Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 10, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 10 जून 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 20 ज्येष्ठ शके 1948; तिथि : दशमी 24:57; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 09:21;
    • योग : आयुष्मान 06:29, सौभाग्य 28:02; करण : वणिज 13:51;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:14;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण

    टीम अवांतर

    राष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात सलग एक दशक वर्चस्व गाजवणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकावणारे प्रकाश पदुकोण यांचा जन्म 10 जून 1955 रोजी बंगलोर येथे झाला. 1971मध्ये वयाच्या 16व्या वर्षी पदुकोण यांनी राष्ट्रीय वरिष्ठ अजिंक्यपद जिंकले आणि हा पराक्रम करणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले.

    त्यानंतर 1979पर्यंत त्यांनी प्रत्येक राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले आणि सलग नऊ राष्ट्रीय अजिंक्यपदांचा विक्रम केला. 1978मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरी बॅडमिंटन सुवर्णपदक जिंकले. मात्र त्यांची सर्वात मोठी कामगिरी ठरली 1980 मध्ये. त्यावेळी ते जगातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय बनले. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमुळे पदुकोण  जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये नंबर वन बनले आणि हा दर्जा मिळवणारे ते पहिले भारतीय बनले.

    हेही वाचा – …असाही विचार करता येतो!

    ऑक्टोबर 1981मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे पहिला अल्बा वर्ल्ड कप त्यांनी जिंकला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पुणे येथे पहिली इंडियन मास्टर्स (जी आता इंडिया ओपन म्हणून ओळखली जाते) जिंकली. 1982मध्ये त्यांनी डच ओपन आणि हाँगकाँग ओपन जिंकले. 1983च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदुकोण यांनी पुरुष बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले.

    1989मध्ये त्यांनी स्पर्धात्मक बॅडमिंटन सर्किटमधून निवृत्ती घेतली. 1994मध्ये राष्ट्रीय विजेता विमल कुमार यांच्यासोबत त्यांनी बंगळुरू येथे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीची स्थापना केली. पुलेला गोपीचंद आणि अपर्णा पोपटसारखे राष्ट्रीय विजेते हे पदुकोण यांनीच घडवलेले विद्यार्थी आहेत. स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर, पदुकोण यांनी थोड्या काळासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी 1993 ते 1996 या काळात भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. त्यांनी गीत सेठी सोबत ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टची सह-स्थापना केली, ही संस्था भारतातील ऑलिम्पिक खेळांच्या प्रचारासाठी समर्पित आहे 1972 सालच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या पदुकोण यांना 1982 साली भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018मध्ये त्यांना भारतीय बॅडिमटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले तर 2021 मध्ये जागतिक बॅडमिंटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि गोल्फर अनिशा पदुकोण या त्यांच्या कन्या आहेत.


    आजचे राशीभविष्य

    मेष – रागावर, विशेषत: शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया दिल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. आयुष्यात सोयीसुविधा वाढतील, पण खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुमच्या नात्यात अधिक गोडवा आणेल.

    वृषभ – नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण कराल, त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. कोणाच्यातरी सल्ल्यावरून गुंतवणुकीचे निर्णय घेणे टाळा. राजकारण किंवा समाजकार्यात गुंतलेल्या व्यक्तींनी दक्ष राहणे आवश्यक आहे. बदलत्या वातावरणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

    मिथुन – आर्थिक परिस्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी एखादे प्रकरण तुमच्या बाजूने लागू शकते. प्रिय व्यक्तीला आर्थिक मदतही करू शकता. आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.

    कर्क – कामात सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि कामे लवकर पूर्ण होतील. आर्थिक बाबींमध्ये घाई करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध दृढ होतील. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

    सिंह – वेळेचा सदुपयोग करणे महत्त्वाचे ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासाठी छोटेसे सरप्राइज नात्यात नवीन गोडवा आणेल. इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करणे टाळा. माणसाची ओळख करायला शिका, ओळखीच्या व्यक्तीकडून फसवणुकीची शक्यता आहे.

    कन्या – दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. पाहुण्यांच्या आगमनाने घरात एक सुखद वातावरण निर्माण होईल. व्यवसायात चढ-उतार असूनही, तुमचा आत्मविश्वास दृढ राहील. नशिबाची साथ मिळेल त्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर झाल्याने आनंदी वातावरण निर्माण होईल.

    तुळ – कामाच्या दबावामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. स्वतःचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. कोणाशीही वैयक्तिक बाबी शेअर करणे टाळा. मालमत्तेशी संबंधित कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. छोटे छोटे आनंद तुम्हाला शांती देतील. संततीच्या वागणुकीबद्दलची चिंता कायम राहू शकते.

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि प्रवासाचीही शक्यता आहे. वेळ आणि पैसा यांचा सुज्ञपणे वापर करणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला मालमत्तेसंबंधी एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल,, ज्यामुळे मनःशांती मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते.

    हेही वाचा – वाणाचा ताण

    धनु – जोडीदाराच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. एखाद्या प्रसंगी तुमच्या निर्णयक्षमतेचा कस लागेल. मात्र ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. मिळालेल्या नवीन यशामुळे आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. विद्यार्थ्यांना एखाद्या नव्या अभ्यासक्रमामध्ये अधिक रस वाटू शकतो.

    मकर – भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि कुटुंबात एकतेची भावना टिकून राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. आळसाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. एखाद्या निर्णयामुळे कुटुंबातील काही व्यक्ती थोड्या नाराज होऊ शकतात. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

    कुंभ – उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या बोलण्याचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सखोल नियोजन नक्की करा. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. कुटुंब सदस्यांशी संवाद साधा, अनेक प्रश्न सहजपणे सुटतील.

    मीन – थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या. एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे तणाव वाढेल, पण संयम ठेवा. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. खास लोकांना भेटल्याने तुमचा दिवस खास होईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    By Team AvaantarJune 17, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 27…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026

    June 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 20
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.