नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
3 जानेवारी 2011ला आमच्या सोसायटीमध्ये बेबी नावाच्या डॉगीने 7 पिल्लांना जन्म दिला. तीन महिने माझा नवरा, मुलगा आणि मुलगी या तिघांनी बेबीचं बाळंतपण केलं. मग तिच्या सहा पिल्लांना adoption मिळवून दिलं. सातवी म्हणजे जन्माने तिसरी असलेली ब्रँडी… आम्हीच तिचं नामकरण केलं. तिच्या इतर भावंडांच्या मानाने अर्ध्या मापाची जन्माला आलेली माझी ब्रँडी. तिला न्यायला टिटवाळ्याहून दोन मुले आली होती. तिला ट्रेनने नेणार होते. आम्ही म्हटलं की, नको आम्ही स्वतः गाडीने तिला आणून सोडू. पण छे तो योग काही आलाच नाही. ब्रँडी आमच्याच घरी राहिली. एरवी कुत्र्यांना घाबरणारी मी कधी विरघळले मलाच कळलं नाही… ती माझ्या डोक्यावर कधी बसली, आमची मालकीण कधी झाली कळलंच नाही!
हेही वाचा – जयू आत्या… स्मृतीबंध!
माझ्या कुशीत झोपायची. मी आजारी पडले होते तर, माझं डोकं स्वतःच्या कुशीत घेऊन झोपायची. माझ्या मुलीचे टी-शर्ट्स घालायला तिला आवडायचे. खूप लाडवलेली होती. गेली 15 वर्षे एक मुका जीव आपल्यासोबत आहे… पण हा जीव म्हणजेच ब्रँडी खूश तर आहे ना? तिच्या काही इच्छा तर अपुऱ्या राहिल्या नाहीत ना? हे जाणून घेण्यासाठी मी एका संवादक म्हणजे communicator शी संपर्क साधला. खूप छान होता तो अनुभव… ब्रँडीच्या मनातलं सारं उलगडत गेलं… किती आणि काय काय! मुळात असेही काही असू शकतं, हे मला थोडं फार माहीत होतं, पण एवढं डीटेलमध्ये असेल अशी कल्पना नव्हती.
हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
तब्बल 15 वर्षे 2 महिने आणि 25 दिवस ती आमच्या सोबत राहिली. खूप प्रेम दिलं, घेतलं… आणि 30 मार्च 2026ला ती पुढल्या प्रवासाला निघून गेली… खूप काही तुटलं, संपलं. आयुष्यात काहीच राहिलं. एवढं काहीतरी होत होतं आणि दुसऱ्याच एका संवादिकेचा फोन आला आणि अजून काही गोष्टी समजल्या. त्या विषयावर लवकरच लिहीन. तूर्तास माझ्या लाडक्या ब्रँडी बाळाला आत्मशांती तसेच पुढील प्रवासासाठी सदिच्छा.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


