Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…
    ललित

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 18, 2026Updated:June 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, साधं वरण भात, साधं वरण आणि भात, आईच्या हातचा वरण भात, आईचे प्रेम, आईची आठवण वरण भात, साधं वरण भाताचा सुवास, आईची आठवण, वरण भाताने आईची आठवण, वरण भात म्हणजे घरपण, वरण भाताचे आपलेपण, वरणभातात आईची माया,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तृप्ती देव

    “आई, आज पण वरण-भात?” – चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम  मऊसूत भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग, चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप…

    माझा चेहरा बघून आई थोडं हसली, म्हणाली, “झणझणीत पावभाजी हवी होती ना? किंवा मसालेदार रस्सा भाजी. पण आज पीठ नव्हतं रे, म्हणून वाटलं वरण-भात करावा.”

    माझा मूड अजूनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण-भात म्हणजे कंटाळवाणं जेवण.

    कॉलेजमधले मित्र सांगायचे – “आमच्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर!”

    आणि मी? रोज एकतर पोळी-भाजी, नाहीतर वरण-भात.

    त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो.

    वर्षं उलटली… मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो. रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव, परदेशी पदार्थ… पण मन काही भरत नव्हतं.

    हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    एकदा खूप दमून घरी आलो. भाड्याचं घर… ओव्हरटाइम संपवून आलेलो. पोटात कावळे ओरडत होते. मेसवाल्याने आज डबा दिला नव्हता. फ्रीजमध्ये पाहिलं – काहीच नव्हतं. शेवटी थोडे तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग काय! डाळ तांदूळ धुऊन घेतले आणि कुकरला लावलं… तेच शिजवलं…

    एका छोट्या बाऊलमध्ये वरण गरम केलं, भात गरम होता. वर साजूक तूप नव्हतं… पण आठवण मात्र होती.

    पहिला घास तोंडात गेला… आणि अचानक डोळे भरून आले. त्या साध्या वरण-भातात मला आईचा पदर दिसला… स्वयंपाकघरात उभी असलेली तिची आकृती सुद्धा…

    तिचं ते “खाल्लंस ना नीट?” असं विचारणं, आणि माझं “हे काय, पुन्हा वरण-भात?” असं उत्तर!

    आज तोच वरण-भात ‘राजभोगा’सारखा वाटत होता.

    आई गेली दोन वर्षांपूर्वी… तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती… पण आठवणी ताज्या होत्या.

    त्या दिवशी ठरवलं – रविवारी जेवायला मी वरण-भात करणार. घरचं साजूक तूप कढवून!

    आईची आठवण म्हणून नाही तर, स्वतःला आठवण करून देण्यासाठी –

    “सुख हे वरण-भातासारखं असतं – घरगुती, साधं, पण प्रेमानं भरलेलं!”

    मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन, पास्ता, थाई करी, चायनीज घरी खातो… हॉटेलमध्येही खातो… परदेशात राहिलो, पाश्चात्य चविष्ट पदार्थ खाल्ले, पण घरच्या वरण-भाताच्या घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं… पोट भरलं तरी मन वरण-भात शोधतं!

    फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला, पण वरण-भाताने मनाला निवांत केलं. ‘मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस शिजतात, पण वरण-भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो… काय जादू आहे ना वरण-भातात आणि आईच्या हातात!

    जग फिरलो, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला – वरण-भात.

    जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो, तेव्हा रेस्टॉरंटमधले सगळे मेन्यूज डोळ्यांसमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधतं एक साधासा वरण – भात आणि आईचा हात!

    आईच्या हातात जादू असते का?

    कदाचित नाही – ती फक्त भात शिजवते, वरण फोडते, तुपाची धार टाकते… आणि एक प्रेमळ नजर देते – ही नजरच असेल ती जादू… सगळ्या मसाल्यांच्या, चविष्ट पदार्थांच्या गर्दीत वरण-भात गप्प असतो – साधा, शांत, पण मनावर राज्य करणारा.

    आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातली पहिली safe space.

    तोंडात वरणभात आणि कानात – “हळू खा, गिळू नको, तोंड पुस…” या वाक्यांमध्ये जादू आहे का?

    हो… कारण त्यामागे मायेचा हात आहे.

    आज स्वतः आई-बाबा झालो, स्वतः मुलांसाठी बर्गर-पास्ता बनवतो, पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो, तेव्हा अचानक मन परत भूतकाळात मागं जातं – आईच्या हाताखाली.

    हेही वाचा – ट्युबलाइट… एलसी

    आई कुठं गेली?

    ती आजही आहे – आठवणीत, चवीत आणि त्या वरणभातात! मनातलं दुःख, डोळ्यांतलं पाणी, आणि ओठांवरचं हास्य – सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल, तर ती केवळ आईच्या हातात असते… आणि तिच्या वरण-भातातही.

    जिवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेन्यूचा फोटो नाही!

    आई जेवण तयार करताना म्हणते,

    “आज काही नाही रे, फक्त वरण-भात.”

    पण तो “फक्त”मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा विसरणारी ऊब असते.

    हा वरण-भात सांगतो –

    “जेवण हे पोटासाठी फक्त नसतं, ते माणसांमध्ये जोडणारा एक धागा असतो.” जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो, तेव्हा परत याच वरण-भातासारखं घरटं आठवतं – शांत, मृदू, आणि आपलंसं.

    तो शिकवतो – “सर्वसाधारण गोष्टी कधी-कधी सर्वात खास असतात!”

    प्रत्येकाच्या घरातला हा वरण-भात… पण मनात शिरतो तो आपुलकीनं!” अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थक

    August 3, 2026 ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026 ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सार्थक

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 3, 2026

    “नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर…

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी

    August 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑगस्ट 2026

    August 3, 2026

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 382
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 518
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 825
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.