डॉ. सारिका जोगळेकर
होमिओपॅथिक तज्ज्ञ
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षम ठेवण्यासाठी थायरॉईड ग्रंथीची मुख्य भूमिका असते. थायरॉईड – आपल्या शरीराचा ‘मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर’ (metabolism control centre / metabolism- अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया) असते.
आपल्या गळ्याच्या मधे असलेली एक छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. आकाराने छोटी फुलपाखरासारखी असते; पण तिचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन (T4) आणि ट्राय आयोडोथायरोनिन (T3) हे हार्मोन्स तयार करते, जे आपल्या शरीरातील ऊर्जानिर्मिती, वाढ, वजन, तापमान आणि मानसिक स्थिती नियंत्रित ठेवतात.
थायरॉईड ग्रंथी आपल्या मेंदूतल्या pituitary ग्रंथीच्या नियंत्रणाखाली काम करते. TSH (thyroid stimulating hormone) हे हार्मोन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. TSH जास्त असल्यास थायरॉईड कमी कार्य करते (hypothyroidism) आणि TSH कमी असल्यास थायरॉईड जास्त कार्य करते (hyperthyroidism).
Hypothyroidism – यामध्ये थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते.
मुख्य लक्षणे :
- सतत थकवा आणि झोप येणे
- वजन वाढणे (जरी खाणे कमी असेल तरी).
- त्वचा कोरडी होणे.
- केस गळणे.
- थंडी सहन न होणे. (temperature regulation मध्ये बिघाड होतो)
- बद्धकोष्ठता
- महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित किंवा पाळी संबंधित इतर तक्रारी
- उदासीनता
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
हेही वाचा – Homeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी
Hyperthyroidism – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते.
मुख्य लक्षणे :
- वजन कमी होणे. (जरी खाणे वाढले तरी).
- हृदयाचे ठोके वाढणे (palpitation).
- घाम जास्त येणे.
- चिडचिड, अस्वस्थता, झोप न लागणे.
- हाताला कंप सुटणे. (tremors)
- डोळे सुजलेले दिसणे. (Graves Disease मध्ये)
थायरॉईडचे आजार का होतात?
खालील काही कारणांमुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊन हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड होऊ शकतो.
- Autoimmune (शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते)
- आयोडिनची कमतरता
- अनुवांशिकता
- मानसिक ताणतणाव (stress)
- हार्मोन्समध्ये होणारा बदल (महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होतो. त्यामुळे थायरॉईडचे विकार स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात.)
- काही औषधांचा दुष्परिणाम
- बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे इन्फेक्शन
लक्षणे आढळले की, रक्तातील T3, T4,TSH चाचणी द्वारे थायरॉईडचे निदान केले जाते.
हेही वाचा – स्त्रीआरोग्य : मासिक पाळीपासून मानसिक शांततेपर्यंत होमिओपॅथी
होमिओपॅथी आणि थायरॉईड – नैसर्गिक संतुलनाचा मार्ग
थायरॉईड विकार म्हणजे शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनात आलेली बिघाड. आधुनिक औषधोपचार हे हार्मोन्स बाहेरून देऊन नियंत्रण ठेवतात, पण होमिओपॅथी शरीराच्या अंतर्गत संतुलनावर काम करते.
होमिओपॅथीची कार्यपद्धती
- मूळ कारणावर उपचार : होमिओपॅथी फक्त लक्षणांवर नाही तर त्या मागे असलेल्या भावनिक, मानसिक, आणि शारीरिक कारणांवर लक्ष देते. उदाहरणार्थ, दीर्घकाळचा ताण, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव किंवा दडपलेली भावना ही अनेकदा थायरॉईड बिघडाची कारणं असतात.
- शरीराच्या नैसर्गिक प्रतिसादशक्तीला चालना देते : योग्य औषध दिल्यावर शरीराची नैसर्गिक हार्मोन निर्मिती प्रणाली हळूहळू पुन्हा कार्यरत होते. म्हणजेच, औषध शरीराला “काय करावे” हे शिकवते, बाहेरून हार्मोन देत नाही.
- दीर्घकालीन परिणाम : थायरॉईडसारख्या क्रॉनिक विकारांमध्ये होमिओपॅथी दीर्घकाळाने, पण स्थिर आणि दुष्परिणामरहित परिणाम देते.
- मन आणि शरीराचा समतोल : थायरॉईडवर भावनिक स्थितीचा मोठा प्रभाव असतो. होमिओपॅथी मन:शांती आणि भावनिक स्थैर्य वाढवते, ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात.
औषधांसोबत जीवनशैलीतले बदल जोडले गेले की, थायरॉईड ग्रंथीवर वेगाने सुधारणा दिसून येते.
आहारातील सुधारणा आणि पथ्ये
- आयोडिनयुक्त मीठ वापरा.
- सेलेनियमयुक्त पदार्थ खा (कांदा, लसूण, सूर्यफुलाच्या बिया, ब्राझील नट)
- झिंक आणि लोहयुक्त पदार्थ (हिरव्या पालेभाज्या, डाळिंब)
- गोयट्रोजनिक पदार्थ टाळा (कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली)
- नियमित व्यायाम – दररोज 30 मिनिटे चालणे आणि सोबत प्राणायाम किंवा इतर योगासने.
- ताण नियंत्रणात ठेवणे नियमित थायरॉईडची तपासणी करणे.
“होमिओपॅथी, योग्य आहार आणि सकारात्मक विचार – हेच थायरॉईड नियंत्रणाचे तीन आधारस्तंभ!”
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941


