Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » I Love You अन् अव्यक्त भावना…
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 20261 Comment3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रणाली मंगेश महाशब्दे, प्रणाली मंगेश, प्रणाली महाशब्दे, आय लव्ह यू, I Love You, शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा, नजरेची भाषा, नजरेने समजून घेणे, समोरच्याला समजून घेणे, पती पत्नीचे नाते, पती पत्नीचे भावबंध, पती पत्नीचे स्नेहबंध
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    I Love You!

    तुम्ही म्हणाल हे काय आहे?

    तर, झालं असं की, काल आम्ही सगळे एकत्र बसलो असताना सोनूने म्हणजे माझ्या लेकीने एक व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये एका किटी पार्टीमध्ये काही गेम्स चालू होते. छान मजेत सगळ्याजणी होत्या. थोड्या वेळाने एक नवीन खेळ खेळायचा ठरला. खेळ होता “आपल्या नवऱ्याला फोन करून ‘I Love You’ म्हणायचे आणि त्याचा काय प्रतिसाद येतो ते बघणे…” तसं पाहिलं गेलं तर, या सगळ्याजणी सामान्य घरातल्या. त्यामुळे सगळ्याजणीच थोड्या भांबावल्या… कारण हे असं सगळ्यांसमोर म्हणणं आणि त्यावर नवऱ्याची प्रतिक्रिया पण बघणं… सगळंच कसं विचित्र. मग काय एकेकीने नवऱ्याला फोन केला. पण हे नवऱ्याला सुद्धा अनपेक्षितच होते, ते कामाच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी त्या फोनला वेगवेगळा प्रतिसाद दिला. तसं तर, हे इथेच संपले होते. खेळ खेळून झाला होता. पण त्यावर नंतर अनेक मत-मतांतर दिसू लागले.

    हे सगळे माझे सासू-सासरे आणि आजी-आजोबा बघत होते. त्यांच्यासमोर मला पण थोडे अवघडच वाटले. लेक मात्र आम्हा सगळ्यांकडे “हे आता काय म्हणतात?” म्हणून बघत होती.

    त्यावर आजी म्हणाली, “अग I Love You म्हटले म्हणजे झाले का गं?”

    हेही वाचा – जरा विसावू या वळणावर…

    लेक म्हणाली, “म्हणजे गं काय आजी, ते म्हटल्याशिवाय कसे कळणार समोरचा आपल्यावर प्रेम करतो की नाही!”

    आजी-आजोबा हसत होते.

    आजोबा म्हणाले, “मी कधी तुझ्या आजीला I Love You म्हटले नाही, म्हणजे काय माझे तिच्यावर प्रेम नाही? तुझे आई-बाबा पण काय सारखे एकमेकांना I Love You म्हणत असतात का?”

    आजी – “हे सगळे कृतीमधून, नजरेने करण्याच्या गोष्टी आहेत. आता बघ तू कधीतरी थोडासा छान स्वयंपाक केला की, तुझे बाबा तुझे कौतुक करतात की, लगेच तू तुझ्या बाबाला I Love You म्हणते. हो की नाही?”

    सोनू, “हो.”

    आजी, “आम्ही स्वयंपाक छान केला की, तुझे आजोबा असो किंवा तुझे बाबा असो ते तो पदार्थ पुन्हा-पुन्हा घेतात आणि आवडीने खातात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान, आनंद आमच्यासाठी I Love You चेच काम करते. सणाला तर आणतातच पण कधी-कधी कारण नसताना पण गजरा आणला जातो, आवडीचा पदार्थ/ खाऊ आणला जातो. यावरून सुद्धा प्रेमच व्यक्त केले जाते.”

    सोनू, “पण आजी हे सगळे बाबा किंवा आजोबा करतात, तुमच्यासाठी! पण मग तुम्ही दोघी काय करता त्यांच्यासाठी? म्हणजे बघ आम्ही I Love You म्हटले तर समोरचा “मी पण” असे म्हणतो ना?”

    आता आजोबांना रहावेना.

