Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 16, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1948; तिथि : पंचमी 08:59; नक्षत्र : विशाखा 17:21;
    • योग : वैधृति 12:21; करण : कौलव 21:49;
    • सूर्य : सिंह; चंद्र : तुळ 10:48; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:42;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    निसर्गकवी ना.धों.महानोर

    टीम अवांतर

    निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना.धों. महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी जळगाव जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक शिक्षण शेंदुर्णीत झाले. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. परंतु आर्थिक समस्यांमुळे महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.

    ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांनी आपल्या कविता, गाणी आणि लेखनातून उलगडलेली मातीची ओल, शेतकऱ्यांचे दुःख, संघर्ष आणि आशा यामुळे ते खऱ्या अर्थाने शेतीमातीचे ,शेतकऱ्यांचे कवी ठरले. त्यांनी आपल्या कवितांमधून, गीतांमधून फक्त मनोरंजन केले नाही, तर समाजाला विचार करायला प्रवृत्त केले. शेतकरी असल्याने त्यांच्या शब्दांना ग्रामीण मातीचा सुगंध आहे. “या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो…” किंवा “ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे… आणि या मातीतूनी चैतन्य गावे…” सारख्या अजरामर कविता त्यांच्या लेखणीतून साकारल्या.

    हेही वाचा – अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    याशिवाय ‘वही’, ‘पावसाळी कविता’ हे त्यांचे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. काव्य लेखनाबरोबरच गांधारी ही त्यांची कादंबरी देखील वाचक प्रिय ठरली. त्याबरोबरच गपसप आणि गावातल्या गोष्टी हे लोक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी लोकगीतांचे संकलनही देखील केले. ‘पळसखेडची गाणी’ या नावाने हे संकलन प्रसिद्ध झाले. ना. धों. महानोर यांचा ‘त्या आठवणींचा झोका’ हा ललित गद्य संग्रह देखील प्रसिद्ध आहे.

    कविता लेखनाबरोबरच ना .धों. महानोर यांनी अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले. ती गाणी देखील खूप गाजली. एक होता विदूषक ,जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा,  इत्यादी प्रसिद्ध चित्रपटातील अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत .मी रात टाकली, जांभूळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रानं झालं आबादानी ,आम्ही ठाकरं ठाकरं, घन ओथंबून येती, नभ उतरु आलं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती यांसारखी अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांनी महाराष्ट्राला दिली.

    महाराष्ट्र सरकारने 1978 मध्ये साहित्यिक−कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. साहित्यिक प्रश्नांबरोबरच त्यांनी कृषी क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव त्यांनी हिरहिरीने सभागृहात मांडले, जे पारित देखील झाले. 1978 ते 84 या काळाबरोबरच 1990 ते 95 मध्ये देखील ते विधान परिषदेवर होते.

    त्यांच्या या साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात भारत सरकारचा पद्मश्री, साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कार, मराठवाडा भूषण, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, ‘कृषिरत्न’ हे शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्णपदक त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांबरोबरच अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. असा हा रानकवी 3 ऑगस्ट 2023 रोजी काळाच्या पडद्याआड गेला.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज एका महत्त्वाच्या कामातील सकारात्मक परिणामांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी परिश्रमपूर्वक आणि चिकाटीने काम करावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्याची चांगली संधी मिळू शकते. आर्थिक दिलासाही मिळेल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

    वृषभ – आज परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असेल. नियोजित प्रकल्पांमधील काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये बदल अनुभवता येईल, जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन जगात काम करणाऱ्यांना अशी व्यक्ती भेटू शकते, जी त्यांना भविष्यात लाभ मिळवून देईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य नेहमीपेक्षा चांगले राहील. मात्र त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

    मिथुन – आज तुम्ही स्वतःच्या ध्येयांबाबत खूप गंभीर असाल आणि ती साध्य करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. एखादी चांगली बातमी मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. काही काळापासून तुम्हाला सतावणारे काम वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे सोपे होईल.  दिवसभरात, तुम्ही असे एखादे कार्य हाती घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला आदर आणि प्रशंसा मिळेल.

