Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …असाही विचार करता येतो!
    ललित

    …असाही विचार करता येतो!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 9, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सकारात्मक आणि नकारात्मक विचार, सकारात्मक विचार, वाटसरूला बाइकवर लिफ्ट, बाइकवर पाकिटमारी, गाववाल्यांचा कनवाळूपणा, दयाळू गाववाला, बाइकवाल्यांकडून चालणाऱ्यांना लिफ्ट
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुरेखा मोंडकर

    माझ्या गावात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. बहुतेकांकडे सायकल किंवा दुचाकी असते. काही जण चारचाकी पण बाळगून आहेत. एकमेकांचं वाहन वापरणं तर इथे सर्रास होतं. हे औद्योगिक क्षेत्र आहे. काही कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था केलेली आहे. तरीही, असे बरेच आहेत की, चालण्याखेरीज दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे! अशा चालत जाणाऱ्यांना कनवाळू दुचाकीवाले विनंती केल्यास ‘लिफ्ट’ देतात. कधी कधी एका दुचाकीवर तीन किंवा चार माणसं का असतात, त्याचं कारण मला या खेड्यात राहायला आल्यावर कळलं… त्यामागील अपरिहार्यता अगतिकता पण कळली.

    माझे परिचित गाववाले खूप अबोल आहेत. पण आपण स्वतःहून बोललो तर ते खुलतात. नम्रपणे म‌दु स्वरात गप्पा मारतात. हे गाववाले एकदा त्यांची शिफ्ट संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून घरी चालले होते. वाटेत एकाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. प्रत्येकालाच अडचणी माहिती असतात, त्यामुळे इथे साधारणपणे कोणी नकार देत नाहीत. गाववाल्याने रस्त्यावरील त्या अपरिचित माणसाला दुचाकीवर मागे बसवून घेतलं.

    हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    अनाहूत वाटसरू एका जागी म्हणाला, “इथे थांबा… मी इथे उतरतो.”

    तिथे जवळपास गाव नव्हतं, वस्ती नव्हती… सगळीकडे शेतंच होती! असल्या निर्मनुष्य ठिकाणी उतरुन हा जाणार तरी कुठे? हा विचार आलाच त्या गाववाल्याच्या मनात!! पण ते म्हणाले, “उतरायचंय तर उतर बाबा!”

    तो ‘बाबा’ उतरला. घरी गेल्यावर गाववाल्याच्या लक्षात आलं, त्यांच्या पाठीमागच्या खिशातलं पैशाचं पाकीट मारलं आहे.

    मी ऐकून चकीतच झाले!

    मला अगदी हळहळ वाटली. “आई गं… बापरे… अरेरे… कुणाला मदत करायचे दिवसच राहिलेले नाहीत…” अशा नेहमीच्या चार प्रतिक्रिया देऊन मी विचारलं, “मग आता काय करता तुम्ही?”

    माझ्या शहरी विचारसरणीप्रमाणे मला वाटलं होतं, ते म्हणतील… “तेव्हापासून कानाला खडा. कुणाला लिफ्ट देत नाही!” अन् मला असा निर्णय घेणं योग्य पण वाटत होतं.

    मी अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं.

    हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    शांतपणे नेहमीच्या मृदू स्वरात ते गाववाले म्हणाले, “तेव्हापासून मी पाकीट पुढच्या खिशात ठेवतो. वाहनच नाही तर कसा जाणार माणूस? किती तंगडतोड करणार!”

    मी थक्क!

    असा हा दुसरा win win विचार सहसा मनात येतच नाही. बहुतेक वेळा एकतर्फी निर्णय घेतला जातो आणि आपण म्हणतो… ‘बरोबर आहे, अनुभवाने माणूस बदलतो!’


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वाणाचा ताण

    June 9, 2026 ललित

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026 ललित

    आईचं वाण…

    June 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    वाणाचा ताण

    By दिलीप कजगांवकरJune 9, 2026

    अधिक मासानिमित्त घसघशीत वाण मिळण्याची शक्यता असलेल्या असंख्य भाग्यवान जावईबापूंची मनस्वी क्षमा मागून…

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    आईचं वाण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026

    Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला

    June 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 323
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 448
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 689
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026
    Most Popular

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.