाला घालीन!” जुईली वैतागली तशी आई गप्पच झाली. जुईलीने ते बघितलं आणि तिच्या गळ्यात पडून म्हणाली, “आयू… अगं नीट व्यवस्थित जाईन मी. अज्जिबात…

Read More

भाग – 19 आतापर्यंत आपण पाहिलं की, श्री अचानक जुईलीशी बोलायचा बंद झाल्यामुळे जुई अस्वस्थ झाली. तिच्या मैत्रिणीने, रेवतीने, तिला श्रीला भेटायला जायची कल्पना सांगितली आणि जुईलीला ती आवडली. दिवाळीनंतर दोघांचंही गोव्याहून श्रीला भेटायला पुण्याला जायचं ठरलं. म्हणता म्हणता दिवाळी आली… दिवाळी येणार, आनंद फुलणार, अंगण सजणार, घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी… आईने पहाटे गाणं लावलेलं आणि जुईली बाहेर बसून रांगोळी काढत होती. जुईलीने पिंटरेस्टवरून काही दिवाळीचे रांगोळी डिझाईन्स ‘सेव्ह’ करून ठेवलेले. त्यातली एक निवडून ती रांगोळी घालायला बसलेली खरी, पण आज हवी तशी रांगोळीच जमत नव्हती… का कोण जाणे माहीत नाही, पण दिवाळीत पहिल्यांदाच जुईलीला रांगोळी घालताना मन…

Read More

भाग – 18 रेवतीचा कॉल दोन वेळा येऊन गेला… दोन मिसकॉल्स! बापरे! धिंगाणा करेल माझ्या नावाचा… म्हणत जुईलीने रेवतीला कॉल करायला घेतला… “अगं, आहेस ना जिवंत? किती कॉल केले?” “पुरे गं! दोनच मिसकॉल्स आहेत पडलेले. श्री सारखं वाढवून सांगू नकोस.” “अय… पुरे तुझ्या श्रीचं. मी म्हणजे तो नव्हे! मला नको म्हणूस त्याच्यासारखं. बघ जरा व्हॉट्सॲप. त्यावर पण कॉल पडले असतील. व्हिडीओ कॉल पण करत होते, तुला मघापासून!” “आयो… अगं मी बाहेर बसलेले. आई-बाबांसोबत. त्यांना सांगितलं आपलं पुण्याला जायचं. फोन सायलंटवरच असतोय गं हल्ली. नाहीतर माझं लक्ष सारखं आपलं फोनवरच राहतं.” “हां बाई कळलं तुझं. बाय द वे काका, काकू काय…

Read More

भाग – 17 रेवतीसोबत घरी आलेली जुईली बरीच खुलली होती. घरी आल्या आल्या चक्क हसली! आई-बाबा बघतच राहिले. त्यांना बरं वाटलं खरं, पण एकाएकी झालं काय एवढं… त्यांनाही हा प्रश्न पडला. काही वेळ सर्वांशी गप्पा मारून रेवती जायला निघाली. आईने तिला जेवायला थांबायचा आग्रह केला तरीही, ‘महत्त्वाचं काम आहे,’ असं म्हणून तिने जुईलीला डोळा मारला आणि ती निघालीच. रेवतीचा निरोप घेऊन जुईलीने हात-पाय धुतले आणि स्पीकरवर गाणं लावलं. सलीलनेच संगीत दिलेलं… माझ्या मना रे ऐक जरा हळवेपणा हा नाही बरा ती गुणगुणतच खिडकीत बसून विचार करू लागली… खरंतर, तिला थोडी भीती वाटत होती. असं कसं जायचं ना एकाएकी! ‘हा इतका…

Read More

भाग – 16 जुईलीच्या चेहऱ्यावरचं हसू रेवतीला एक आंतरिक समाधान देऊन गेलं. किती दिवसांनी जुईली अशी मोकळी झाली होती! जुईलीने हर्षेजचा एक घोट घेतला आणि रेवतीला कोपरखळी मारली… “अगं वेडे! आता मी जर ‘आयडिया बुरा तो नहीं है’ म्हटलं, तर तू लगेचच प्लॅनिंग सुरू करणार हे मला माहीत होतं.” रेवतीने आपली कॅडबरी बाजूला ठेवली. “तर मग! आता वेळ नाही घालवायचा जुये. बघ, दिवाळीच्या सुट्ट्या परवापासून सुरू होतायत. म्हणजे, आपल्याकडे कमीत कमी पंधरा दिवस आहेत. आता आपण प्लॅन करूया!” रेवती उत्साहाने बोलत होती. तिने हात जुईलीच्या खांद्यावर अलगद ठेवला. “बघ, पुणे म्हटलं की मोठी ट्रॅव्हल आहे. फ्लाइटने जायचं, की ट्रेनने?” “ट्रेन……

