मेष : मोठ्या गुंतवणुकीची शक्यता
- या आठवड्यात नोकरदार जातकांना कामाचा ताण जाणवेल. काही जातकांना पगाराबरोबर बोनस देखील मिळेल. त्यामुळे मनासारखी खरेदी करू शकाल, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. यामुळे मोठे समाधान मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. त्यांच्या योजना सफल होतील. व्यापारात मोठी उलाढाल होईल. भागीदाराचे अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे मोठी गुंतवणूक करू शकाल. महिला स्वतःसाठी खरेदी करू शकतील. त्यांची भावंडांसोबत भेट होईल. विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकार यांच्यासाठी मोठी संधी चालून येईल, त्यामुळे प्रसिद्धी आणि पैसाही मिळेल.
वृषभ : कामात निश्चित यश
- या आठवड्यात नोकरदार जातकांच्या चौथ्या स्थानात गुरू येत आहे. त्यामुळे कामात निश्चित यश मिळेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन करू शकाल. आई-वडील, भावंडे घरी येतील. त्यामुळे आनंदी वातावरण असेल. कामानिमित्त अथवा कुटुंबासोबत प्रवास कराल. व्यावसायिकांना चांगल्या ओळखीतून नवीन उत्तम संधी मिळतील. फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. यामुळे स्वतःची नवी ओळख निर्माण करता येईल. महिलांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मात्र स्वतःची आणि पालकांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. उत्तम यश मिळेल.
मिथुन : आनंददायी बातम्या मिळतील
- या आठवड्यात शुभ आणि आनंददायी बातम्या मिळतील. नोकरदार जातकांना विशिष्ट प्रकारची जबाबदारी स्वीकारावी लागेल. एखादे महत्त्वाचे काम आव्हान म्हणून स्वीकारा. त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. व्यावसायिकांना त्यांच्या हरहुन्नरी स्वभावामुळे व्यापारात फायदा होईल. नवीन ओळखी होतील आणि त्यातून नवीन कामे मिळतील. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकाल. घराचे नूतनीकरण करण्यासाठी महिला पुढाकार घेतील. दिवाळीच्या निमित्ताने घरी पाहुणे येतील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल, त्यामुळे वातावरण आनंदी असेल.
कर्क : वाहन खरेदीचा योग
- या आठवड्यात उत्साही वातावरण असेल. नोकरदारांना रखडलेली कामे आत्मविश्वासाने पूर्ण करता येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून वेळॆवर मदत मिळू शकेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. घरातील तरुणांचे विवाहविषयक किंवा नोकरीविषयक प्रश्न मार्गी लागतील. नवीन वाहन खरेदी करू शकाल. महिलांच्या इच्छा पूर्ण होतील. त्या मनाप्रमाणे खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांनी वस्तुस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, आनंदी रहावे.
सिंह : भाग्याची मोठी साथ
- या आठवड्यात तुमच्या राशीत गुरू महाराज येत आहेत. भाग्याची मोठी साथ तुम्हाला मिळेल. नोकरदारांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, त्यामुळे कामे उत्साहात पूर्ण करू शकाल. सगळ्यांना कामात मदत करू शकाल. वेळेचे आणि कामाचे नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. ज्या क्षेत्रात काम कराल, तिथे यश मिळेल. महिला आनंदाने एखादी जबाबदारी पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, त्यांच्यासोबत पिकनिकला जाऊ शकाल.
