Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 29, 2026Updated:July 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 29 जुलै 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 07 श्रावण शके 1948; तिथि : पौर्णिमा 20:04; नक्षत्र : उत्तराषाढा 15:36;
    • योग : प्रीति 23:57; करण : विष्टि 07:14;
    • सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    गुरुपौर्णिमा

    पौर्णिमा समाप्ती रात्रौ 08:04

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस

    टीम अवांतर

    प्रख्यात व्यंगचित्रकार, मुखपृष्ठकार शि. द. फडणीस यांचा जन्म  29 जुलै 1925 रोजी बेळगाव जिल्ह्यातील भोज येथे झाला. कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथे फडणीस यांना चित्रकलेचे प्राथमिक धडे मिळाले. यातून आवड निर्माण होत गेली आणि ते चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा पास झाले. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

    सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकत असतानाच 1945मध्ये फडणीस यांनी ‘मनोहर’ मासिकाकडे आपले एक  व्यंगचित्र पाठवले. ते लगेच प्रकाशित झाले. यामुळे फडणीस यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी अधूनमधून त्याकाळी वाचकप्रिय असलेल्या नियतकालिकांना कॉमिक स्ट्रिप्स पाठविण्यास सुरुवात केली. अनंत अंतरकर हे ‘हंस’ मासिक चालवत होते. अंतरकरांच्या सूचनेनुसार, फडणीस यांनी एक पूर्ण पानाचे रंगीत चित्र तयार केले आणि 1951 सालच्या जून महिन्यातील अंकाच्या मुखपृष्ठावर ते चित्र प्रकाशित झाले.

    हेही वाचा – शूटिंगच्या सेटवरील भाज्यांचं करतात काय?

    त्याकाळी दिवाळी मासिकांच्या मुखपृष्ठांवर सुंदर तरुणी किंवा लोकप्रिय चित्रपट अभिनेत्रींची चित्रे किंवा छायाचित्रे असायची. फडणीस यांनी अंतरकरांच्याच ‘मोहिनी’ मासिकाच्या 1952च्या दिवाळी अंकासाठी व्यंगचित्र तयार केले. त्यात माऊस प्रिंटचा शर्ट घातलेला एक माणूस आणि बस स्टॉपवर त्याच्या शेजारी कॅट प्रिंटची साडी घातलेली स्त्री दाखवण्यात आली होती. या नवीन प्रकारच्या मुखपृष्ठ निर्मितीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

    पुढे कोल्हापूरला परत गेलेल्या फडणीस यांना अंतरकरांनी पुण्यात येण्यास सुचविले. भविष्याचा विचार करून फडणीसही पुण्यात स्थायिक झाले. यावेळी फडणीस यांची व्यंगचित्रे ‘मोहिनी’च्या प्रत्येक महिन्याच्या अंकात छापली जातील, असे ठरले. ही परंपरा 50 वर्षे सुरू राहिली होती. आता मोहिनीचे मासिक बंद झाले असले तरी त्याचा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो आणि त्यामध्ये फडणीस यांच्या व्यंगचित्राला स्थान असतेच.

    1963 ते 1975 या काळात “माणूस’ आणि “सोबत’ या मराठी साप्ताहिकांसाठी फडणीस यांनी तत्कालीन घटनांवर आधारित राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्रे रेखाटली. याशिवाय फडणीसांनी प्राथमिक शाळेतील गणिताची पुस्तके देखील त्यांनीच चित्रित केले होती. चित्रांच्या माध्यमातून गणित ही संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी मांडली.

    चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत, यासाठी शि. द. यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे म्हणजे कॉपीराइटची ताकद चित्रकारांना मिळवून दिली. त्यांची अनेक चित्रे इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यांच्या हसरी गॅलरी, चित्रहास, चिमुकली गॅलरी ही चित्रांची प्रदर्शनेही 40 वर्षांत जवळजवळ 20 वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत. शि.द. यांना ’सृजन कोहिनूर नावाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय, बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘कार्टुनिस्ट कंबाईन’ या संघटनेचा एप्रिल 2016मध्ये जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. आपल्या समृद्ध आयुष्याचा पट शि. द. यांनी ‘रेषाटन’ या आपल्या आत्मचरित्रात वाचकांसमोर मांडला आहे.


