Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तुज आहे तुजपाशी
    अध्यात्म

    तुज आहे तुजपाशी

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीOctober 8, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, सत्यज्ञान, खरी साधना, आत्मा परब्रह्म, तुज आहे तुजपाशी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 7

     

    सर्वप्राणिषु यो व्याप्तो

    ह्यवस्थात्रयसाक्षकः।

    जाग्रत्स्वप्नसुषुप्तौ च

    प्रकाशरूपभासकः॥

    – गीताव्रत

    विश्वातील सर्व प्राण्यांमध्ये अत्यंत समभावाने व्याप्त असलेला आणि मानवी जीवनातील सर्व अवस्थांचा केवळ एक अलिप्त साक्षीदार असलेला, तो एकच आत्मा आहे. माणसाचे संपूर्ण जीवन हे प्रामुख्याने तीन अवस्थांमध्ये विभागलेले असते आणि त्या अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती म्हणजे जेव्हा आपण पूर्ण जागे असतो आणि बाह्यजगात वावरत असतो. स्वप्न म्हणजे जेव्हा आपण झोपेत एक वेगळेच काल्पनिक जग पाहात असतो आणि सुषुप्ती म्हणजे अत्यंत गाढ आणि स्वप्नरहित झोप… जिथे आपल्याला कोणत्याही गोष्टीचे भान नसते. या तिन्ही अतिशय भिन्न अवस्था, ज्या एका अखंड प्रकाशाने प्रकाशित होतात; तो प्रकाश म्हणजे आपला आत्मा!

    गाण्याच्या मैफलीमध्ये गायक अनेक वेगवेगळे राग गातो… कधी तो आलाप घेतो, कधी जलद ताना घेतो, तर कधी तो गाणे थोडे संथ करतो किंवा थांबवतो. गाण्याचे हे प्रकार सतत बदलत असतात, पण त्या गायकाच्या मागे जो तानपुरा वाजत असतो, त्याचा नाद मात्र अखंड आणि एकसारखाच सुरू असतो. तानपुऱ्याचे त्या मूळ सुराला गाण्याच्या चढउतारांशी काहीही कर्तव्य नसते, तो केवळ एक भक्कम आधार असतो. आपला आत्मा अगदी त्या तानपुऱ्यासारखा आहे. जागृतीचा राग असो, स्वप्नाची तान असो किंवा गाढ झोपेची विश्रांती असो… आत्मा या सर्व अवस्थांना केवळ पाहतो आणि त्यांना प्रकाशित करतो. तो कोणत्याही अवस्थेत अडकत नाही किंवा बदलत नाही तो अखंड आणि एकसंधच राहतो.

    यथा सूर्ये प्रकाशे च

    ह्यन्धकारो न तिष्ठति।

    तथात्मानि चिदाकार

    ह्यज्ञानं नैव तिष्ठति॥

    – गीताव्रत

    आपण नेहमी अज्ञान दूर करण्याचा किंवा अज्ञानाशी लढण्याचा प्रयत्न करत असतो. पण अज्ञान म्हणजे नक्की काय आहे, हे या श्लोकातून अतिशय सोप्या पद्धतीने उलगडते. आकाशात तळपणारा सूर्य हा पूर्णपणे प्रकाशमय आहे. जर आपण सूर्याला विचारले की, अंधार कसा असतो तर, “सूर्याला अंधार ही संकल्पना कधीच समजू शकणार नाही, कारण सूर्याने अंधार कधी पाहिलाच नसतो” आणि तो पाहूही शकत नाही, शकणार नाही. सूर्याच्या उपस्थितीत अंधाराचे अस्तित्व पूर्णपणे शून्य असते. जर आपण हातामध्ये एक अत्यंत प्रखर असा पेटता कंदील घेऊन खोलीत अंधार शोधायला निघालो तर आपल्याला संपूर्ण खोलीत कुठेही अंधार सापडणार नाही. कारण, आपण तो कंदील जिथे जिथे घेऊन जाऊ तिथे तिथे तो प्रकाश आपल्या आधी पोहोचलेला असेल. प्रकाश आणि अंधार कधीच एकत्र राहू शकत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे आपला जो मूळ आत्मा आहे, तो स्वतःच चिरंतन ज्ञानस्वरूप आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याच्यामध्ये अज्ञानाचा अंधार राहणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. आपण जे अज्ञान अनुभवतो ते आत्म्याचे नसून ते केवळ आपल्या बुद्धीचे आणि मनाचे असते. जेव्हा आपण स्वतःला त्या ज्ञानरूप आत्म्याशी एकरूप करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की, अज्ञान नावाची कोणतीही मूळ वस्तू या जगात अस्तित्वातच नाही! ते केवळ प्रकाशाचे नसणे आहे आणि जिथे आत्मा आहे, तिथे प्रकाशाचे नसणे कधीच घडू शकत नाही.

