Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान
    आरोग्य

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    डॉ. शैलेंद्र वैशंपायनBy डॉ. शैलेंद्र वैशंपायनNovember 1, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आरोग्यम् परमम् धनम्, Homoeopathy, होमिओपॅथी, डॉ शैलेंद्र वैशंपायन, डॉक्टर शैलेंद्र वैशंपायन, लेखक शैलेंद्र वैशंपायन, होमिओपॅथी डॉक्टर वैशंपायन, होमिओपॅथी आख्यान, होमिओपॅथी रंजक कथा, होमिओपॅथीची माहिती, होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हॅनिमन, मटेरिया मेडिका, औषधांचा माहिती कोष, चरकसंहिता, भारतीय वैद्यकीय परंपरा
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सर्वात आधी ही ‘मटेरिया मेडिका’ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा विषय तसा बराच मोठा आणि काहीसा किचकट आहे. पण मी तो शक्य तितका सोपा करून, वैद्यकीय शिक्षण नसलेल्या सामान्य माणसालाही सहज समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो…

    सोप्या शब्दांत सांगायचं तर, मटेरिया मेडिका म्हणजे औषधांची माहिती देणारा ग्रंथ. कोणत्या वनस्पतीचा, प्राणिजन्य पदार्थाचा, खनिजाचा किंवा इतर नैसर्गिक पदार्थाचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो, त्याचे गुणधर्म काय आहेत आणि तो कोणत्या आजारात वापरला जातो — अशी माहिती एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता.

    भारतीय वैद्यकीय परंपरेतील चरकसंहितासारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही औषधी द्रव्ये, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचा चिकित्सेतील उपयोग यांचे विस्तृत वर्णन आढळते. त्यामुळे ‘औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान’ ही कल्पना भारतासह अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये फार पूर्वीपासून अस्तित्वात होती.

    हेही वाचा – Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    पाश्चात्त्य वैद्यक विकसित होत असताना मात्र या औषधविषयक ज्ञानाला हळूहळू अधिक व्यवस्थित स्वरूप मिळू लागले. वनस्पती, खनिजे, प्राणिजन्य पदार्थ, विविध अर्क आणि इतर औषधी द्रव्ये यांची माहिती एकत्र करून त्यांचे चिकित्सेतील उपयोग नोंदवण्याची परंपरा विकसित झाली.

    हे घडत असताना युरोपचा इतिहास मात्र सरळ रेषेत पुढे गेलेला नव्हता…

    रोग म्हणजे केवळ शरीरातील बिघाड, ही आज आपल्याला स्वाभाविक वाटणारी कल्पना त्या काळात सर्वत्र स्वीकारलेली नव्हती. अनेक समाजांमध्ये रोगाचा संबंध देवाचा कोप, पाप, दुष्ट शक्ती, भूतबाधा किंवा जादूटोणा यांच्याशी जोडला जात असे. उपचारांमध्ये धर्म, श्रद्धा, लोकपरंपरा आणि उपलब्ध वैद्यकीय ज्ञान यांची अनेकदा सरमिसळ झालेली दिसते.

    युरोपच्या इतिहासात जादूटोण्याच्या आरोपाखाली हजारो स्त्रिया आणि पुरुषांवर खटले चालवले गेले आणि अनेकांना मृत्युदंडही देण्यात आला. घरगुती उपचार, वनस्पतींचे ज्ञान किंवा लोकवैद्यक जाणणाऱ्या स्त्रियांनाही काही वेळा संशयाच्या नजरेने पाहिले गेले. पण याच सामाजिक आणि वैचारिक वातावरणात दुसऱ्या बाजूला काही वैद्य, अभ्यासक आणि वनस्पतिशास्त्रज्ञ एक वेगळाच प्रयत्न करत होते.

    हेही वाचा – Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    “श्रद्धा काय सांगते?” यापेक्षा “प्रत्यक्षात कोणता पदार्थ औषध म्हणून वापरला जातो आणि त्याचा उपयोग काय?” याची नोंद करण्याचा प्रयत्न.

    कोणती वनस्पती औषधी आहे?

    कोणते मूळ, साल, फूल किंवा बी वापरले जाते?

    कोणत्या प्राणिजन्य पदार्थाचा उपयोग होतो?

    कोणते खनिज वापरले जाते?

    त्याचा अर्क कसा तयार करायचा?

    आणि सर्वांत महत्त्वाचे — तो कोणत्या आजारासाठी वापरायचा?

    अशा उपलब्ध ज्ञानाला एकत्र आणून, शक्य तितक्या पद्धतशीर रीतीने मांडणारे ग्रंथ तयार होऊ लागले… आणि औषधी पदार्थांविषयीच्या या संकलित ज्ञानाला नाव मिळाले—

    ‘मटेरिया मेडिका’!

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शैलेंद्र वैशंपायन

    डॉ. (प्रा.) शैलेंद्र आर. वैशंपायन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डॉ. व्ही.’ या नावाने परिचित आहेत. त्यांना 26 वर्षांचा चिकित्सकीय आणि 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते होमिओपॅथीवरील चार पुस्तकांचे आणि चार शोधनिबंधांचे लेखक असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित होमिओपॅथिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली असून ‘Dr V’s World of Homoeopathy’ हा त्यांचा पॉडकास्टही आहे. थायरॉईड विकार, चिकित्सकीय संशोधन आणि हॅनिमॅनियन होमिओपॅथी ही त्यांच्या विशेष अभ्यासाची क्षेत्रे आहेत.

    Related Posts

    शरीरात उष्णता अधिक आहे? हे घरगुती उपाय करून पाहा…

    October 31, 2026 आरोग्य

    बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    October 29, 2026 आरोग्य

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    शरीरात उष्णता अधिक आहे? हे घरगुती उपाय करून पाहा…

    By Team AvaantarOctober 31, 2026

    अनेकांना शरीरात उष्णतेचा त्रास जाणवतो. परिणामी पुढील तक्रारी पाहायला मिळतात. डोळ्यांची आग छातीत जळजळ अंगावर…

    बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    October 29, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026

    ब्रेड आवडतो? मग विकत घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा…

    October 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 490
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 657
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1031
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.