    कर्क – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. सुज्ञपणे वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळविण्यास मदत होऊ शकते. एका महत्त्वाच्या कामात अनुभवी व्यक्तीचा सल्ला किंवा मदत खूप उपयुक्त ठरेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अनावश्यक आर्थिक जोखीम घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद किंवा चर्चा टाळणे उत्तम ठरेल. सृजनशील क्षेत्रांमध्ये, विशेषतः गायन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात.

    सिंह – आजचा दिवस चांगला असेल, मात्र तुमचे यश तुमच्या वागणुकीवर आणि निर्णयक्षमतेवर अवलंबून असेल. तुमच्या विचारांमध्ये आणि वागणुकीत संतुलन राखा आणि कोणावरही अती विश्वास ठेवणे टाळा. आज मोठे आणि घाईने निर्णय घेणे टाळणे शहाणपणाचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक संभाव्य समस्या टाळण्यास मदत होईल. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील, मात्र कार्यालयातील कामाचा ताण नेहमीपेक्षा जास्त असू शकतो. बोलताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा.

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधार होईल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभासोबतच, कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. शिवाय करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. कामाशी संबंधित नवीन आणि उपयुक्त कल्पना येतील, ज्यांची योग्य दिशेने अंमलबजावणी केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. क्रीडा क्षेत्रात सहभागी असलेल्यांना त्यांच्या प्रशिक्षणात काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.

    तुळ – आज कामाचा व्याप कायम राहील. दुसरीकडे तुमच्या शब्दांचा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. काही कौटुंबिक बाबींकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल, कारण अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. नोकरीतील बदलीबाबतची तुमची चिंता आज संपण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो.

    वृश्चिक – आजचा दिवस आनंद आणि सकारात्मक घटनांनी भरलेला असेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी तुमचा चांगला समन्वय राहील आणि सांघिक कार्यामुळे कामे पूर्ण करणे सोपे जाईल. तुम्हाला अचानक नवीन स्रोतातून पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित होईल. आज तुमच्या मेहनतीला पूर्ण फळ मिळेल असे संकेत आहेत. सर्जनशील कार्यांमध्ये तुम्हाला विशेष यश मिळू शकते. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. छोटी समस्या नंतर मोठ्या आजारात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.

    हेही वाचा – गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कोणतेही काम घाई करण्याऐवजी संयमाने आणि समजूतदारपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कार्यालयातील सकारात्मक वातावरण तुम्हाला प्रेरित ठेवेल. सरकारी विभागांशी संबंधित असलेल्यांना पदोन्नती किंवा वाढीव जबाबदारीची संधी मिळू शकते. नवीन तंत्रज्ञान किंवा एआयसारखे काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा देखील होऊ शकते.

    मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे.  तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. ऑफिसमधील कामाला गती येईल आणि महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. भावंडांशी चर्चा करणे शक्य होईल आणि काहीतरी नवीन करण्याची योजना आखली जाऊ शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक दिलासा मिळेल. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.

    कुंभ – आज तुम्हाला कामाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण संधी मिळू शकते. योग्य वेळी उचललेले पाऊल मोठा फायदा मिळवून देऊ शकते. नशिबाची साथ मिळाल्यास, अवघड कामेसुद्धा सोपी वाटतील. आज अचानक आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. तुमच्या कामामुळे प्रभावित होऊन लोक तुमची प्रशंसा करतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. एका विशेष आणि प्रभावशाली व्यक्तीला भेटणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. आज तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कारण आजचा दिवस प्रगतीसाठी एक चांगली संधी घेऊन येणारा आहे.

    मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. एका विशिष्ट कार्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.   व्यावसायिक बाबी अनुकूल राहतील. सामाजिक कार्यातही यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन कामे समोर येऊ शकतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल किंवा त्यांना भेटाल. आज स्वतःहून पुढाकार घेणे आणि संधींचा फायदा घेणे विशेषत्वाने फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 15, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 24…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 13 ते 19 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 583
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 922
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.