Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती
    आरोग्य

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरOctober 8, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, विज्ञानाला नाकारणे, मानवी प्रवृत्ती, कोरोना काळ, प्रत्येक रुग्ण वेगळा, रोगाचे परिणाम वेगळे, कोविड महामारी, कोविड काळा, व्हॉट्सॲप विद्यापीठाचा सुवर्णकाळ, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, कोविडच्या अफवा
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्यापैकी तिला कालच्या औषधानं बरं वाटलं, पण त्याचा ताप कमी झाला नव्हता आणि त्याचा खडा सवाल होता – “असं झालंच कसं?”  त्यांना जरा किंचित मागं घेऊन गेलो, तुम्हालाही नेतो…

    कोविडनं शिकवलं एक, पण आपण शिकलो दुसरंच! साल 2020 जग थांबलं होतं. विमानं जमिनीवर, रस्ते ओस पडलेले आणि प्रत्येक घरात एक नवीन तज्ज्ञ जन्माला आलेला ‘व्हॉट्सॲप विद्यापीठाचा सुवर्णपदक विजेता’!

    कोविडनं वैद्यकशास्त्राला एक गोष्ट पुन्हा ठळकपणे दाखवून दिली, ती म्हणजे विषाणू एकच… पण परिणाम हजार प्रकारचे! काहींना लक्षणंच नाहीत, काहींना दोन दिवस ताप, काहींना ऑक्सिजनची गरज लागली आणि दुर्दैवानं काहींना अतिदक्षता विभागात जावं लागलं…

    वैद्यकीय भाषेत हे काही गूढ नव्हतं. कारण शरीर म्हणजे गणितातील ‘क्ष’ नसून प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र जैविक विश्व असतो. वय, रोगप्रतिकारशक्ती, मधुमेह, लठ्ठपणा, आनुवंशिकता, पोषण, इतर आजार हे सारे घटक मिळून आजाराचा परिणाम ठरवतात.

    साध्या भाषेत सांगायचं तर, एकच रोग + वेगवेगळी शरीरं = वेगवेगळे परिणाम!

    कोविडनं वैद्यकातील एक मोठा गैरसमज मोडला पाहिजे होता, “एकाच रोगात किंवा औषधपचारानं सगळ्यांत एकसारखे परिणाम होतात.” पण गंमत अशी की, भारतीय समाजानं यामधून नेमकं उलटंच शिकून घेतलं… रुग्ण बरा झाला! मग औषध रामबाणं!!

    हेही वाचा – मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    भारतीय समाजातील निरीक्षणशक्ती अफाट आहेच, पण कधी कधी ती विज्ञानाला मागं टाकते. शेजारचे काका कोविडमधून बरे झाले… बस्स! क्षणात निष्कर्ष निघाला,

    “काकांनी मालेगाव काढा घेतला म्हणून बरे झाले…”

    दुसरा म्हणाला, “नाही हो, त्यांनी रोज वाफ घेतली होती.”

    तिसरा म्हणाला, “छे, ते त्यांच्या तांब्याच्या ग्लासात पाणी प्यायच्या सवयीनं वाचले.”

    आणि चौथा अभिमानानं सांगू लागला, “मी तर सुरुवातीपासून सांगत होतो, हळद हेच अंतिम शस्त्र आहे! काकाही रोज दूध-हळद घेत होते…”

    ज्यांना काहीच झालं नाही, ते तर सर्वात मोठे तज्ज्ञ बनले. कोविडमध्ये हा एक विलक्षण प्रकार दिसला. ज्यांना काहीच लक्षणं नव्हती, ते म्हणू लागले, “मी तर मास्कही लावला नाही! कारण कोविड वगैरे काही नसतो. लोकं भीतीने गेली…”

    हे म्हणजे एखाद्या व्यक्तीने हेल्मेट न घालता अपघातातून बचावला म्हणून म्हणावं, “पाहा, हेल्मेटची गरजच नसते!”

