Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, July 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 11, 2026Updated:July 11, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 11 जुलै 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 20 आषाढ शके 1948; तिथि : द्वादशी 26:04; नक्षत्र : कृत्तिका 11:03 ;
    • योग : गंड 24:05; करण : कौलव 15:46;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    भागवत एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठी कादंबरीकार नारायण हरी आपटे

    टीम अवांतर

    मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म 11 जुलै 1889 रोजी सांगली जिल्ह्यातील समडोळी या गावी झाला. नारायण हरी आपटे यांनी प्रामुख्याने कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यांचे लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. बाल-साहित्यिक, कादंबरीकार, संपादक, मुद्रक, प्रकाशक, चित्रपट कथाकार म्हणून देखील ते ओळखले जात होते. त्यांनी जवळपास साठ कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या तर, बाकीच्या सामाजिक आशयाच्या कादंबऱ्या होत्या. त्यांची एकूण साहित्य-ग्रंथ संख्या सुमारे 100 इतकी आहे. इंग्रजांची नोकरी करायची नाही, अशी भूमिका घेत केवळ लिखाण करून संसार करणाऱ्या काही मोजक्या लेखकांपैकी ते एक होते.

    आपटे हे ‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे काही काळ सहसंपादक होते. याशिवाय, साताऱ्यातून ते आल्हाद साप्ताहिक प्रसिद्ध करत. कोरेगावहून त्यांचे स्वतःचे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.

    हेही वाचा – आठवण आषाढी वारीची

    न पटणारी गोष्ट, सुखाचा मूलमंत्र, पहाटेपूर्वींचा काळोख, उमज पडेल तर, एकटी या आपटे यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत्या. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा, संधिकाल, लांच्छित चंद्रमा आणि रजपूतांचा भीष्म या विशेष उल्लेखनीय ठरल्या. आराम-विराम  आणि बनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह देखील प्रसिद्ध झाले. याशिवाय गृहसौख्य, आयुष्याचा पाया, कुर्यात् सदा मंगलम् अशा ग्रंथांमधून संसारसुखाचे मूलभूत सिद्धान्त, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इत्यादी विषयांसंबंधी त्यांनी विवेचन केले आहे. त्यांचे सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून झाल्याचे दिसते.

    नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या समोर मांडली. त्याआधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. कादंबऱ्यांच्या बरोबरीनेच आपटे यांच्या लघुकथांवरून काही चित्रपट बनले. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट आपटे यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवर बेतला होता.

    1933 साली बडोदा वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, पुणे येथे 1941 साली भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष आणि 1962 मध्ये सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. 14 नोव्हेंबर 1971 रोजी कोरेगाव येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज कष्टाचे फळ मिळेल. कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील प्रगतीमुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे सध्या तुमच्या योजना स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. घरासाठी आवश्यक सुखसोयींशी संबंधित खरेदी शक्य आहे. संतती संबंधीच्या चिंता कमी होण्याची चिन्हे आहेत.

    वृषभ –  आज नशीबाची मोठी साथ मिळेल. नोकरदार जातकांना बढती मिळू शकते किंवा कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवीन व्यावसायिक संधी आणि  भागीदारी फायदेशीर ठरू शकतात. इतरांच्या प्रभावाखाली येऊन कोणत्याही वादात पडणे टाळा.

    मिथुन – आज उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, पण त्यासोबतच खर्चावरही लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होईल. भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा आज विचार केला जाऊ शकतो. प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.

    कर्क – आज अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. पैसा आणि मालमत्तेसंबंधी बाबींमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादे कायदेशीर प्रकरण हाताळत असाल, तर सावधगिरीने पुढे जा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

    सिंह – आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर असेल. एखाद्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात एक नवीन वळण येऊ शकते. आरोग्याच्या जुनाट समस्यांपासून आराम मिळेल. व्यवसायातही एक मोठा आणि फायदेशीर बदल होण्याची शक्यता आहे.

    कन्या – आज तुम्ही विचारपूर्वक घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्याच फायद्याचा ठरेल. शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश दृष्टिपथात आहे. तुमच्याबद्दलचा सामाजिक आदर वाढेल आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचा एक महत्त्वाचा निर्णयही आज तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.

    तुळ – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    वृश्चिक – तुमचे अनुभव तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याच्या दृष्टीने नवीन संधी निर्माण होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी किंवा जुने कर्ज कमी करण्यासाठी देखील सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात.

    हेही वाचा – वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…

    धनु – आज व्यवसाय आणि गुंतवणूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये नफा होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. नवीन योजनांमुळे भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. कुटुंबासोबत समन्वय ठेवा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.

    मकर – आजचा दिवस व्यस्त असेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रलंबित असणारी व्यावसायिक कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत दिवस घालवल्याने आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. प्रवास करताना आणि इतरांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगणे उत्तम राहील.

    कुंभ – आज सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम मिळाल्याने तुम्ही प्रेरित व्हाल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. एका लहानशा गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होऊ नये, यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असेल.

    मीन – आजच्या दिवशी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचे गोड बोलणे इतरांना प्रभावित करेल. कुटुंबात आनंदाची एखादी बातमी येऊ शकते. नवीन कल्पना व्यवसायातील यशाचा मार्ग मोकळा करतील. प्रवासादरम्यान मिळालेली महत्त्वाची माहिती उपयोगी पडू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026

    मित्र कसा असावा तर…

    July 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जुलै 2026

    July 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 356
    • अवांतर 195
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 484
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 773
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.