Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र

    October 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…
    ललित

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीOctober 7, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, चव्हाणांचा एकटेपणा, चव्हाणांचे शेजारी, चव्हाण आणि कुलकर्णी, चव्हाण कुलकर्णी शेजारी, चव्हाणांची श्रीमंती, कुलकर्णींचा साधेपणा, सुग्रण मंजू, चव्हाणांचा वाढदिवस, चव्हाणांना कुलकर्णींची मदत, चव्हाणांचे प्रेमळ शेजारी
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    मेसचा डबा न आल्याने चव्हाण 15 वर्षांत पहिल्यांदाच नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते. तेव्हा कुलकर्णी आणि त्यांची पत्नी मंजूने त्यांना आपल्याच घरी जेवणासाठी येण्यचा आग्रह केला. ऑफिसमधल्या कुलकर्ण्यांकडे एकदा ते जेवायला गेले होते. कसलं मिळमिळीत आणि बेचव जेवण ते! तेव्हापासून कुलकर्णी आडनावाच्या माणसाकडचं काहीही खायचं नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. पण चव्हाण नाखुशीनेच त्यांच्याकडे जेवायला गेले.

    “करा काका सुरुवात,” कुलकर्णी म्हणाले तसा त्यांनी अनिच्छेनेच घास घेतला. त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी दुसऱ्या भाजीचीही चव घेतली. तिचीही चव सुरेख होती. पोळ्या तर इतक्या छान होत्या की, त्यांच्याकडे पाहूनच भूक वाढत होती. कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं. स्वतःच्या नकळत ते जेवणावर तुटून पडले.

    सात-आठ दिवसांनी कुलकर्णी चव्हाणांना भेटायला आले…

    ‌”काका, आमच्या गावची दोन मुलं युपीएससीच्या कोर्सेससाठी इथे येताहेत. त्यांना शांत जागा हवी आहे. मी माझ्याच घरी ठेवून घेणार होतो, पण माझं घर पडतं लहान आणि त्यांच्यासाठी वेगळी रूम नाहीये माझ्याकडे. तुमच्या बंगल्यातील एखादी रुम देऊ शकाल का त्यांना? आमच्याच समाजाची मुलं आहेत. तुम्हाला त्रास देणार नाहीत, याची जबाबदारी माझी. त्रास झाला तर सांगा, मी त्यांची दुसरीकडे व्यवस्था करेन आणि हो तुम्हाला ते भाडं पण देतील. वाटल्यास तसा करार करून घेऊ…”

    हेही वाचा – चव्हाण आणि कुलकर्णी…

    ‌चव्हाणांनी विचार केला. असंही ते एकटं राहून कंटाळले होते. या मुलांमुळे त्यांना रात्रंदिवसाची सोबत मिळणार होती…

    “”मला काही हरकत नाही. चार बेडरूमचा बंगला आहे आपला… एक रूम त्यांना देऊ, ‌आणि भाड्याची काही गरज नाही. अहो, आहे तो पैसा संपत नाहीये. परत वरून भाडं कशाला?”

    ‌”असं नाही काका… हिशोबाला चोख असावं, असं तुम्हीच त्यादिवशी म्हणालात ना!”

    ‌चव्हाण हसले.

    ‌”बरं बरं. बोलावून घ्या त्यांना…”

    मुलं आली. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. दोघंही सकाळी आठ वाजताच क्लासला जायची. एकला परत यायची. जेवण झालं की, तीन वाजता परत क्लासला गेली की, सात वाजताच परतायची. चव्हाणांना त्यांचा काहीच त्रास नव्हता. उलट, चहा प्यायला आणि जेवायला त्यांना कंपनी मिळत होती. कुलकर्णींकडून आता एकाऐवजी तिघांचं जेवण येत होतं.

    ‌एक दिवस त्यातल्या एकाने देवघराकडे पाहून त्यांना विचारलं,

    ‌”काका, देवघरात खूप धूळ साचलीय. तुम्ही पूजा नाही करत?”

    ‌”करतो कधीतरी मूड झाला तर! तुझ्या काकूला फार देवाचं वेड होतं. हट्टाने एवढं मोठं देवघर बनवून घेतलं. काय ट्रॅजडी आहे बघ! ती देवदेव करायची, तर देवाने तिला लवकर उचललं. नातवंडांचं सुख काही तिला लाभू दिलं नाही. मी नास्तिक! तर, मला असं एकाकी जीवन जगायला लावतोय… मला पाटावर बसताही येत नाही रे. कशीतरी उभ्याने करतो पूजा.”