    ते म्हणाले, “सोनू बघ कितीतरी वेळा घरात काही कारण नसताना माझ्या किंवा तुझ्या बाबांच्या आवडीचा स्वयंपाक होतो, कितीतरी वेळेस तुझी आजी, आई आम्हाला आवडणारी साडी नेसतात. मग हे त्यांच्या बाजूने “मी पण” म्हणणे असते. ही सगळी मौनाची भाषा आहे बघ.”

    बाबा, “काय आहे ना सोनू आम्ही “इशारो इशारो में दिल लेने वाले, आंखो ही आंखो में इशारा हो गया…” ही गाणी ऐकून मोठे झालो आहोत… आणि हे खूप महत्त्वाचे आहे आमच्यासाठी.”

    आई, “सोनू, अशा छोट्या-छोट्या गोष्टी घरात सारख्या होत असतात. त्यामुळे तर आमचे मस्त चालले आहे.”

    सोनू, “अरे वा, हे तर फारच भारी आहे.”

    हेही वाचा – आठवणींचे कपाट!

    बाबा – “सोनू हेच तर आमच्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे. अनेक कठीण प्रसंगात आम्हाला याच छोट्या-छोट्या गोष्टी मदत करतात. कोणत्या गोष्टींचे टेंशन असेल तर तुझी आजी-आजोबा असो किंवा तुझी आई चेहऱ्यावरूनच समजतात. मग काय मी आणि तुझे आजोबा रात्री जेवल्यावर शतपावली करायला जातो. आजी डोक्याला तेल लावून देते आणि तुझी आई छान कॅाफी करते, जेवण झाल्यावर!”

    आई, “मला काही त्रास होत असेल तर आजी माझ्या आवडीचा सगळा स्वयंपाक करते, आणि मला छान गरम गरम जेवायला वाढते.”

    आजी, “आम्हाला काही होत असेल तर, तुझे आई-बाबा किती काळजी घेतात, ते तर तुम्ही बघताच की!”

    आजोबा, “सोनू एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची काळजी घेणे, हे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही कधीच कोणाला I Love You म्हटले तर नाही, पण प्रत्येक वेळेस भावना तीच होती.

    सोनू, “खरंच, तुम्ही सगळे भारीच आहात आणि म्हणूनच I Love You”

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026 ललित

    पुण्यकर्म

    October 6, 2026 ललित

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026 ललित

    1 Comment

    1. Bhalchandra Patil on August 23, 2026 7:59 am

      आमच्या शेजारच्या बांद्रे मावशी वय वर्ष ६७, काका वय वर्ष ७२. रोज उठता बसता दोघात खटके उडायचे.
      काही निमित्ताने मी त्यांच्या घरी गेलो होतो. काका त्यांच्या मित्राबरोबर जवळच्या दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. काका मित्रांबरोबर बसलेले खिडकीतून दिसत होते. मावशी मला म्हणाल्या “काकांना नाष्टा करायला हाक मार बरं, मला पायाच्या दुखण्यामुळे उठायला नको झालंय”.
      मी तीन चार हाका मारल्या पण काकांना काही ऐकायला गेलं नाही. शेवटी मावशी उठल्या, खिडकीपाशी आल्या… आणि.. “अ…हो” असं एकदाच नॉर्मल आवाजात म्हणल्या आणि काकांनी एकदम’प्रतिसाद दिला : “..आलो”. एकदम विशेषच वाटलं.
      तसंच आमचे मामा. घरात कितीही गडबड गोंधळ चालू असु द्या. त्या गोंधळात मामींना बोलवायचं असेल तर फक्त “…होय” इतकंच म्हणलं कि मामींना त्याही गोंधळात नेमकं कळतं कि मामांनी हाक मारली आहे. मामांचं वय ७३ आणि मामींच वय ७० वर्ष फक्त..
      हि पिढी वेगळ्याच wavelength वर tune झालेली आहे. ती आजच्या इतकी expressive नाही. नजीकच्या काळात ती wavelength आणि ते tuning आपल्याला दिसेनासे होणार आहेत. ते format होण्याआधी नीट save केलं पाहिजे.

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    फूल ना फुलाची पाकळी

    By दिलीप कजगांवकरOctober 6, 2026

    राज हा सदानंद आणि सावित्रीबाईंचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्षं तो आई-बाबांसह…

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.