Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्त्रीआरोग्य : मासिक पाळीपासून मानसिक शांततेपर्यंत होमिओपॅथी
    आरोग्य

    स्त्रीआरोग्य : मासिक पाळीपासून मानसिक शांततेपर्यंत होमिओपॅथी

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, Homeopathy, होमिओपॅथी, Menstruation, Menarche, रजोनिवृत्ती, Menopause, Irregular Periods, मासिक पाळी, अनियमित पाळी, हार्मोन्स, Hormones
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. सारिका जोगळेकर

    होमिओपॅथिक तज्ज्ञ

    मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भधारणेसाठी दर महिन्याला एक नवीन थर तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर रक्तासह शरीराबाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दर 28 दिवसांनी (कधी 21 ते 35 दिवसांत) नियमितपणे घडते. यालाच मासिक पाळी किंवा मासिक ऋतू म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे वयाच्या 12-13 वर्षांपासून सुरू होते (Menarche) आणि 45-50 वर्षांपर्यंत (रजोनिवृत्ती येईपर्यंत – Menopause) चालते.

    मासिक पाळीची सायकल ही हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन मुख्य हार्मोन्स मासिक पाळी नियमित ठेवण्याचे काम करते. प्रत्येक महिन्यात होणारा हा शारीरिक बदल नैसर्गिक असला तरीही बऱ्याच स्त्रियांना त्या काळात विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. या तक्रारी किरकोळ समजून दुर्लक्ष केले जाते आणि जेव्हा या तक्रारीमुळे आपल्या कामावर किंवा दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो, तेव्हा त्यावर उपचार घेण्याची गरज स्त्रीला भासते.

    सामान्य तक्रारी

    1. पोटदुखी (Dysmenorrhea) – पाळीपूर्वी किंवा पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे.
    2. डोकेदुखी, थकवा आणि अंगदुखी – रक्तस्त्रावामुळे कमजोरी आणि थकवा जाणवतो. पायात गोळे येतात.
    3. मूड स्विंग (PMS – Premenstrual Syndrome) – चिडचिड, नैराश्य, राग किंवा भावनिक अस्थिरता, एकटेपणा, रडायला येणे, चविष्ट खाण्याची तीव्र इच्छा होते (craving). रात्रीची झोप न लागणे किंवा दिवसासुद्धा जास्त प्रमाणात झोप येणे, खूप भूक किंवा खायची इच्छा नसणे.
    4. अनियमित पाळी (Irregular Periods) – वेळेवर पाळी न येणे किंवा खूप जास्त/कमी रक्तस्राव होणे.
    5. जास्त रक्तस्राव (Menorrhagia) – दीर्घकाळ किंवा अतिप्रमाणात होणारा रक्तस्राव.
    6. जास्ती रक्तस्रावासोबत पोटात खूप दुखणे. (metorrhagia)
    7. मळमळ, उलटी, जुलाब – काही स्त्रियांना पाळीच्या काळात पचनासंबंधी तक्रारी जाणवतात.

    हेही वाचा – Homeopathy : शरीर आणि मन जुळले, तरच आरोग्य फुलले…

    मासिक पाळीच्या तक्रारी का होतात?

    • गर्भाशय आणि हार्मोन्स संबंधित कारणे : हार्मोन्सचे असंतुलन, हायपोथायरॉइड (थायरॉइड नावाची एक ग्रंथी असते त्याचे हार्मोन्स वाढतात). गर्भाशयाला सूज येणे (endometriosis), पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम – PCOD, फायब्रॉइड (गर्भाशयामध्ये गाठी निर्माण होतात).
    • पोषणातील कमतरता : रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजेच लोह कमी असणे (anemia). कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D B12, फॉलिक ऍसिड, इत्यादीची कमतरता.
    • मानसिक कारणे : मानसिक ताण तणाव, चिंता, नैराश्य, भीती यापैकी कुठल्याही कारणाचा थेट मासिक पाळीवरती परिणाम होतो.
    • जीवनशैलीतील बदल : जागरणे, चुकीचा आहार, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींची कमतरता.
    • अनुवंशिकता

    मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होमिओपॅथी कशी परिणामकारक ठरते?