    ‌”काका, प्राक्तन देवांनाही चुकलं नाहीये. आपण तर सामान्य माणसं! तुम्हाला बसायला त्रास होत असेल तर, मी पूजा केलेली चालेल तुम्हाला?”

    ‌”अरे चालेल काय, पळेल! उद्यापासून तूच पूजा करत जा. आवडेल मला…” चव्हाण आनंदाने म्हणाले.

    ‌दुसऱ्या दिवसापासून घरात फुलं आणि उदबत्तीचा सुवास दरवळू लागला. घंटीच्या आवाजाने घराला जाग येऊ लागली. देवघरातले देव हसू लागले. देवघराकडे क्वचितच फिरकणारे चव्हाण रोज देवाला नमस्कार करू लागले. गुरुवारी नारळ, पेढ्यांचा नैवेद्य दाखवू लागले…

    ‌”काका, आमच्या मित्रांनाही क्लासेससाठी इथं यायचंय. आपल्या दोन बेडरुम रिकाम्याच असतात. जमेल का त्यांना द्यायला?”

    एक मुलाने त्या दिवशी चव्हाणांना विचारले. चव्हाण विचारत पडले. तेवढ्यात दुसरा म्हणाला,

    ‌”खरंतर काका, आपल्या बेडरूम इतक्या मोठ्या आहेत की, एका रूममध्ये चार बेड सहज मावू शकतील. बघा, मुलांनाही सोयीस्कर होईल आणि तुम्हालाही भाडं मिळेल!”

    ‌तो योग्यच म्हणत होता. असं केलं तर त्यांना घरबसल्या वीस-पंचवीस हजार मिळणार होते. चव्हाणांकडे पैशाची काही कमी नव्हती. कमी होती ती माणसांची. त्यांनी निर्णय घेतला…

    ‌”ठीक आहे. मुलं मिळत असतील तर नवीन बेडची व्यवस्था करू आपण.”

    ‌पुढच्याच आठवड्यात आणखी दहा मुलं घरात दाखल झाली. भुतांचं घर वाटणारा चव्हाणांचा बंगला माणसांनी गजबजून गेला. आलेली सर्व मुलं सभ्य होती. एका ध्येयाने झपाटलेली होती. चव्हाणांना त्यांचा त्रास तर नव्हताच, उलट मदतच व्हायची. दूध आणणं, सकाळ-संध्याकाळ चहा करणं, पंखे पुसणं, दर रविवारी टॉयलेट साफ करणं, घरातली किरकोळ दुरुस्ती करणं, चव्हाणांची ॲक्टिव्हा पंक्चर किंवा खराब झाली तर दुरुस्त करून आणणं इत्यादी कामं मुलंच करत होती.

    ‌चव्हाणांचं काम कमी झालं, पण कुलकर्णी बाईंचं वाढलं. तीनाच्या ऐवजी तेरा जणांचे डबे त्यांना करावे लागत. चव्हाणांच्या घरातल्या मुलांनी कुलकर्णी बाईंच्या स्वादिष्ट जेवणाची त्यांच्या मित्रांमध्ये तारीफ केली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेस सोडून कुलकर्णीबाईंकडे डबे सुरू केले. थोड्याच दिवसात कुलकर्णीबाईंना आपल्या घरात मेस सुरू करावी लागली. ही मेसही लगेचच फुल्ल झाली. ते पाहून चव्हाण एक दिवस कुलकर्णींना म्हणाले,

    ‌”मंजूताईंची मेस चांगलीच जोरदार चालतेय. तुम्ही गच्चीवर एखादा हॉल का नाही बांधून घेत. 40-50 लोकांची चांगली सोय होईल तिथे…”

    ‌”अहो काका, माझ्याही मनात तोच विचार चालू आहे. पण कर्ज मिळेल असं वाटत नाही. याच घराचं कर्ज अजून फिटलं नाहीये. त्यात माझी खासगी नोकरी. कर्ज द्यायला बँका कटकटी करतात.”

    ‌”किती खर्च येणार आहे हॉल बांधायला?”

    ‌”बिल्डरने मला 5 ते 7 लाख रुपयांचं बजेट दिलंय. पण ते 8 लाखापर्यंत जाईल, असं वाटतंय”.

    ‌”मी देतो तुम्हाला आठ लाख रुपये.”

