Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 19 जून 2025
    पंचांग आणि भविष्य

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 19 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 29 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 19 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : अष्टमी 11:55

    नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 23:16, योग : सौभाग्य 26:45, करण : तैतील 22:55

    सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18

    पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : उत्तरायण, संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामगिरी सुधारेल. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. पैशाचा ओघ पूर्वीपेक्षा चांगला असेल, परंतु खर्चही त्याच प्रमाणात असेल. मार्केटिंग, मीडिया किंवा सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित लोकांसाठी अत्यंत अनुकूल दिवस आहे.

    वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे. सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्रात असाल तर उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. पैशाचा ओघ चांगला राहील, परंतु पूर्वीच्या काही कर्जांमुळे बचत करणे शक्य होणार नाही.

    मिथुन – खूप व्यग्र दिवस असेल. कार्यालयात कामाचा ताण वाढेल, त्यामुळे त्वरित निर्णय घेता येणार नाहीत. अनेक समस्या एकट्यानेच सोडवाव्या लागू शकतात. कायदेशीर किंवा वादग्रस्त बाबींशी संबंधित आर्थिक भार वाढू शकते.

    कर्क – नशीबाची साथ लाभणार आहे. पदोन्नतीसाठी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु भावनिक निर्णय घेऊन गुंतवणूक करू नका. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी आहे.

    सिंह – आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस शुभ असेल. मोठ्या प्रकल्पांच्या नियोजनात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होईल, मात्र अतिआत्मविश्वास किंवा अभिमान टाळा.

    कन्या – व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाचे ओझे आणि जबाबदारीमुळे नको इतका ताण घ्याल. भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायात मतभेद उद्भवू शकतात. कार्यालयातील बॉसची वागणूक कठोर असू शकते, परंतु मेहनतीकडे दुर्लक्ष होणार नाही.

    तुळ – पैसा आणि काम याबाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णयात घाई करू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखादा जुना सौदा अचानक रद्द होऊ शकतो.

    वृश्चिक – मेहनतीचे फळ मिळेल. कार्यालयात एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकेल. इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक किंवा रासायनिक उत्पादनांच्या क्षेत्रातील  व्यावसायिकांना दिवस फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. फक्त बोलण्यात आणि वर्तनात संयम ठेवा.

    धनु – आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. बँकिंग, शिक्षण, सरकारी सेवा किंवा संशोधन या क्षेत्रांतील व्यक्तींना फायदा होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वरिष्ठ मार्गदर्शकाचा सल्ला फायदेशीर ठरेल.

    मकर – व्यवसायात अधिक व्यग्र राहाल, परंतु त्याच वेळी नफा होईल. भागीदारीतील जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला थोडी आर्थिक टंचाई भासेल परंतु दुपारनंतर अडकलेले पैसे मिळू शकतात.

    कुंभ – पैसा आणि कारकीर्दीच्या बाबतीत अतिशय उत्तम दिवस असेल. स्थावर मालमत्ता, शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित कामात लाभ होईल. नोकरीत बदली किंवा नवीन प्रस्ताव येण्याची चिन्हे आहेत. आत्मविश्वासाच्या जोरावर नेतृत्व करण्याची संधी मिळेल.

    मीन – सर्जनशील लेखन, माध्यम किंवा रचना क्षेत्रातील जातकांच्या कारकिर्दीतील प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कार्यालयात अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.


    दिनविशेष

    सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शहा

    सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शहा यांचा जन्म गुजरातच्या जेतपूर शहरात 7 नोव्हेंबर 1922 साली झाला. विद्यापीठात शिकत असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत छोडो आंदोलनात सहहभाग घेतला होता. त्यांनी प्रामुख्याने मुले, महिला आणि वृद्धांसाठी काम केले आहे. इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्या मोठ्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक प्रमुख पदे भूषवली आहेत. तथापि, 1975मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (NDMC) पहिल्या अशासकीय अध्यक्षपदी नियुक्त केले होते. विद्याबेन यांनी 1979मध्ये ताश्कंद येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बाल वर्षाच्या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1992 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यांनी 12 वर्षे भारतीय बालकल्याण परिषदेचे (ICCW) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. विद्याबेन यांचे 19 जून 2020 साली दिल्ली येथे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    By Team AvaantarJune 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  02…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.