    होमिओपॅथीचा मूलभूत दृष्टिकोन असा आहे की, शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहे. शरीर हा मनाचा आरसा आहे. मनातले विचार शरीर आपल्याला विविध लक्षणांमधून दाखवते. मासिक पाळीच्या तक्रारी एखाद्या महामारीसारख्या वाढत आहेत. गेल्या वीस वर्षांत हार्मोन्सचे असंतुलन आणि वंध्यत्वाच्या केसेसचा आलेख वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. याचे कारण काय असू शकते?

    “पूर्वी लग्न करण्याचे सामान्य वय 23 ते 25 दरम्यान असायचे. पण आता मुलींना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात स्थिर व्हायचे आहे, काहीतरी साध्य करायचे आहे, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायचे आहे आणि लग्न हा त्यांचा शेवटचा प्राधान्यक्रम झाला आहे. एका दृष्टीने बघायला गेलं तर, हे सगळं अगदी बरोबर आहे आणि खूप सकारात्मक आहे; पण कुठलीही गोष्ट अति ताणली की, ती तुटते. महत्त्वाकांक्षेलाही एक मर्यादा असली पाहिजे. ‘स्त्रीच्या प्रजनन संस्थेची जैविक रचना बदलणार नाही.’

    हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग

    हल्ली स्त्रिया सर्रास ही वाक्य म्हणताना ऐकू येतात – “मी मुलापेक्षा कमी नाही”, “मी काहीतरी साध्य केल्याशिवाय मला लग्न नाही करायचं”, “मला सध्या तरी मूल नकोय”, “कशाचीच घाई नको…” या वाक्यातील ‘नको’ आणि ‘नाही’मुळे स्त्री-हार्मोन्समध्ये विभाजन होते आणि स्त्री-हार्मोन्सचे स्रवण मंदावते. आपल्या विचारांचा आपल्या शरीरावरती थेट परिणाम होतो. मुलीला लग्न आणि मूल नको असते आणि मग शरीराला ते नको असते. एखादी मुलगी जितकी तिच्या मासिक पाळीचा तिटकारा करते, तितकी ती मासिक पाळीच्या तक्रारीने त्रस्त होण्याची शक्यता वाढते. अप्रत्यक्षपणे ती तिच्या स्त्रीत्वाला नाकारते त्यामुळे. मुलीला तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी (menarche) पाळीला सहजपणे स्वीकारायला शिकवणे आवश्यक आहे.

    होमिओपॅथिक औषधं देताना या सर्व विचारांचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्या विचारांची सुरुवात का आणि कशी झाली, हे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळे असते. त्या स्त्रीचा स्वभाव आणि भावनांचे विभाजन, तिची जीवनशैली, अनुवंशिकता हे सगळं लक्षात घेऊन औषध दिली जातात. होमिओपॅथीमध्ये नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याची क्षमता असते. मेंटल ब्लॉक निघून गेला की, स्त्रीच्या शरीरात हार्मोन्स संतुलित प्रमाणात तयार होऊ लागतात आणि मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. होमिओपॅथी हे नैसर्गिक असून ते सूक्ष्म प्रमाणात दिले जाते, त्यामुळे त्याचे कुठलेही साइड इफेक्ट्स नाहीत… त्या औषधांमध्ये हार्मोन्स नाहीत. होमिओपॅथी हे स्त्रीसाठी एक वरदान आहे. होमिओपॅथी मासिक पाळीचे चक्र नियमित करते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत करते. दृष्टिकोन बदलला की शरीर आणि मन यांच्यातील सुसंवाद स्थिरावतो. सोबतच हार्मोन्स सुद्धा स्थिरावतात.


    HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

    ऋतू पार्क, ठाणे वेस्ट 

    मोबाइल – 9890533941

    Insta – https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

    FB – https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026 आरोग्य

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026 आरोग्य

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    July 4, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    By रविंद्र परांजपेJuly 11, 2026

    मागील दोन लेखांमधून आपण वातविकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण मधुमेह…

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    July 4, 2026

    पोळी बदलली… आणि विचारही!

    July 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 195
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 773
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.