Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 07 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 07 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 7, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 फेब्रुवारी 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 18 माघ शके 1947; तिथि : षष्ठी 26:53; नक्षत्र : चित्रा 26:27
    • योग : शूल 23:39; करण : गरज 14:01
    • सूर्य : मकर; चंद्र : कन्या 13:20; सूर्योदय : 07:11; सूर्यास्त : 18:33
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात, सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात येऊ शकतात.

    वृषभ – तुमच्या राशीचा अधिपती शुक्र हा महत्वाकांक्षी आहे. शुक्र सांसारिक सुखांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आज आवश्यक गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात वेळ घालवाल. अर्थात, या काळात  कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी वाद घालणे टाळा. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. योग किंवा ध्यानधारणा उपयुक्त ठरेल.

    मिथुन – आज अनेक कामांमध्ये तुम्हाला शुभ परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला आदर, सन्मान मिळेल, तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. या काळात, तुमच्या व्यावसायिक भागीदारांकडून पाठिंबा मिळेल. यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जोडीदाराकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे कर्ज कमी होईल.

    कर्क – दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळतील. नवीन नातेसंबंध दीर्घकाळ टिकतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही लक्षणीय यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ समारंभात सहभागी होऊ शकता. मात्र दिवसभरातील मानसिक ताण तुमच्या कामात अडथळा आणणार नाही, याची काळजी घ्या.

    सिंह – तुमच्या जवळच्या लोकांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस संमिश्र जाईल. व्यवसायात किंवा ऑफिसमध्ये सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. टीमवर्क तुम्हाला कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यास मदत करेल.

    कन्या – आज जवळच्या मित्रांसोबत अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून, तुमच्या सभोवताली आनंददायी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अचानक होणारे बदल तुमच्यावर परिणाम करू शकतात. मात्र महिला सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

    हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!

    तुळ – आजचा दिवस सामाजिक संवादाचा असेल. तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटू शकता. एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी, त्याच्या सर्व पैलूंचा काळजीपूर्वक विचार करा. आज कुटुंबाशी संबंधित जुने काम हातावेगळे करण्याची संधी मिळेल.

    वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज आनंदाचा दिवस असेल. व्यवसायात यश तुमची वाट पाहात आहे. एखाद्याचा सल्ला तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यास मदत करेल. तुम्ही तुमचे काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडू शकाल. महिलावर्गाला जुन्या मैत्रिणी भेटतील. त्यांच्यासोबत वेळ घालवतील.

    धनु – आधीच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल, तुमच्या सूचनांचा विचार केला जाईल. तुम्हाला काही आवश्यक घरगुती वस्तू अचानकपणे खरेदी कराव्या लागू शकतात, ज्यामुळे खिशावर भार येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

    मकर – मकर राशीच्या जातकांना अचानक प्रवासाला जावे लागू शकते. घरच्या घरी एखादा लहानसा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तुमच्या एखाद्या भावंडाच्या लग्नाला उपस्थित राहू शकता. एखाद्या जुन्या मित्राची किंवा नातेवाईकाची भेट होण्याची शक्यता आहे. जर कोणी कर्ज म्हणून तुमच्याकडे पैसे मागितले तर ते देऊ नका.

    कुंभ – तुम्हाला राजकीय क्षेत्रात यश मिळेल. यामुळे राजकारणात सक्रियपणे सहभागी होण्याची शक्यता निर्माण होते. आज प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल आणि त्यांना मागे टाकाल. शुभकार्यासाठी झालेला खर्च तुमची प्रतिष्ठा वाढवेल. या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

    मीन – कुटुंबातील सदस्यांबाबत असलेल्या वर्चस्ववादी दृष्टिकोनामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. अतिशय हुशारीने तुम्ही कठीण समस्यांवर उपाय शोधू शकाल. संततीच्या संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते.


    दिनविशेष

    विख्यात इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकिन्स

    टीम अवांतर

    विख्यात कादंबरीकार चार्ल्स डिकिन्स यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1812 रोजी लँडपोर्ट (आता पोर्टस्मथचा एक भाग) येथे झाला. गरीबीमुळे शालेय शिक्षण अपूर्ण राहिले आणि लंडनमधील एका वेअरहाऊसमध्ये त्यांना  नोकरी करावी लागली. नंतर त्यांनी ‘बॉझ’ या  टोपण नावाने व्यक्तिचित्रणपर वृत्तपत्रीय लेख लिहिले. 1839 मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘स्केचिस’ बाय बॉझ हे प्रसिद्ध झाले.

    हेही वाचा – लग्नाची बोलणी अन् बापूचा रुसवा

    द पिकविक पेपर्स या पहिल्याच विनोदी लेखमालेच्या झालेल्या कादंबरीमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील ऑलिव्हर टि्वस्ट, निकोलस निकलबी, द ओल्ड क्यूरिऑसिटी शॉप, बार्नबी रज्, डॉथी अँड सन, डेव्हिड कॉपरफील्ड, ब्लीक हाउस, हार्ड टाइम्स, लिट्ल डॉरिट, ए टेल ऑफ टू सिटीज, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स, अवर म्यूच्युअल फ्रेंड आणि अपूर्ण राहिलेली द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड विशेष उल्लेखनीय होत.

    तत्कालीन समाजातील घडामोडी तसेच राजकारण, अर्थकारण, शिक्षणसंस्था, न्यायदानाची अधिष्ठाने, वैद्यकव्यवसाय ह्या सर्वांतील यांत्रिकता, मानवतेचा अभाव आणि स्वार्थीपणा ह्यांचे अतिशय परिणामकारक चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसते. या व्यतिरिक्त नाटके, लघुकथा, प्रवासवर्णन वगैरे लेखनही त्यांनी केले. इंग्रजी कादंबरीवाङ्‌मयात डिकिन्स हे एक अत्यंत महत्त्वाचे कादंबरीकार मानले जातात. गॅड्स हिल येथे 9 जून 1870 रोजी  त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    By Team AvaantarJune 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 04…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 732
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.