    आजचे राशिभविष्य

    मेष –  नोकरी / व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये व्यग्र रहाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आज असेल. तुम्हाला एखादा अनावश्यक खर्च करावा लागण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातील बदल फायदेशीर ठरतील. संततीच्या आरोग्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. दुसरीकडे काही कौटुंबिक बाबीही तुम्हाला अस्वस्थ करतील.

    वृषभ – आज एका महत्त्वाच्या कामात दिवसभर व्यग्र असाल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा. व्यवसायात काही अडचण आली, तर तुमच्या भागीदाराशी मोकळेपणाने बोला, यामुळे कामाची सुरळीत प्रगती सुनिश्चित होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा.

    मिथुन – आज कामांचे डोंगर उपसावे लागतील. मात्र महत्त्वाची कामे उद्यावर ढकलू नका. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकत्र बसून कौटुंबिक बाबी सोडवणे उत्तम राहील. जोडीदारासोबत नवीन प्रकल्प सुरू करणे उत्साहवर्धक ठरेल. जर तुम्हाला कशाची चिंता वाटत असेल, तर त्याबद्दल वडिलधाऱ्यांशी बोला. शेजाऱ्यांना न मागता सल्ला देणे टाळा.

    कर्क – जबाबदारीने कामे हातावेगळी करण्याचा आजचा दिवस आहे. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. मात्र कामासाठी धावपळ सुरूच राहील. गुंतवणुकीतून मोठा नफा होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या खाण्याच्या सवयी सुधारा. आरोग्याच्या समस्यांबाबत निष्काळजीपणा टाळा. आपल्या इच्छांची पूर्तता झाल्याने आनंद मिळेल. वैवाहिक जीवन संतुलित राहील,

    सिंह – आज आव्हानात्मक दिवस आहे. तुम्हाला कुटुंबीयांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. काम वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा. आध्यात्मिक आवड वाढेल, दूरचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी नोकरी-संबंधित अभ्यासक्रमांची तयारी करू शकतात.

    कन्या – सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढण्याची आणि आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे. एका चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. मालमत्तेसंदर्भात पालकांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. प्रवास फायदेशीर ठरू शकतो.

    तुळ – आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. इतरांसाठी मत्सर आणि द्वेष टाळा, कोणत्याही शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. आज नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद मिटेल. विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करतील.

    वृश्चिक – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्नाच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. काही वाद चर्चेद्वारे मिटवले जातील. कुटुंबाकडून भक्कम पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल.

    हेही वाचा – बायका म्हणजे…!

    धनु – आजचा दिवस शुभ राहील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. राजकारणात काम करणाऱ्यांनी अतिउत्साही होणे टाळावे. स्वतःची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न कराल. त्या दृष्टीने आहारात नवीन पदार्थांचा समावेश करू शकता. दैनंदिन कामात बदल करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना भूतकाळातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करा.

    मकर – आजचा दिवस चांगला असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. निर्णयक्षमता सुधारेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल. वडिलधाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्हाला अपमानित वाटू शकते.

    कुंभ – आजचा दिवस खास असेल. वैवाहिक जीवनातील सलोखा टिकून राहील. एखाद्या कामात भावंडांकडून पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या येत असतील, तर नवीन पर्यायांचा विचार करा. विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात, पण शेवटी यश नक्कीच मिळेल. संततीकडे लक्ष द्या. आज एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता.

    मीन – आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. जोडीदारासाठी भेटवस्तू आणण्याची संधी मिळेल. आज आई-वडिलांची काळजी घेण्यात व्यग्र रहाल. वरिष्ठांसोबत कामासंबंधित विषयावर चर्चा केल्याने तुमचे नाते अधिक दृढ होईल. काळजीपूर्वक वाहन चालवा. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील असाल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 सप्टेंबर 2026

    September 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 02…

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 सप्टेंबर 2026

    September 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 943
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.