    हेही वाचा – आत्म्याचा खरा साक्षात्कार

    निर्विकारः सदात्मा हि

    न कदापि विनाश्यते।

    विकारो जायते यत्र

    तस्य नाशो हि दृश्यते॥

    – गीताव्रत

    या जगात ज्या ज्या गोष्टींमध्ये स्थित्यंतर घडते किंवा ज्या गोष्टी बदलतात त्या सर्व गोष्टी अंतिमतः विनाशशील असतात, हा निसर्गाचा अत्यंत कडक आणि न चुकता पाळला जाणारा नियम आहे. आपण दुधाचे उदाहरण पाहूया. जेव्हा दुधामध्ये विरजण पडते, तेव्हा त्या दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होते. इथे दुधामध्ये एक मोठा बदल किंवा स्थित्यंतर घडले. पण याचा दुसरा अर्थ काय होतो, तर दही निर्माण झाले याचाच अर्थ मूळ दुधाचा नाश झाला. जो बदलतो तो मूळ स्वरूपातून कायमचा नष्ट होतो. पण आपला आत्मा हा पूर्णपणे अपरिवर्तनीय आणि निर्विकार आहे. त्याला कोणतेही स्थित्यंतर नसते. जर आत्म्यात कोणताही बदल किंवा स्थित्यंतर घडले असते, तर तो आत्मा देखील नक्कीच विनाशशील आणि मरणधर्मा झाला असता. पण आत्मा हा शुद्ध सोन्यासारखा आहे. लोखंडाला जसा गंज लागतो आणि ते हळूहळू मातीमोल होते, तसा सोन्याला कधीही गंज लागत नाही. सोने वर्षानुवर्षे जमिनीत पुरून ठेवले तरी ते आपल्या मूळ स्वरूपात आणि तेजात तसेच राहते. आपला आत्मा या चिरंतन सुवर्णासारखा आहे. त्याच्यावर बालपण, तारुण्य किंवा म्हातारपण यांचे कोणतेही संस्कार होत नाहीत. तो नेहमी जसा आहे, तसाच राहतो आणि म्हणूनच तो पूर्णपणे अविनाशी आणि अमर आहे.

    आत्मलाभः परो लाभः

    शास्त्रेषु परिकीर्तितः।

    अहङ्काराद्यनात्मा हि

    न लाभ इति कीर्तितः॥

    – गीताव्रत

    मानवी जीवनात आपण अनेक प्रकारचे लाभ आणि फायदे मिळवण्याच्या मागे धावत असतो. आपल्याला भरपूर संपत्ती हवी असते, मोठे पद हवे असते, समाजात मोठी प्रतिष्ठा हवी असते आणि हे सर्व मिळाल्यावर आपल्याला वाटते की, आपण आयुष्यात खूप मोठा लाभ मिळवला आहे. पण आपली सर्व शास्त्रे अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतात की, आपल्या स्वतःच्या आत्म्याचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होणे, हाच या मानवी जीवनातील सर्वात मोठा आणि सर्वश्रेष्ठ लाभ आहे. केवळ अहंकार आणि देहभावासारख्या अनात्म गोष्टींना स्वतःचे मानून त्या कुरवाळत बसणे, हा कोणताही खरा लाभ नव्हे.

