दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 01 नोव्हेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 10 कार्तिक शके 1947; तिथि : दशमी 09.11; नक्षत्र : शततारका 18:19
- योग : ध्रुव 26:08; करण : वणिज 20:27
- सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:06
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
प्रबोधिनी स्मार्त एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी आदर, प्रगती मिळेल. शिवाय, नफा कमावण्याच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. संततीशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
वृषभ – आजचा दिवस अतिशय व्यग्र आणि धावपळीचा राहील. कामाच्या संदर्भात काही अडचणी येऊ शकतात. मात्र हुशारीने आणि कौशल्यामुळे तुम्ही त्या सहजपणे सोडवू शकाल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. काही अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने योजना पुन्हा रुळावर येऊ शकतात. आज कौटुंबिक जीवन चांगले राहील.
मिथुन – आर्थिक लाभ मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल असेल. नोकरीव्यतिरिक्त इतर स्रोतांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकेल. दुसरीकडे, तुमचे विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. मात्र त्या तात्पुरत्या असतील.
कर्क – आजचा दिवस चांगला जाईल. दिवसभर आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीत मोठा वाटा मिळू शकेल. कायदेशीर वादात अडकलेल्यांचे प्रश्न आज सुटतील. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा एखाद्या नवीन वादात अडकू शकता. जोडीदाराकडून एखाद्या कामासाठी पूर्ण पाठिंबा मिळेल.
सिंह – आजचा दिवस खूप फायदेशीर असेल. व्यावसायिकांसाठी तर दिवस खूपच लाभदायक ठरेल. नशिबाची साथ मिळाल्यास, काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील, मात्र खर्चही वाढू शकतात. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी
कन्या – आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे थोडेसे नैराश्य आणि अस्वस्थपणा जाणवेल. काही कार्यालयीन कामे अपूर्ण राहू शकतात. आज वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. कोणाच्याही सल्ल्याला बळी पडू नका, कारण त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
तुळ – दिवस खूप फायदेशीर आणि शुभ राहील. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. काही कायदेशीर बाबींचा आज गांभीर्याने विचार करावा लागेल. पालकांची सेवा करण्याची संधी देखील मिळेल. मात्र आरोग्याच्या काही किरकोळ कुरबुरी सुरू होऊ शकतात.
वृश्चिक – दिवस खूप अनुकूल असेल. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबातील सदस्याशी असलेले लहानमोठे मतभेद संपतील. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. नोकरदार जातकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
धनु – आज करिअर किंवा व्यवसायासाठी घेतलेला कोणताही निर्णय फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार जातकांना पदोन्नती मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे, मात्र कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. कौटुंबिक आयुष्यातही काही चढ-उतार येतील, ज्याचा मानसिक त्रास होऊ शकतो, परंतु संयम आणि शांतताने काम करावे लागेल.
मकर – दिवस यशाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम, आनंद आणि पाठिंबा मिळेल. काम आणि करिअरसाठी दिवस चांगला असेल. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यापैकी एकजण आर्थिक मदत करू शकेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना एखाद्या महत्त्वाच्या पदाने किंवा पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते.
कुंभ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य आणि पाठिंबा मिळेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. दिवसभर धावपळीचे काम राहील. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधावा लागेल. असे न केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, धार्मिक कार्यात व्यग्र राहाल.
हेही वाचा – अलंकारीत स्त्रीची मूर्ती पाहून शौनक दचकलाच…
मीन – मनाजोगते उत्पन्न असेल, पण खर्चही वाढतील. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होताना दिसून येईल. नवीन एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. ज्यांनी पूर्वी एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे, त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. शत्रूंपासून सावध राहा, अन्यथा त्यांच्यामुळे कायदेशीर अडचणी वाढू शकतात.
दिनविशेष
ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव
टीम अवांतर
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. वडिलांच्या रूपात त्यांना घरीच गुरु लाभला. त्यांचे वडील विविध प्रकारची वाद्ये वाजवित असत. मात्र, त्यातही तबल्यावर त्यांचे थोडे जास्तच प्रेम होते. तालाचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले. जी. एन. जोशी आणि गजानन वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. अनेक नाटके आणि चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे विडंबन, बालकविता आणि विनोदी काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी आपले गुरु मानले. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतार वादक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. जीवनात ही घडी, कोटि कोटि रुप तुझे, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरूनी अशी एकाहून एक सरस गाणी देव यांनी रचली. बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी अशा जवळपास 35 ते 40 मराठी नाटकांना देखील देवांनी स्वरसाज चढवला. याशिवाय, ग.दि. माडगूळकरांच्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीतबद्ध केले. सचिन शंकर यांच्या बॅले ग्रुपने या नृत्यनाटिकेचे सादरीकरण केले होते. “जर कविता चांगली असेल तर, त्यात चाल असतेच. मी फक्त ती शोधून काढतो!” हे यशवंत देवांचे वाक्य खूप गाजले होते. यामुळेच नंतरच्या काळात ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ अशी त्यांची ओळख झाली. पु ल देशपांडे यांच्या सांगण्यावरून चित्रपट निर्मात्यांनी यशवंत देव यांना चित्रपटासाठी गीतलेखन करायचं काम दिलं. त्यानुसार देवांनी अनेक चित्रपट गीतं लिहिली. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला. 30 ऑक्टोबर 2018 रोजी यशवंत देव यांचे निधन झाले.