    ‌कुलकर्णी त्यांच्याकडे पहातच राहिले.

    ‌”अहो, असं काय बघताय? मी खरंच तुम्हाला आठ लाख द्यायला तयार आहे.”

    ‌”खूप खूप धन्यवाद काका,” कुलकर्णी आनंदून म्हणाले. “पण किती दिवसांत परत करायचे आणि व्याज किती द्यायचं?”

    ‌”अहो, व्याज मागायला मी काय बँक आहे? नो इंटरेस्ट अँड टेक युअर ओन टाइम! मला घाई नाही.”

    ‌”ठीक आहे काका, मी पाच वर्षांत तुमचे पैसे फेडेन आणि व्याज म्हणून एक लाख जास्त देईन!”

    ‌चव्हाण जोरात हसले. कितीतरी नातेवाईकांना त्यांनी बायकोच्या म्हणण्यावरून लाखो रुपये दिले होते. त्यातले फारच कमी परत मिळाले होते. कुलकर्णी म्हणजे भलतंच इमानदार प्रकरण दिसत होतं.

    ‌चव्हाणांनी एकरकमी 8 लाख कुलकर्णींना दिले. काम सुरु झालं आणि अवघ्या तीन महिन्यांत पूर्णही झालं. मंजूताईंची मेस जोरदार सुरू झाली. कुलकर्णी कुटुंबाला आता फुरसत मिळेनाशी झाली. चव्हाणांचा डबा मात्र नियमित सुरू होता. विशेष म्हणजे, कुलकर्णींनी कधीही त्याचे पैसे मागितले नाहीत. चव्हाण स्वतःच नेऊन द्यायचे.

    ‌श्रावण महिन्यात लागोपाठ तीन सुट्या आल्या. मुलांनी नेहमीप्रमाणे घरी न जाता नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सापुतारा अशा ट्रिपचा बेत आखला. आदल्या रात्री ते चव्हाणांना म्हणाले,

    ‌”काका, तुम्हीही चला ना आमच्याबरोबर!”

    ‌”अरे, तरुण पोरांमध्ये हा म्हातारा कशाला हवा? तुम्ही जा… एंजॉय करा…”

    ‌”काका, आमचे वडील असते तर त्यांना न्यावंच लागलं असतं ना? बरं, कुलकर्णी काकांना विचारू का?”

    ‌”विचारा. ते आले तर येतो.”

    ‌मुलांनी कुलकर्णींना विचारलं. मेसलाही सुट्टी असल्याने त्यांचं पूर्ण कुटुंबच तयार झालं. ‌एक बस ठरवली गेली. तीन दिवस सगळ्यांनी खूप धूम केली. हिरवा, डोळ्यांना सुखावणारा निसर्ग, थंड वातावरण, त्याला मंदिरांची धार्मिक जोड, चव्हाण खूप खूश झाले. सरस्वतीबाई अनेक यात्रांना जात, त्या चव्हाणांना सोबत चलायचा आग्रहही करायच्या. पण चव्हाणांना फिरण्याची जराही आवड नव्हती. असं भटकण्यापेक्षा मित्रांसोबत चिकन तंदुरी खात, दारू पित सुटी घालवायला त्यांना आवडायचं. आज मात्र आयुष्याचा खरा आनंद आपण आपल्याच कर्माने उपभोगू शकलो नाही, याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली.

    0000

    ‌3 सप्टेंबरला चव्हाणांचा वाढदिवस. एरवी त्यांनी कधी साजरा केला नाही. पण आज मात्र त्यांना कशी कुणास ठाऊक सकाळीच त्याची आठवण झाली. चहा झाल्यावर त्यांनी एका मुलाला पैसे दिले आणि सांगितलं, “हॉटेलमधून सगळ्यांसाठी मिसळ आणि जिलेबी घेऊन ये. शेजारच्या कुलकर्णींनाही नेऊन दे. म्हणावं आज माझा वाढदिवस आहे.”

    ‌”वा वा, शुभेच्छा काका!”

    सगळ्या मुलांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. थोड्यावेळाने कुलकर्णी कुटुंबाने येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या…

    ‌”काका, अगोदर माहीत असतं तर, काही गिफ्ट तरी आणता आलं असतं…” कुलकर्णी म्हणाले.

    ‌”आता या वयात आम्हाला कशाला हवं गिफ्ट? अहो, तुमचं प्रेम हेच आमचं गिफ्ट!” चव्हाण गहिवरून म्हणाले.

