Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, May 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 28, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 28 मे 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 07 ज्येष्ठ शके 1948; तिथि :  द्वादशी 07:56; नक्षत्र : चित्रा 08:08;
    • योग : वरियान 27:54; करण : कौलव 20:51;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:10;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    प्रदोष

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठी उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर

    टीम अवांतर

    किर्लोस्कर समूहाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 रोजी सोलापूरमधील किर्लोस्करवाडी येथे झाला. शिक्षण औंध आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून 1927 साली यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त केली. शेती आणि नोकरी याव्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही ज्या काळात धाडसाचे होते त्या वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामास सुरुवात केली.

    शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे, साखरनिर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑइल इंजिन्स, इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून फोर्जिंग उत्पादनांपर्यंत – अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांनी सुरुवात केली आणि त्या-त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले. त्यांनी उद्योग-विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. तसेच पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते. पण शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी ‘उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार’ केला.

    हेही वाचा – असेही काही तर्काच्या पलीकडचे!

    60च्या दशकात किर्लोस्कर एका जागतिकस्तराच्या उद्योगाचे नेतृत्व करत होते. त्यावेळी सरकारच्या जागतिकीकरणविषयक किंवा खासगीकरणविषयक योजना दृष्टीपथातही नव्हत्या. इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलचे ते 1957 साली अध्यक्ष झाले. याच सुमारास त्यांनी जर्मनीला डिझेल इंजिने निर्यात करायला सुरुवात केली. निर्यातीला चालना देण्यासाठी त्यांनी रॉटरडॅम, हॉलंड, बँकॉक आणि थायलंड इथे कार्यालये सुरू केली. तेव्हा विकसित देशांतही जागतिकीकरण संकल्पना तितकीशी माहीत नव्हती. मलेशिया आणि फिलिपिन्समध्ये त्यांनी स्थानिक बाजारपेठांना पुरवठा करण्यासाठी तिथेच कारखाने उभारले होते.

    मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष; बोर्ड ऑफ ट्रेडचे सदस्य; इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे पहिले अध्यक्ष; अनेक सरकारी समित्यांवर औद्योगिक सल्लागार, कमिटी फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली. व्यापार आणि उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारत सरकारने 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. कलकत्ता येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्शन इंजिनीअर्सच्या ‘इंडिया कौन्सिल’ने दिलेल्या ‘सर वॉल्टर पुकी पारितोषिका’चे ते मानकरी ठरले. कलकत्त्याच्या ‘इंजिनीअरिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने 1972 मध्ये त्यांना ‘कर्म वीरोत्तम’ ही पदवी दिली. तसेच त्यांना फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. ‘कॅक्टस अँड रोझेस’ हे किर्लोस्करांचे आत्मचरित्र त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी म्हणजे 2003 साली मॅकमिलन इंडियाने प्रसिद्ध केले. अशा या महान उद्योगमहर्षीचे 24 एप्रिल 1994 रोजी निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आत्मविश्वास आणि काम करण्याची क्षमता दोन्ही आज सर्वोच्च पातळीवर असतील. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, दबावाखाली घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचा नवीन किंवा अतिरिक्त स्रोत कसा मिळवता येईल, याचा विचार कराल. जोडीदाराचे एखादे यश किंवा पदोन्नती घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल.

    वृषभ – जे काही काम किंवा योजना हाती घ्याल, त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन कल्पना सुचतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा साखरपुडा किंवा लग्न निश्चित होऊ शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल. संततीच्या हट्टी किंवा लहरी स्वभावामुळे समस्या उद्भवू शकतात.

    मिथुन – बऱ्याच काळापासून अडकलेला किंवा गमावलेला निधी परत मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यावसायिक योजनांमुळे समस्या निर्माण होत होत्या, त्या आता हळूहळू योग्य दिशेने जाऊ शकतात. एखाद्या सहकाऱ्याच्या शब्दांमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते, पण प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल.

    कर्क – मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये नशीबाची आज जोरदार साथ मिळेल. अनोळखी व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. प्रेम आणि समजुतदारपणाने कुटुंबातील समस्यांवर उपाय निघेल. कामाच्या ठिकाणी असलेले विरोधक पडद्याआड काही कारस्थान रचण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सतर्क राहा.

    सिंह – प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने योग्य दिशा मिळेल. तुमची निर्णयक्षमता मजबूत असेल आणि लोकांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. संततीला काम किंवा करिअरसाठी घरापासून दूर जावे लागू शकते. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांचा भार ताण वाढवेल, पण तुम्ही तो चांगल्या प्रकारे सांभाळाल.

    कन्या – दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. आईच्या प्रकृतीबद्दलची चिंता वाढू शकते. व्यवसायात नुकसान किंवा अडथळा आल्याने बरीच धावपळ होण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींमध्ये दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत आणि निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. कोणाला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

    तुळ – एखादे प्रलंबित काम आज पूर्ण होऊन दिलासा मिळू शकतो. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना कल्पकता आणि बुद्धीचा सुज्ञपणे वापर करावा लागेल. व्यवसायातील किरकोळ समस्या त्रासदायक ठरू शकतात, परंतु संयम ठेवल्यास सर्व गोष्टी व्यवस्थित मार्गी लागतील. संततीच्या प्रगतीचा अभिमान वाटेल.

    वृश्चिक – नातेसंबंध अधिक दृढ होतील. भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. चर्चेतून एका दीर्घकाळ चाललेल्या समस्येचे निराकरण होऊ शकते. कामाशी संबंधित प्रवासाला जावे लागू शकते. सकारात्मक विचार आणि समज तुम्हाला पुढे वाटचाल करत राहण्यास मदत करेल. संपत्ती आणि सुखसोयींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होतील.

    हेही वाचा – दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    धनु – समाजात तुमच्याबद्दलचा आदर आणि लोकप्रियता दोन्ही वाढतील. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या कामाबद्दल पुरस्कार मिळू शकतो. आज नवीन मित्र बनतील, तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. संततीसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये थोडी धावपळ होऊ शकते, परंतु अखेरीस परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल.

    मकर – कामाच्या गडबडीत स्वतःची काळजी घ्यायला विसरू शकता, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. नवीन वाहन किंवा संततीसाठी एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमचे बोलणे सौम्य ठेवा. घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि सौम्यतेने वागल्यास नातेसंबंध गोड राहतील.

    कुंभ – आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणीतरी तुम्हाला अयोग्य गुंतवणुकीत किंवा जोखमीच्या योजनेत अडकवण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून हुशारीने निर्णय घ्या. संततीच्या करिअर किंवा शिक्षणासाठी तुम्हाला परदेशात प्रवास करावा लागू शकतो. जोडीदाराला नवीन नोकरी किंवा चांगली संधी मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.

    मीन – आज, तुमचा समजूतदारपणा आणि शांत स्वभाव प्रत्येक काम सोपे करेल. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंद आणि सुख येऊ शकते. कुटुंबातील सदस्याच्या लग्नासंदर्भात मित्र किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा कराल. नोकरदार व्यक्तींनी घाई टाळावी आणि वरिष्ठांच्या सल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे, कारण तुम्हाला एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    May 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    By Team AvaantarMay 27, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 06…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी

    May 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 311
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 434
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 216
    • मैत्रीण 19
    • ललित 659
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026
    Most Popular

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.