हेही वाचा – माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू
कन्या : नवीन संधी मिळतील
- हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. मात्र नोकरदारांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. स्वतःचे कार्यक्षेत्र ओळखून त्यानुसार अधिकाराचा वापर करावा. कोणाला काही सांगायला, शिकवायला जाऊ नये. व्यावसायिकांनी महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करावे. कामानिमित्त करावे लागणारे प्रवास फलदायी ठरतील. व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकेल. महिलांना बँकेच्या कामात अडथळे येतील. त्यामुळे सतत तिथे जावे लागेल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे. कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
तुळ : आनंदी वातावरण
- या आठवड्यात घरात आनंदी वातावरण राहील. नोकरदारांना कामाचा थोडा ताण जाणवेल. नवीन ओळखी होतील. दिवाळीच्या निमित्ताने स्वतःसाठी खरेदी करू शकाल. तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिकांना नवीन संकल्पना अमलात आणता येतील. तुमच्या आधी केलेल्या मेहनतीचे, जाहिरातीचे आता चांगले फायदे मिळू शकतील. दिवाळीच्या कारणांमुळे महिलांचा रोजचा दिनक्रम बदलून जाईल, त्यामुळे त्यांची थोडी धावपळ होईल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
वृश्चिक : अचानक लाभ
- या आठवड्यात अचानक लाभ होईल. नोकरदारांनी शांत राहून लहान-मोठे निर्णय स्वतः घ्यावे. इतरांचे नक्कीच ऐकून घ्या, पण निर्णय घेताना स्वतः विचार करून मगच पुढे जा. कोणावरही अवलंबून राहू नका, स्वतःची कामे स्वतः करा. व्यावसायिक दिवाळीच्या निमित्ताने सतत कामात मग्न रहातील. राजकारणापासून, गटबाजीपासून लांब राहा. सत्तेचा गैरवापर करू नका. स्पर्धकांपासून सावध राहा. महिलांनी मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लहान मुलांना जपावे. विद्यार्थ्यांनी सांभाळून बोलावे. प्रलोभनांपासून लांब राहावे.
धनु : सकारात्मक घटना घडतील
- या आठवड्यात तुमचा राशीस्वामी गुरू महाराज सिंह राशीत येत आहे. कामाच्या ठिकाणी नोकरदार जातकांनी आधी केलेल्या कामाचे कौतुक होईल. दिवाळी निमित्ताने बोनसही मिळेल. सकारात्मक घटना घडतील. व्यावसायिकांना खूप काम मिळेल. वेळ कमी, काम जास्त असा अनुभव येईल. त्यामुळे कामाचे आणि वेळेचे नियोजन विचारपूर्वक करावे, अन्यथा गोंधळ होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या. महिलांनी सकारात्मक विचार करावा. काम करताना संगीत ऐकावे. विद्यार्थी सुट्टीत छोटा व्यवसाय करू शकतील, आनंदी राहतील.
मकर : मोठी गुंतवणूक कराल
- या आठवड्यात आनंदी राहाल. नोकरदारांना कामाचा ताण असेल. मात्र त्यासोबत कामात समाधानही मिळेल. पगाराबरोबर बोनसही मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या मदतीने मोठी गुंतवणूक कराल. मित्रांबरोबर छान वेळ घालवाल. व्यावसायिकांनी कामे घेताना आपल्या कामगारांच्या क्षमतेचा विचार करावा. स्पर्धकांवर मात करू शकाल. महत्त्वाचे करार होतील. महिला मनाप्रमाणे स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी खरेदी करतील. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल, मित्रांवर फार अवलंबून राहू नका.
कुंभ : नियम पाळा
- या आठवड्यात कायद्याचे काटेकोर पालन करा. नोकरदारांनी कार्यालयाचे, सरकारी आणि वाहतुकीचे नियम पाळावेत. कामे हातावेगळी करताना वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा. जास्त जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना कामातील शिस्त पाळावी. व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने नव्याने प्रयत्न करा. वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभाग घ्या. घरात मंगल कार्य ठरेल. त्यामुळे महिला वर्गाची धावपळ होईल. शिवाय एखाद्या समारंभाला देखील जावे लागेल. विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकारांना चांगल्या संधी मिळतील, त्यातून चांगले उत्पन्नदेखील मिळेल.
हेही वाचा – घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग
मीन : रखडलेली कामे पूर्ण होतील
- राशीस्वामी गुरू सिंह राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे नोकरदारांची खूप दिवसांपासून रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. मात्र महत्त्वाची कामे स्वतः करा. वरिष्ठ नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या. सहकुटुंब फिरायला जाण्याचे योग आहेत. वयावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी काही प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यास फायदा होईल. आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीवर जास्त भर द्यावा. महिला भौतिक सुखासाठी खर्च करतील. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना कामही जास्त करावे लागेल. विद्यार्थ्यांनी मित्रांवर अवलंबून राहू नका. महत्त्वाच्या नोटिसा, प्रोजेक्टची माहिती स्वतः तपासून बघणे योग्य ठरेल.
ईमेल – prajaktakathe3970@gmail.com


