Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् कुटुंबप्रेमाला आसुसलेल्या बबलीची कळी खुलली!
    मैत्रीण

    …अन् कुटुंबप्रेमाला आसुसलेल्या बबलीची कळी खुलली!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 3, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, कुटुंब, कुटुंबाची ओढ, परिवाराची ओढ, कुटुंबाचा कोष,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…

    कुटुंब म्हणजे काय? कुटुंबाचं महत्त्व हे त्यांनाच कळतं, ज्यांना कुटुंब नाही. तर आजची कथा माझ्या मित्र आणि मैत्रिणीची आहे. मला एक प्रोजेक्ट मिळाला होता… प्रायोगिक प्रोजेक्ट होता. खूप छान वेगळाच असा सेट बनवला होता आणि त्या सेटवर आम्हा कलाकारांचे फोटो शूट करण्यात येत होतं. अर्थात, या प्रोजेक्टचे पैसे मिळणार नव्हते, पण वेगळं काहीतरी, म्हणून ते काम घेतलं. तीन-चार दिवस रिहर्सल केली आणि मग फायनल शूट. छान चाललं होतं…

    माझ्यापेक्षा चार-सहा वर्षांनी लहान अशी मुलं-मुली त्या प्रोजेक्टसाठी काम करत होते. आमची छान दोस्ती झाली. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्ही regular भेटून वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला जाऊन फोटो, बायो डेटा वाटणे सुरू केलं… काम मिळावं या अपेक्षेने! एकत्र राहून दोस्ती वाढत गेली. तिथेच आमच्या बेबी आणि बाळू (नाव बदलली आहेत) यांचं सूत जुळलं. त्याचं ते नवीन प्रेम, त्यातली नवलाई आमच्यासमोर घडत,  उलगडत गेली. त्यांच्या प्रेमाची साक्षीदारच म्हणा ना!

    तिच्या घरी हे प्रेमप्रकरण पसंत नव्हतं. त्याच्याकडे तसं काम नव्हतं. अधून मधून सीरियलमध्ये मिळणारे साइड रोल्स, कधीतरी मिळणारं नाटक… त्याने घर कसं चालणार? मग काय, दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. त्याच्या घरी तिचं ग्रँड welcome झालं. तसं ते घर सधन होतं. 2 BHK चा फ्लॅट… घरात आई, बाबा आणि बाळू. ताईचं लग्न आधीच झालेलं… लेकुरवाळी होती ती! बऱ्यापैकी प्रॉपर्टी होती.

    काही काळ लोटला… आता बेबी आई होणार होती. घरभर नुसता आनंद नाचत होता. बेबीला मुलगी झाली. तिचं नाव ‘बबली’ ठेवलं. सासू-सासरे तर खुळावले. बेबी आणि बबलीला कुठे ठेऊ आणि कुठे नको, असं झालं होत त्यांना. पण बेबीच्या माहेरी कोणालाच कौतुक नव्हतं. एक दिवस शेक घेताना बेबीच्या गाऊनने पेट घेतला. बेबी भाजली, पण जीवावरच संकट टळलं. बेबीची ट्रीटमेंट सुरू झाली. ती खूप शॉकमध्ये होती. भीतीने ती एवढी हादरली होती की, बऱ्याच गोष्टी विसरायला लागली होती.

    हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!

    बेबीच्या घरापर्यंत ही बातमी गेली. तिचे आईबाबा येऊन तिला आणि बबलीला सरळ स्वतःच्या घरी घेऊन गेले. बेबीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांनी बाळू आणि त्याच्या आईबाबांवर हुंड्याच्या छळाची केस दाखल केली. बेबीला काहीच कळत नव्हतं. ती स्वतःच्या कोषात हरवली होती. आता बेबीच्या सह्या घेऊन divorce file केला. टेन्शन खूप वाढत गेलं आणि रात्री झोपलेला बाळू पुन्हा कधीच उठला नाही…

    बेबीच्या घरच्यांनी बाळूच्या मृत्यूची बातमी बेबीला सांगितली सुद्धा नाही. त्यामुळे तिला तिच्या बाळूचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. कालांतराने बाळूचे आईबाबा पण देवाघरी गेले. सगळी मालमत्ता त्यांनी मुलीच्या नावे केली. बबलीला आपला बाबा म्हणजे कोण, कसा? काहीच माहीत नाही. कालांतराने तिचे हे आजी-आजोबा सुद्धा देवाघरी गेले. मामा-मामी मात्र खूप भले निघाले. स्वतःच्या मुलांपेक्षा बबलीवर त्यांचा जास्त जीव! पण शेवटी तिचंही बालमनच, तिलाही बाबा पाहिजेत, असं वाटायला लागलं. बेबीने समजावलं… बाबा नसले तरी मामा-मामी किती प्रेम करतात… जीव लावतात… लाड करतात! पण फॅमिली, कुटुंब हे शब्द कानावर पडले आणि आता तिला तिची फॅमिली हवी झाली. बेबी आणि बबली एवढीच फॅमिली होती तिची. बबली आता हळूहळू अबोल व्हायला लागली.

    हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!

    तशातच बेबीची आणि माझी भेट झाली. बेबीने मला बबलीबद्दल सांगितले. मी बबलीचा नंबर घेतला. दुसऱ्याच दिवशी तिला कॉल केला. म्हटलं, “बबली मी बोलतेय. तुझी हर्षा आत्या…” खूप बोललो आम्ही. छान गप्पा झाल्या. तिच्या बाबाच्या, त्या आजी-आजोबांच्या आठवणी काढल्या. दुर्देवाने, त्या कोणाचेही फोटो माझ्याकडे नव्हते. थोड्या वेळाने बेबीचा फोन आला. बबली खूप खूश आहे. कारण, तिला तिची फॅमिली आहे… मला मात्र खूप रडायला येत होतं. आता लिहिताना सुद्धा डोळे भरून आलेत. माझ्या एका फोनमुळे छोटी बबली खुलली होती, फुलली होती!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026 मैत्रीण

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026 मैत्रीण

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    मेहनत करने वालों की…

    By हर्षा गुप्तेJune 22, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आजचा विषय प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचा… आपली…

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.