Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 डिसेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 डिसेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 19, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 19 डिसेंबर 2025; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 28 अग्रहायण शके 1947; तिथि : अमावस्या अहोरात्र; नक्षत्र : ज्येष्ठा 22:50
    • योग : शूल 15:46; करण : चतुष्पाद 18:07
    • सूर्य : धनु; चंद्र : वृश्चिक 22:50; सूर्योदय : 07:04; सूर्यास्त : 18:04
    • पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    अमावस्या

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – धोरणात्मक निर्णयांसाठी त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. आक्रमक पवित्र्यामुळे एखाद्यासोबतच्या भावनिक संबंधांना धक्का बसू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रवास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल.

    वृषभ – कौटुंबिक जीवनात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सगळ्यांसोबत झालेले एकमत परस्परांवरील विश्वास वाढवेल, जो भविष्यातील अनेक समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल.

    मिथुन – विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यावर हुशारीने उपाय शोधावे लागतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत भावनिक संबंध वाढतील. नवीन व्यवसाय सुरू होण्यास वेळ लागेल, त्यामुळे धीर धरा.

    कर्क – तुमच्या संवेदनशील स्वभावात बदल होईल. पूर्ण आत्मविश्वासाने समस्या सोडवली तर परिस्थितीवर तुमचेच नियंत्रण राहील. कौटुंबिक जीवनात तुमच्या मतांना अधिक महत्त्व मिळेल.

    सिंह – भावनिकदृष्ट्या शांत राहणे थोडे कठीण जाईल. संभाषणादरम्यान आपल्याच प्रियजनांवर शाब्दिक हल्ला करणे टाळा. आर्थिकदृष्ट्या, नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची ही योग्य वेळ नाही. शेअर बाजारापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.

    हेही वाचा – चंद्र आहे साक्षीला…

    कन्या – वर्चस्वाच्या संघर्षाला राजनैतिकतेची आवश्यकता असेल. कामाच्या ठिकाणी, तुमचे प्रयत्न जास्त पण श्रेय कमी, अशी परिस्थिती असेल. मात्र, निराश होऊ नका, उशिरा का होईना श्रमाची दखल घेतली जाईल. भावंडांशी बोलताना एकमेकांवर आरोप करणे टाळा.

    तुळ – संतुलित वर्तनाने, दोन भिन्न मतांमध्ये तुमचा दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे प्रत्येकाच्या आदरास पात्र ठराल. तुमच्या चातुर्याचे कौतुक केले जाईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याबाबत काही काळासाठी चिंता होऊ शकते.

    वृश्चिक – एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरून मन अस्वस्थ होऊ शकते. आज एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत सूडबुद्धीने वागणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. मतभेदांचा आदर करा. नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.

    धनु – तुमच्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. उच्च आर्थिक जोखीम असलेल्या निर्णयांपासून दूर राहणे चांगले. विरोधकांना हाताळताना संयम बाळगावा लागेल. भूतकाळातील एखादी घटना आयुष्यात तणाव निर्माण करू शकते.

    मकर –  अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम फायदेशीर ठरतील. भागीदारीत सुरू केलेल्या व्यवसायात मतभेदांमुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना प्राधान्य द्यावे लागेल.

    कुंभ – वेळ तुमच्या बाजूने वळत आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त भत्ते मिळू शकतात. आज वरिष्ठांच्या मतांशी सहमत व्हावे लागेल. सध्या नोकरीत कोणताही बदल करणे फारसे फायदेशीर ठरणार नाही. तसा विचार असल्यास बेत पुढे ढकला.

    हेही वाचा – “आई तू असं का केलंस?”

    मीन – भावनिकदृष्ट्या आज एकटे वाटू शकते. परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करताना किंवा अन्य आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात.


    दिनविशेष

    प्रख्यात गुजराती कवी उमाशंकर जोशी

    टीम अवांतर

    आधुनिक काळातील प्रख्यात गुजराती कवी, एकांकिका लेखक, निबंधकार आणि समीक्षक अशी ओळख असणाऱ्या उमाशंकर जोशी यांचा जन्म 21 जुलै 1911 रोजी गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील बमना या गावी झाला. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. इथूनच त्यांनी एम्‌. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते गुजरात विद्यापीठात पदव्युत्तर अध्यापनासाठी गेले आणि नंतर तिथेच ते गुजराती भाषेचे प्राध्यापक झाले. याच विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ लँग्वेजिस’ संस्थेचे नंतर ते संचालकही बनले. तर 1966 ते 1972 या काळात ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते.

    गुजरातीशिवाय त्यांना हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी या भाषा चांगल्या अवगत होत्या. याशिवाय या भाषांमधील साहित्याचाही त्यांचा सखोल व्यासंग होता. प्रादेशिक आणि आखिल भारतीय स्तरांवरील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारही त्यांना लाभले. ज्यात रणजीतराम सुवर्णचंद्रक, महिदा पुरस्कार, नर्मद सुवर्णपदक, उमा स्‍नेहरश्मी पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार, नानालाल काव्य पुरस्कार यांचा अंतर्भाव आहे.

    उमाशंकरांनी विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली. ज्यात विश्वशांती, गंगोत्री, निशीथ, विराट प्रणय, प्राचीना यासारखी पद्यनाट्ये; आतिथ्य, महाप्रस्थान, अभिज्ञासारखे काव्यग्रंथ; सापना भारा, शहीद हे एकांकिकासंग्रह; श्रावणी मेळो, विसामो यासारखे लघुकथासंग्रह; पारकां जण्यां सारखी कादंबरी; अखो : एक अध्ययन, समसंवेदन, अभिरूचि, शैली अने स्वरूप, निरीक्षा, कविनी साधना, श्री अने सौरभ इत्यादी समीक्षाग्रंथ; गोष्ठी हा निबंधसंग्रह; प्रा. बळवंतराय ठाकोर आणि बालाशंकर यांच्या काव्यांचे केलेले उत्कृष्ट संपादन; पुराणोमां गुजरात हा महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ; उत्तररामचरित आणि शाकुंतल हे त्यांनी केलेले संस्कृत नाटकांचे अनुवाद अशा विपुल साहित्य संपदेचा समावेश आहे. त्यापैकी निशीथ या पद्यनाट्याला भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार प्राप्त झाला. अशा या महान साहित्यिकाचे 19 डिसेंबर 1988 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 12, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 392
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 530
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 844
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.