Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 11, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 11 मे 2026; वार : सोमवार

    भारतीय सौर : 21 वैशाख शके 1948; तिथि : नवमी 15:23; नक्षत्र : शततारका 25:27;

    योग : ऐंद्र 25:03; करण : वणिज 27:14;

    सूर्य : मेष; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:03;

    पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;

    शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

    टीम अवांतर

    मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म 11 मे 1914 रोजी गोव्यातील बांदिवडे या गावी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव दुर्गा केळेकर होते. त्यांना लहानपणापासून गाण्याची विशेष आवड होती. त्यामुळे पूर्णवेळ गाण्याचेच शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला बहीण गिरिजाबाई आणि नंतर आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम त्यांना सुरू झाली.

    लहान वयातच त्यांना ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या तत्कालीन खासगी आकाशवाणी केंद्रावर गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर याच केंद्रावरून ज्योत्स्नाबाईंना महिन्यातून पाच-सहा वेळा तरी गाण्याची संधी मिळत गेली. त्यामुळे बालगायिका म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. पुढे विविध आकाशवाणी केंद्रांवरून त्यांना गाण्यासाठी आमंत्रणे येत राहिली. आकाशवाणीवरील गायनामुळे वक्तशीरपणा आणि मैफल थोडक्या वेळात कशी रंगवावी हे गुण त्यांच्या अंगी लहानपणीच मुरले. वयाच्या 14-15व्या वर्षी त्या रागदारी संगीतात पारंगत झाल्या. याच काळात मुंबईमध्ये भावगीत हा गीतप्रकार खूपच प्रचलित होऊ लागला होता. त्याचेही रीतसर शिक्षण त्यांनी आपले भावी पती केशवराव भोळे यांच्याकडे घेतले. बशीर खाँ, धम्मन खाँ या उस्तादांकडून ज्योत्स्नाबाईंनी ठुमरी आणि दादरा याची तालीम घेतली. तानरस घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.

    हेही वाचा – 90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या संत सखू या चित्रपटात सखूबाईंची भूमिका केली. त्यांच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरुवात येथून झाली. त्यानंतर ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकातील ‘बिंबा’ ही ज्योत्स्नाबाईंची रंगमंचावरील पहिलीच भूमिका खूप गाजली. रंगभूमीवर नाटकाला पार्श्वसंगीत देण्याचा पहिलाच प्रयोग या नाटकाच्या निमित्ताने करण्यात आला. पुढे नाट्यनिकेतन या संस्थेच्या ‘कुलवधू’ या सामाजिक नाटकातील त्यांनी केलेली भानुमतीची भूमिका खूपच गाजली. या नाटकात त्या पंचवीस वर्षे मुख्य नायिकेचे काम करत होत्या. याशिवाय त्यांची राधाबाई (राधा), भूमिकन्या सीता (सीता), कोणे एके काळी (कल्याणी), अलंकार (वत्सला), आराधना (देवकी), धाकटी आई (वीणा), भाग्योदय (भानुमती), रंभा (सुगंधा), विद्याहरण (देवयानी) ही नाटके आणि त्यातील भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी आराधना हे नाटक देखील लिहिले. या नाटकाची पद्यरचना, संगीतदिग्दर्शन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले होते. याशिवाय अडला हरी ही विनोदी श्रुतिका, घराण्याचा पीळ ही संगीतप्रधान नाटिका त्यांनी आकाशवाणीकरिता लिहिली.

    भावगीत हा संगीतप्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. ज्योत्स्नाबाईंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार यांचा समावेश आहे. 1981 मध्ये सेऊल, कोरिया येथील ‘जागतिक नाट्य परिषदेमध्ये’ महाराष्ट्र नाट्य संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. तसेच गोव्यात झालेल्या 64 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. 1 ऑगस्ट 2001 रोजी ज्योत्स्नाबाईंचे पुणे येथे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – जुन्या कर्जाचा भार आज कमी होण्याची शक्यता आहे. पण सावध रहा, अनावश्यक खर्चामुळे त्रस्त होऊ शकता. शेअर बाजारातील अचानक झालेली वाढ मोठा नफा मिळवून देऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी कामाची धावपळ असेल, त्यात लक्ष सतत विचलित होऊ शकते. अनोळखी लोकांच्या गोड शब्दांना बळी पडू नका. मेहनतीचे फळ तुम्हाला अखेरीस मिळेलच.

