Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 17 जून 2025
    पंचांग आणि भविष्य

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 17 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 17, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 27 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 17 जून 2025, वार : मंगळवार

    तिथि : षष्ठी 14:46, नक्षत्र : शततारका 25:01, योग : विश्कंभ 09:33, करण : विष्टी 26:13

    सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ

    सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:17

    पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवस थोडा व्यग्र असू शकतो. पैशाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बळकट होईल. मात्र, अनावश्यक चिंता आणि राग कामात अडथळा आणू शकतो. कुटुंबातील कोणाशी तरी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यात संयम ठेवा.

    वृषभ – एखाद्या नवीन व्यक्तीची भेट होईल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. या व्यक्तीसोबत भविष्यात एखादे नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. फक्त कोणाच्याही भावना दुखावू नका. कुटुंबासमवेत संध्याकाळ घालवण्याची संधी मिळेल.

    मिथुन – मालमत्तेशी संबंधित जुन्या वादात विजय मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मदतीने काम सोपे होईल. नोकरदारांना नवीन कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. मित्रांच्या मदतीने दिवसातली महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

    कर्क – नोकरी, व्यवसायासाठी दिवस सामान्य राहील, परंतु काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. जोडीदाराची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे धावपळ वाढेल. एखाद्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला उपस्थित असाल तर तिथे विचारपूर्वक बोला, अन्यथा लोकांचा गैरसमज होईल.

    सिंह – नोकरदार असाल तर कारकीर्दीत चांगल्या संधी मिळतील. पदोन्नतीची बातमी मिळू शकते. जे आयात-निर्यातीचे काम करतात, ते एखाद्या मोठ्या व्यवहाराला अंतिम रूप देऊ शकतील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल. भावंडांकडून मदत मिळेल.

    कन्या – अनावश्यक खर्चांमुळे त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शत्रू त्रास देऊ शकतात, चातुर्याने त्यावर मात करावी लागेल. आर्थिक समस्या उद्भवू शकतील. मात्र, आधी गुंतवलेल्या पैशांचा तुम्हाला फायदा होईल.

    तुळ – आपल्या क्षेत्रात प्रगती कराल. उत्पन्नाचे अनेक स्रोत समोर येतील. तुमच्या विचारांचा लोकांवर प्रभाव पडेल. प्रभावशाली लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या ज्या समस्या तुम्हाला त्रास देत होत्या, त्या आता दूर होतील.

    वृश्चिक – रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणचा निष्काळजीपणा मोठा परिणाम करून जाईल. तथापि, नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला असेल. मात्र जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

    धनु – खर्च वाढण्याची शक्यता असली तरी, चांगल्या उत्पन्नामुळे दिवस तणावमुक्त राहील. घरातील ज्येष्ठांशी शुभ कामाबाबत चर्चा होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावंडांसोबतच्या नात्यातील तणाव दूर होईल, प्रत्येकजण एकमेकांसोबत उत्तम वेळ घालवेल.

    मकर – हा संपूर्ण आठवडाच उत्तम जाणार आहे. आज इतरांचे भले कराल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वेळ घालवू शकाल. मात्र, त्याचवेळी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

    कुंभ – मित्र, मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा दिवस असेल. मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर पूर्ण माहिती घेऊन मगच पुढे जा. नोकरदार व्यक्तीला नोकरीसंदर्भात चांगली ऑफर मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

    मीन – या राशीतील व्यापाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल. मात्र मानसिकदृष्ट्या काहीसा तणावाचा दिवसही असू शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवा, दुखापत होण्याचा धोका आहे. नोकरदार व्यक्तींनी कामाला प्राधान्य द्यावे. मुलांच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते.


    दिनविशेष

    ‘सुधारक’ गोपाळ गणेश आगरकर

    ‘सुधारक’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले गोपाळ गणेश आगरकर  हे फक्त समाजसुधारकच नव्हते तर मोजक्याच उदारमतवादी, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून देखील आगरकरांची ओळख आहे. त्यामुळे अनेकदा असं म्हणतात की, जितकं महत्त्व लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात आहे, तितकंच आगरकरांचं महत्त्व समाज प्रबोधनात आहे. समाजातील वाईट चालीरीतीबाबत अत्यंत कठोर शब्दांमध्ये आगरकर आपले विचार व्यक्त करत असत. त्यामुळे समाजातून निर्माण झालेल्या मोठ्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागायचे. इतकेच नाही तर सनातनी लोकांनी आगरकरांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढली होती. 1881 साली स्थापन झालेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. पुढे संमती वयाच्या कायद्यावरून टिळक आणि आगरकर यांच्यातील वाद विकोपाला‌ गेले आणि आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यानंतर 1888मध्ये त्यांनी ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ‘इष्ट असेल ते बोलेन आणि साध्य असेल ते करेन’ या त्यांच्या प्रसिद्ध वाक्याप्रमाणेच ते आयुष्यभर जगले. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी दम्याचा विकार बळावल्याने 17 जून 1895 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.