दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 जुलै 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 08 श्रावण शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:29; नक्षत्र : श्रवण 17:42;
- योग : आयुष्यमान 24:04; करण : बालव 08:50;
- सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड
टीम अवांतर
फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक आणि फोर्डिझम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीद्वारे मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांसाठी मोटारगाड्या परवडणाऱ्या बनवण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते त्या हेन्री फोर्ड यांचा जन्म 30 जुलै 1883 रोजी मिशिगनमधील ग्रीनफील्ड टाउनशिप येथे झाला. शालेय शिक्षणात जराही रस नसणाऱ्या हेन्रीला 12 व्या वाढदिवशी वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं. हेन्रीने ते घड्याळ पूर्णपणे उघडून परत जोडलं.
जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची ती पहिली पायरी ठरली. त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळत असताना हेन्री आसपासच्या घरातील बिघडलेली घड्याळं दुरुस्त करायचा. त्या काळात होणाऱ्या वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची. शेतीत वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं.
हेही वाचा – …तर पोटगी मिळत नाही!
1879 मध्ये, फोर्ड डेट्रॉइटमध्ये शिकाऊ यंत्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी घर सोडून गेले. आधी जेम्स एफ. फ्लॉवर अँड ब्रदर्सकडे आणि नंतर डेट्रॉइट ड्राय डॉक कंपनीमध्ये त्यांनी काम केलं. 1882 मध्ये ते पोर्टेबल स्टीम इंजिन चालवण्यात पारंगत झाले. नंतर त्यांना वेस्टिंगहाउसने त्यांच्या स्टीम इंजिनची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले. या अनुभवाच्या जोरावर फोर्ड यांनी आपल्या शेतावरील कार्यशाळेत एक “वाफेवर चालणारी गाडी किंवा ट्रॅक्टर” आणि एक वाफेवर चालणारी मोटारगाडी बनवली, मात्र व्यावसायिकदृष्ट्या ती फारशी सुरक्षित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना झाली ज्यात फोर्ड मुख्य अभियंता होते. 1902 मध्ये हेन्री एम. लेलँड हे कंपनीचे सल्लागार म्हणून नियुक्त झाले; परिणामी, फोर्ड यांनी आपल्याच नावाची कंपनी सोडली. मात्र याने खचून न जाता फोर्ड यांनी 80+ हॉर्सपॉवरची रेसर ” 999 ” देखील तयार केली. 1909 मध्ये, फोर्ड यांनी नवीन ट्रान्समिशन यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला . 1911 मध्ये त्यांना पेटंट देण्यात आले.
ऑक्टोबर 1908 साली मॉडेल टी 1 ही कार मार्केटमध्ये सादर झाली. तिचे स्टीयरिंग व्हील डाव्या बाजूला होते, ज्याचे अनुकरण इतर प्रत्येक कंपनीने लवकरच केले. ही कार चालवायला सोपी, दुरुस्त करायला सोपी आणि स्वस्त होती. शिवाय तिची किंमतही कमी होती आणि दरवर्षी तिची किंमत कमी होत होती, त्यामुळे 1920 च्या दशकापर्यंत बहुतेक अमेरिकन चालक मॉडेल टी वर गाडी चालवायला शिकले होते.
गाड्यांच्या व्यवसायाचे प्रवर्तक म्हणून जसे फोर्ड ओळखले जातात तसेच कामगारांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचे श्रेय देखील त्यांनाच दिले जाते. फोर्ड यांचे 7 एप्रिल 1947 रोजी निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ परिणाम देणारा असेल. संततीच्या परीक्षेचा निकाल आनंद देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी लोकांची मने जिंकण्यात तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक सलोखा टिकून राहील. उत्पन्नात वाढ झाल्याने आनंद मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचि प्रकृती बिघडल्याने तुम्हाला चिंता वाटेल.
वृषभ – प्रगतीचा असा आजचा दिवस असेल. कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. अविचाराने इतरांना आश्वासने देणे टाळा. बोलण्यात संयम ठेवा. तुम्ही तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला प्रचंड आनंद होईल.
मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. नोकरदारांना आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक भागीदारांवर लक्ष ठेवणे आवश्यक असेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील. राजकारणात प्रवेश करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. तुम्हाला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
कर्क – नवीन मालमत्ता खरेदी करणे आज फायदेशीर ठरेल. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी आवडीचे काम मिळेल. संततीसोबत एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता. घेतलेले कर्ज फेडता येईल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज असेल. भावंडांसोबत असलेले वाद मिटवा.
सिंह – धन आणि समृद्धीत आज वाढ होईल. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांमध्ये जोडीदाराचा मोठा पाठिंबा मिळेल. वडिलधाऱ्या व्यक्तीसोबत कामाबद्दल चर्चा करणे फायदेशीर ठरेल. एखाद्या कामाबद्दल खात्री नसल्यास, ते करण्याची किंवा स्वीकारण्याची घाई करू नका.
कन्या – सकारात्मक परिणाम देणारा असा आजचा दिवस असेल. कामे उद्यावर ढकलू नका आणि तुमच्या वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. घरच्या नूतनीकरणाचे काम सुरू होऊ शकते. घरी एखाद्या शुभ प्रसंगाची तयारी सुरू होऊ शकते. धार्मिक कार्यांवर आज अधिक लक्ष केंद्रित कराल. शुभ कार्याच्या निमित्ताने घरी आलेल्या नातेवाईकांना भेटून तुम्हाला आनंद होईल.
तुळ – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. शासकीय बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा. धनवृद्धीमुळे आनंद मिळेल. नियोजनानुसार काम करा. दिखाऊपणात अडकू नका. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक – आजचा दिवस अनपेक्षित लाभाचा आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला नफा मिळेल. व्यवसायातील बदल फायदेशीर ठरतील. आईसोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. काळजीपूर्वक वाहन चालवा. कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – एपिडेमिओलॉजीचा जनक… जॉन स्नो
धनु – आजचा दिवस आनंददायी असेल. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. जोडीदाराला नवीन नोकरी मिळू शकते. कौटुंबिक पार्टीमुळे वातावरण प्रसन्न होईल. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. फक्त आज विरोधकांच्या प्रभावाखाली येऊ नका.
मकर – आर्थिक व्यवहारांमध्ये आज सावधगिरी बाळगा. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा. एखाद्या सहकाऱ्याच्या नकारात्मक टिप्पणीमुळे तुम्हाला वाईट वाटू शकते, पण तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरदार जातकांची आज प्रगती होईल. काही शारीरिक समस्या असल्यास, आवश्यक त्या तपासण्या करून घ्या.
कुंभ – आजचा दिवस चांगला असेल. सकारात्मक विचारांचा फायदा घ्या. राजकारणात एखादा नवा उपक्रम सुरू कराल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा. सहकाऱ्यांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका किंवा विरोधकांच्या मतांनी प्रभावित होऊ नका. कुटुंबातील सदस्यांना दिलेली वचने पूर्ण करा.
मीन – कामामुळे आज मन विचलित राहील, ज्यामुळे कामे पूर्ण होण्यासाठी विलंब होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. संततीला दिलेली वचने पूर्ण करा. आज जुनी कर्जे फेडू शकाल. एकूण संपत्तीत देखील वाढ होईल.