    ‌”बरं काका, आज माझ्या एका मित्राचाही वाढदिवस आहे. त्याने तुम्हालाही बोलावलंय. तुम्ही त्याला ओळखत नाही. पण चला… तेवढाच चेंज…. नाही का!”

    ‌”हो चालेल. तुम्ही सोबत असल्यावर आम्हाला कसला प्रॉब्लेम!”

    संध्याकाळी ते निघाले तेव्हा मुलंही कुठंतरी निघाली होती…

    ‌”काय कुठे निघालात?” चव्हाणांनी विचारलं.

    ‌”एका पार्टीला चाललोय काका…”

    ‌”रात्री लवकर या.”

    ‌”हो काका.”

    ‌कुलकर्णी परिवारासोबत ते एका हॉटेलजवळ आले. जसे ते हॉलमध्ये शिरले, सगळे बसलेले उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कॉलनीतले बरेच जण त्यात दिसत होते. चव्हाणांना काही उलगडा होईना. कुलकर्णींनी त्यांचा हात धरला आणि त्यांना स्टेजकडे नेलं. स्टेज मागच्या भिंतीवर बरीच सजावट केली होती आणि त्यावर लिहिलं होतं – “हॅपी बर्थडे डियर चव्हाण काका!”

    हेही वाचा – जीवनसंग्राम

    ‌”हे काय कुलकर्णी? कुणाचा वाढदिवस…?” चव्हाणांनी आश्चर्यचकीत होऊन विचारलं.

    ‌”अहो, तुमचाच! तुमचा वाढदिवस नाहीये का!”

    ‌”अहो, पण मला काहीच कल्पना न देता…”

    ‌”सॉरी काका, पण तुम्हाला सांगितलं असतं तर, तुम्ही नाही म्हटलं असतात म्हणून… चला केक कापा.”

    ‌तेवढ्यात त्यांच्याकडे रहाणारी मुलंही तिथे पोहोचली आणि सर्वांनी “हॅपी बर्थडे टू चव्हाण काका” म्हणायला सुरुवात केली. चव्हाणांना गहिवरून आलं. आजपर्यंत त्यांचा वाढदिवस इतका जोरदार कधीही साजरा झाला नव्हता. भरलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी केक कापला. त्याचे तुकडे त्यांनी कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराला भरवले. मुलं पुढे झाली, त्यांनी चव्हाणांना केक खाऊ घातला. शेजारी उभ्या असलेल्या कुलकर्णींना चव्हाणांनी घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

    ‌कुलकर्णींनी माइक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली…

    ‌”आज सकाळीच चव्हाण काकांचा वाढदिवस आहे, हे त्यांच्याकडूनच कळलं. काकांची मुलं दूर परदेशात रहातात. अशावेळी काकांचा वाढदिवस आपण नाही साजरा करायचा तर कुणी करायचा! थोडी घाई झाली… त्यामुळे जसं जमलं तसं गोड मानून घ्या. काकांना आपण त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. काकांकडे रहाणाऱ्या मुलांनी मला खूप मदत केली. त्यांचा मी खूप आभारी आहे.”

    ‌चव्हाण बोलायला उभे राहिले, पण भावनातिरेकाने त्यांना बोलता येईना…

    ‌”मला काय बोलावं, तेच कळत नाही. इतकं मला गहिवरुन येतंय. अहो, माझ्या मुलांनी, नातेवाईकांनी कधी माझा वाढदिवस साजरा केला नाही. कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत आणि तुम्ही… तुम्ही माझे ना नात्याचे ना गोत्याचे… तुम्ही माझा वाढदिवस आणि तोही इतक्या जोरात साजरा करताय… माझा खरा परिवार आणि खरे नातेवाईक तर तुम्हीच आहात. खूप खूप धन्यवाद…” पुढे न बोलता आल्याने त्यांनी माइक ठेवून दिला. कुलकर्णींनी त्यांना जवळ घेतलं.

    क्रमश:

    (ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026 ललित

    उंचावरचं जग

    October 7, 2026 ललित

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    By डॉ. विवेक वैद्यOctober 7, 2026

    गोष्ट खूप जुनी. फारसे चढउतार नसलेली. तरीही छान आठवण… माझ्यासाठी तरी! मी मॅट्रिक पास झालो…

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र

    October 7, 2026

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 618
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 978
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र

    October 7, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.