दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 मे 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 15 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्थी अहोरात्र; नक्षत्र : ज्येष्ठा 12:54
- योग : शिव 24:15; करण : बव 18:37;
- सूर्य : मेष; चंद्र : वृश्चिक 12:54; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:01;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 10:19
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समाजसेविका साधना आमटे
टीम अवांतर
थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या गृहिणी, सखी, सचिव बनून आयुष्यभर सावलीसारख्या राहिलेल्या साधना आमटे यांचा जन्म 5 मे 1927 रोजी नागपूरच्या घुले परिवारात झाला. माहेरी इंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साधनाताईंचा विवाह मुरलीधर ऊर्फ बाबा आमटे यांच्याशी 1946 साली झाला आणि नावाप्रमाणेच त्यांची कठोर साधना सुरू झाली. बाबांची कल्पकता, जिद्द आणि कर्तृत्व याला जोड मिळाली, ती ताईंच्या सहृदयतेची.
बाबा आमटे यांनी अनेक प्रकल्प साकार केले. श्रमिक विद्यापीठ, युवाशक्तीच्या श्रमछावण्या, बालतरूची पालखी तसेच धरणे, पर्यावरण अशा अनेक लढ्यांमध्ये साधनाताईंनी समरसून बाबांना साथ दिली. बाबाही त्यांना घरकामात मदत करत असत. माहेरी श्रीमंतीत वाढलेल्या साधनाताईंनी विवाहानंतर चाकोरीपलीकडचे जीवन आत्मसात केले. नऊवारी रेशमी वस्त्रापासून ते खादीच्या जाड्या-भरड्या सहावारीपर्यंत साधनाताईनी जो प्रवास केला, त्यामुळे त्यांच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले.
बाबा आमटे यांचे जीवन म्हणजे एक अखंड झंझावात होता. 80 च्या दशकात सायकल अभियानांतर्गत भारत जोडो आणि पेटलेला पंजाब शांत करण्यासाठी बाबांचा सातत्याने प्रवास सुरू होता. त्या काळात संस्थेच्या सगळ्या प्रकल्पांची जबाबदारी साधनाताईंनी समर्थपणे सांभाळली. 1990 साली बाबा नर्मदा आंदोलनात सहभागी झाले. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता, प्रसिद्धीपराङ्मुख राहून निष्काम वृत्तीने साधनाताईंनी बाबांना खंबीर साथ दिली. बाबांसोबतच्या जीवनप्रवासाची कथा आपल्या ‘समिधा’ या आत्मचरित्रात त्यांनी सांगितली आहे.
हेही वाचा – ‘माई’मुळे जुळले मेरठच्या पायलशी स्नेहबंध
साधनाताईंना चतुरंग प्रतिष्ठानच्या 2007 सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास ही त्यांची मुले त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असून आता आमटे परिवाराची तिसरी पिढीही त्यात मोलाची भर घालत आहे. 9 जुलै 2011 रोजी आनंदवन येथे साधनाताई आमटे यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. काम लवकर पूर्ण करण्याचा विचार असेल, मात्र त्यासाठी केलेल्या घाईमुळे चुका होऊ शकतात, काळजी घ्या. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, त्याचवेळी अनपेक्षित खर्चही उद्भवू शकतात. कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शांत राहणे उत्तम.
वृषभ – कामातील मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल, एका मोठ्या प्रकल्पात यश मिळू शकते. व्यवसायातही चांगल्या नफ्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. गुंतवणूक किंवा बचतीच्या बाबतीत काही ठाम निर्णय घेतला जाऊ शकतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. नातेसंबंध अधिक घट्ट आणि स्थिर होतील.
मिथुन – आजचा दिवस नवीन संधी आणि सर्जनशीलतेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल आणि एखादा नवीन प्रकल्प मिळू शकेल. संवाद आणि नेटवर्किंगच्या कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी दबाव वाढू शकतो, मात्र संयमाने तुम्ही परिस्थिती हाताळाल. सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. आर्थिक व्यय, विशेषतः घर आणि कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. कौटुंबिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल. अतिविचार करणे टाळा. आरोग्यासाठी मानसिक शांती आवश्यक आहे; ध्यान आणि योगाभ्यास फायदेशीर ठरेल.
सिंह – तुमची नेतृत्व कौशल्ये कामाच्या ठिकाणी लोकांना प्रभावित करतील. अपेक्षित पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सामाजिक दर्जा वाढेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल.
कन्या – कामाच्या ठिकाणी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील, ज्यामुळे व्यग्र आणि थोडे तणावग्रस्त असू शकता. अर्थात , कठोर परिश्रमांमुळे निश्चितपणे यश मिळेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबत थोडा दुरावा जाणवू शकतो, त्यामुळे संवाद कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.
तुळ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. प्रेम जीवनात, नातेसंबंध अधिक गोड होतील. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. आरोग्य चांगले असेल. मनःशांती टिकून राहील.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु ती समजूतदारपणाने आणि संयमाने हाताळाल. आर्थिक जोखीम टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात भावनिक चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. उत्तम आरोग्यासाठी तणाव कमी करणे आवश्यक असेल.
हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!
धनु – करिअर आणि शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करत असाल, तर त्यात अपेक्षित प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक भावना टिकून राहतील आणि नात्यांमधील विश्वास वाढेल. आरोग्य सामान्य राहील.
मकर – कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पणाचे कौतुक केले जाईल तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील, घरात शांतता नांदेल. जोडीदारासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे असेल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि संतुलित दिनचर्या आवश्यक आहे.
कुंभ – कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. काही नवीन ओळखी होतील, जी भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कौटुंबिक जीवन अधिक समृद्ध होईल. मानसिकदृष्ट्या, तुम्हाला शांत आणि संतुलित वाटेल.
मीन – आजचा दिवस आध्यात्मिक ऊर्जा आणि आत्मपरीक्षणाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी प्रगती हळूहळू होईल. मात्र तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. नात्यांमधील भावनिक बंध वाढतील. कौटुंबिक जीवन अधिक घट्ट होईल. योग, ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.