    एका गावात एक अत्यंत भिकारी होता. तो भिकारी एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसून लोकांकडे भीक मागत असे. अनेक वर्षे भीक मागून त्याने आपले आयुष्य काढले. आयुष्यभर आपल्या दैवाला तो कोसत राहिला आणि शेवटी तो तिथेच मरण पावला. गावातील लोकांनी त्याला त्याच झाडाखाली तो नेमका बसायचा तिथेच खड्डा खणून पुरून टाकले. पण खड्डा खणताना त्यांना त्या भिकारी बसायचा जागेखाली अत्यंत मौल्यवान अशा सोन्याच्या आणि हिऱ्यामोत्यांच्या घागरी सापडल्या. तो भिकारी ज्या जागेवर बसून आयुष्यभर दोन दोन पैशांसाठी लोकांसमोर हात पसरत होता, अगदी त्याच जागेखाली कुबेराची अफाट संपत्ती दडलेली होती. पण केवळ अज्ञानामुळे तो जन्मभर दरिद्री राहिला. आपल्याला आपल्या हृदयातला परमात्मा परमेश्वराचा ईश्वरी खजिना समजला नाही तर, आपली अवस्था अगदी त्या भिकाऱ्यासारखीच होईल! आपल्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा अथांग खजिना दडलेला आहे, पण आपण तो न शोधता बाह्यजगात क्षणभंगुर सुखासाठी अपेक्षेने वणवण करीत आहोत. स्वतःचा हा आंतरिक खजिना शोधणे, हाच खरा उद्देश आणि खरा लाभ आहे, हे बुद्धीलाही अत्यंत सहजपणे पटले पाहिजे.

    साक्षाद् ब्रह्म भवेदात्मा

    श्रुतिवाक्येषु निश्चितम्।

    हृदयग्रन्थिविच्छेदः

    आत्मज्ञानेन निश्चितम्॥

    – गीताव्रत

    उपनिषदे आणि वेदांचे जे अत्यंत पवित्र ज्ञान आहे, त्याला आपण ‘श्रुती’ असे म्हणतो. या श्रुतिवचनात अत्यंत ठामपणे सांगितलेय की, “आपला आत्मा हा साक्षात परब्रह्मच आहे. आपण परमेश्वराला नेहमी आकाशात किंवा एखाद्या दूरच्या अज्ञात ठिकाणी, स्वर्गात शोधत असतो. पण श्रुती आपल्याला अतिशय प्रेमाने आणि कळवळून सांगतात की, आत्मा तिथे दूर कुठेही नाही, तर तो इथेच आहे आणि तो आपल्याच हृदयात आहे.

    हेही वाचा – खरी साधना आणि ध्यान

    शाळेत असताना आम्हाला एक धडा होता, ‘मामा की ऐनक’. कपाळावरच त्यांचा चष्मा अडकवलेला असतो आणि ते संपूर्ण घरभर अतिशय अस्वस्थ होऊन तो चष्मा शोधत असतात. चष्मा कुठेही हरवलेला नसतो, तो त्यांच्याच डोक्यावर डोळ्यांच्या अगदी जवळ त्यांच्या शरीरावरच असतो, पण जाणिवेच्या अभावामुळे ते संपूर्ण घर पिंजून काढतात. त्यांना तो चष्मा कपाळावरच सापडतो.

    आपला आत्मा अगदी असाच आहे, तो इथेच उपलब्ध आहे. जेव्हा या प्रत्यक्ष आत्म्याचे ज्ञान होते, तेव्हा श्रुती सांगते की, माणसाच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी एका क्षणात छिन्नभिन्न होऊन जातात. ग्रंथी म्हणजे संशयाच्या आणि अज्ञानाच्या गाठी. आपण मनामध्ये ज्या अनेक संशयाच्या गाठी बांधून ठेवल्या आहेत, त्या सर्व गाठी या ज्ञानाच्या प्रकाशात आपोआप सुटतात आणि माणसाची सर्व सकाम कर्मे तिथेच कायमची थांबतात. जर या मानवी जन्मात हा आत्मलाभ झाला नाही तर, ते एक अत्यंत मोठे नुकसान आहे, असा इशाराही श्रुती आपल्याला देतात.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    By Team AvaantarOctober 8, 2026

    अध्याय चौदावा तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥6॥ तेवीं सत्त्वें लुब्धकें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र

    October 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 463
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 619
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 978
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.