    वृषभ – आज तुमचे नेतृत्व कौशल्यही जगासमोर येईल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करणे, ही यशाची गुरुकिल्ली ठरेल. प्रवासादरम्यान, भविष्यात उपयोगी पडणारी माहिती मिळू शकते. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. घर सजवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. संततीकडून आलेली आनंदाची बातमी मनाला शांती देईल.

    मिथुन – नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रयोग यशस्वी ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. वडिलांशी एखाद्या व्यावसायिक कराराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तुमची जीवनशैली सुधारेल आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा एका लहानशा गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट.

    कर्क – आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. मानसिक तणाव कमी होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित बातमी मिळू शकते. मात्र, कामापेक्षा मौजमजेत अधिक काळ रमल्याने नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. विरोधकांपासून सावध रहा. कौटुंबिक बाबी घरापुरत्याच मर्यादित ठेवा.

    सिंह – आज तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. तुमचे निर्णय अचूक असतील, ज्यामुळे काम सोपे होईल. एखाद्या सहकाऱ्याच्या शब्दांमुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, परंतु प्रेम आणि समर्थनाची भावना तुमचे नातेसंबंध दृढ ठेवेल. एखाद्या दूरच्या नातेवाईकाला भेट देण्याचा बेत आखू शकता.

    कन्या – आज नवीन मालमत्ता विकत घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. रखडलेला एखादा व्यावसायिक सौदाही मार्गी लागू शकतो. जुनी कर्जे फेडण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात एखाद्या शुभ प्रसंगाची तयारी सुरू होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.

    तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. काही प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर ते सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करणे आवश्यक असेल. आईने दिलेल्या कोणत्याही जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. मुलांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल.

    वृश्चिक – नोकरी शोधणाऱ्या जातकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. ओळखी आणि संपर्कक्षेत्र यात वाढ होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेता येईल, पण त्याचवेळी पोटाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कामासाठी आज प्रवास करावा लागू शकतो.

    हेही वाचा – लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    धनु – नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. एक नवीन व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. आईसोबत एखाद्या कौटुंबिक बाबींवर चर्चा कराल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखाद्या प्रकरणामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. सामंजस्याने मार्ग काढा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, पण त्यावेळी जुने वादाचे मुद्दे उपस्थित करणे टाळा.

    मकर – प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल, पण तुमचे विरोधकही सक्रिय राहतील. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे असेल. आजचा दिवस राजकारणात सक्रिय असलेल्यांसाठी विशेष संधी घेऊन आला आहे. तुमची एखाद्या प्रमुख नेत्याशी भेट होऊ शकते. जोडीदारासोबत खरेदीला जाण्याचा बेत आखू शकता, पण खर्चाबाबत सावधगिरी बाळगा. उसने पैसे घेणे आणि गाडी चालवणे टाळा.

    कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायातील नवीन बदल तुम्हाला प्रगतीपथावर नेतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदाराला मिळणाऱ्या पदोन्नतीमुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. घरात धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल, नातेवाईकांची त्या निमित्ताने वर्दळ असेल.

    मीन – नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन करू शकता. यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. रागावर तसेच शब्दांवर नियंत्रण ठेवा. एखादा शब्द समोरच्याच्या भावना दुखावू शकतो, म्हणून काळजी घ्या. मुलांच्या संगतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वडिलांच्या एखाद्या कटू शेऱ्यामुळे तुम्हाला किंचित अस्वस्थ वाटू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    By Team AvaantarJune 13, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 जून 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 23…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 326
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 699
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.