    विज्ञान मात्र शांतपणे सांगत होतं, “तुम्ही वाचलात, याचा अर्थ धोका नव्हता, असा होत नाही. तुमचं शरीर सुदृढ होतं, रोगप्रतिकारक शक्ती वेगळी होती किंवा निव्वळ नशीब साथ देत होतं.”

    डॉक्टरांचं बोलणं म्हणजे भविष्यकथन नसतं. भारतीय सिनेमानं डॉक्टरांविषयी एक वेगळीच प्रतिमा तयार केलीय. डॉक्टरांनी आत येताच म्हणावं, “दोन दिवसांत पूर्ण बरे व्हाल…” आणि जर अपेक्षेप्रमाणं झालं नाही तर लगेच प्रश्न –

    “डॉक्टरांना आजारच समजला नाही का?”

    प्रत्यक्षात वैद्यक हे जादूटोणा नाही; ते संभाव्यतेचं विज्ञान आहे. कोविडनं हे जगासमोर उघड केलं. एकसारख्या वयाच्या दोन व्यक्ती – समान विषाणू, समान उपचार तरी परिणाम वेगळे! कारण डॉक्टर रोगावर उपचार करतात; पण रोग शरीरात कसा वागेल, यावर अनेक घटक परिणाम करतात.

    कोविड काळ म्हणजे व्हॉट्सॲप विद्यापीठाचा सुवर्णकाळ… या काळात एक नवीन संशोधन संस्था प्रचंड वेगानं विकसित झाली, ‘व्हॉट्सॲप विद्यापीठ’. तिथं संशोधनपत्रांची गरज नव्हती… “माझ्या मामाच्या मित्राच्या पुतण्यानं करून पाहिलं…” हा सर्वोच्च पुरावा मानला जात असे.

    वैद्यकीय संशोधनाला हजारो रुग्ण, सांख्यिकी आणि नियंत्रित अभ्यास लागतो. पण आपल्या समाजात एकच उदाहरण पुरेसं असतं –

    एक जण बरा झाला… मग उपाय सिद्ध!

    एकावर विपरित परिणाम झाला… मग औषध धोकादायक!

    विज्ञान डोकं धरून बसत असेल!!!

    हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    कोविडनं दिलेला खरा धडा म्हणजे – प्रत्येक रुग्ण वेगळा असतो… एकाच रोगाचे परिणाम वेगळे असू शकतात… उपचार म्हणजे जादूची कांडी नसते. एखादं उदाहरण म्हणजे वैज्ञानिक पुरावा नसतो. डॉक्टर भविष्य सांगत नाहीत; ते उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सर्वोत्तम निर्णय घेतात.

    पण आपण भारतीय अनेकदा असा निष्कर्ष काढतो की, “माझ्या ओळखीच्या माणसाला काही झालं नाही म्हणजे रोग धोकादायक नव्हता.”

    हा निष्कर्ष तितकाच धोकादायक आहे जितकं म्हणणं, “मी एकदा सीटबेल्ट न लावता प्रवास केला आणि वाचलो; म्हणजे सीटबेल्ट निरुपयोगी आहे.”

    शेवटी कोविडनं विषाणू विज्ञानाइतकंच समाजशास्त्रही शिकवलं. विषाणू शरीरात शिरला होता; पण अफवा, अर्धवट माहिती आणि अतिआत्मविश्वास समाजात अधिक वेगानं पसरत होते… आणि म्हणूनच कदाचित वैद्यकशास्त्रातील सर्वात मोठा धडा असा आहे,

    रोगांपेक्षा धोकादायक गोष्ट असेल तर ती म्हणजे एकाच अनुभवावरून संपूर्ण विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026 आरोग्य

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026 आरोग्य

    चेहराच फर्स्ट इम्प्रेशन…

    October 1, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    By डॉ. शैलेंद्र वैशंपायनOctober 4, 2026

    बंगाल आणि दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातही होमिओपॅथी रुजण्यामागे काही विलक्षण व्यक्तींच्या कथा आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे…

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    चेहराच फर्स्ट इम्प्रेशन…

    October 1, 2026

    Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?

    September 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 463
    • अवांतर 216
    • आरोग्य 156
    • पंचांग आणि भविष्य 619
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 978
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.