Read More

भाग – 15 रेवतीने गाडी सुपरमार्केटकडे थांबवली. “आलेच मी, इथेच थांब…” म्हणून तिने गाडी लावली आणि जुईलीला तिथेच थांबायला सांगून ती आत गेली. पाचेक मिनिटात परतली सुद्धा. हातातली कापडी पिशवी तिने गाडीत टाकली आणि गाडीवर बसून गाडी स्टार्ट केली. “बस चल पटकन…” म्हणून जुईली गाडीवर बसताच रेवती निघाली. “जुये, अगं तुला आता सुट्ट्या लागल्या ना दिवाळीच्या, की जरा पणजीत जाऊन येऊयात. लॅपटॉप दुरुस्तीला टाकूयात. जास्त काम नसेल, पण दुरुस्त होईपर्यंत आपण फिरून येऊयात कुठेतरी. नाहीतर मॉलमध्ये जाऊया.” “हं…” “नुसती हं हं करत रहा गो बाई जुई… बरं वाटतं मला. नाहीतर सायलंट मोडवर टाकल्यासारखं तुला.” “ही काय, बोलतेय ना!” “नको गोss…

Read More

भाग – 14 “माझ्याकडे बघ इकडे. मी काय सांगतेय बघ… ऐक!” रेवती तावातावाने बोलू लागली तशी जुईली दचकली. “काय गं काय म्हणतेय मी, स्वतःकडे बघितलंयस का कशी झालीयेस ती? काही होतंय का तुला? काय चाललंय तुझं हे सगळं? स्वतःविषयी काही वाटतं की नाही तुला? की त्याच्या हातचं खेळणं आहेस? हवं तेव्हा जवळ केलं, हवं तेव्हा लांब… आणि तुला काही अक्कल? स्वतःचं असं करू द्यायचं दुसऱ्या कुणामुळे? हे बघ… आरसा बघ हा. यात कोण दिसतंय? ही तू आहेस? ही अशी??” रेवतीचा स्वर तीव्रच होत चाललेला. तिला उत्तर देण्यासारखं आत्ता तरी जुईलीकडे काहीच नव्हतं आणि ती गप्प राहतेय ते बघून रेवतीचा अजूनच…

Read More

भाग – 13 गुंता वाढत चाललाय जुईली… विसर… हे विसर. गुंतव स्वतःला कशात तरी जुईली… तुला आवडतंय ते कर. चल ब्रश आणि कॅनव्हास उचल… घे हवे ते रंग, हवे तसे, हवे तेवढे… उतरव तुझ्या कॅनव्हासवर… उठ जुईली.. उठ… जुईलीने घड्याळात बघितलं. रात्रीचे दोन वाजलेले. हे आतून कुणीतरी जुईलीला हाका देत होतं. अगदी आतून, तळाशी…! एवढा वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होत जुईलीने कितीतरी उमाळे गिळले. कितींदा रडूनही घेतलं. नाही, नव्हे… ही जुईली नव्हेच. निखळ हसणारी, इतरांना हसवणारी… सतत कशा ना कशात गुंतलेली… ती ही जुईली नव्हेच… कोण आहेस तू? उठ जुईली, आता बस झाली स्वतःशी स्वतःची बेईमानी, कळतंय ना तुला?…

Read More

भाग – 12 “जुईली… ए जुईली…” आईच्या आवाजाने जुईली दचकून जागी झाली. “अगं दिवेलागणीची वेळ आहे, काळोख का केलायस तो… आणि असं झोपू नये यावेळी. ऊठ चल, तोंड धू. देवापुढे बसून नामस्मरण कर जरा वेळ. बरं वाटेल.” असं म्हणून आईने खोलीतल्या लाइटचं बटण चालू केलं. जुईली उठली. छातीवरचं पुस्तक तिने पान क्रमांक बघून झाकून ठेवलं. पुस्तक वाचता वाचताच तिला डोळा लागलेला. आरामखुर्चीत अंगाची मुटकुळी करून जुईली कधी झोपी गेली तिचं तिलाच कळलं नाही. सवयीप्रमाणे तिने मोबाइलवर नोटिफिकेशन बघितलं. आता श्रीचा मेसेज येणार नव्हता. तरीही… कधीपासून अशी मुटकुळी करून राहिल्यामुळे जुईलीच्या पायांना मुंग्या आलेल्या. म्हणून जरा तिने पाय मोकळे सोडून पायांची…

Read More

भाग – 11 अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे जशी ओली हूर हूर तरारते रानभर    तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर… सरीवर सर… संदीपचं गाणं सुरू होतं… पावसाच्या सुया नुसत्या मी मी म्हणून समोर गाडीच्या काचेवर आदळत होत्या… आणि श्री जुईलीचा हात गिअरवर ठेवून, आपला हात तिच्या हातावर ठेवून अटल सेतूवरून जात होता… जुईलीचा आनंद त्याच्या एकूण असण्यावरूनच जाणवत होता. ती नेहमीची गंभीर, विचारात असणारी जुईली आज जणू फुलपाखरू झाली होती… आज अगदी मनमोकळेपणाने बोलत होती, हसत होती… “या सेतूवर अगदी आकाशातून उडत जातोय, असं वाटतं नाही रे?” “होय ना, आणि…

Read More