Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!
    ललित

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीAugust 23, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, फायुस्टार हाटेल, जुम्मन चाचाची कहाणी, गावातील सौहार्द, गावातील सलोखा, उत्तर प्रदेशातील जुम्मन चाचा, शेजारी अब्दुल, शेतीची अवजरांची दुरुस्ती, जगदाळे मास्तर, चिंचवड गाव, हंबीरकाकांची जुम्मनला मदत,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    जुम्मन चाचाच्या ‘फायुस्टार हाटेला’तल्या तडे गेलेल्या भिंतीवरच्या एकुलत्या एक जुनाट लाकड़ी फळीवरच्या जीर्ण झालेल्या, धूळकट काचेच्या बरणीत ठेवलेले तेलकट चुरमुऱ्याचे लाडू काढताना ती जुनाट फळी एखाद्या शंभरी उलटलेल्या म्हातारीसारखी कुरकुरली.

    “क्या चिच्चा, अबी कित्ता परेशान करींगे ये बुढ्ढी फल्ली को? पंदरा रुपय में दूसरी बिठा को देता बोल्या मई तो सुनतेच नै तुमें? कित्ता चिंगुसपना करींगे होर?”

    दुकानासमोर, एक बाजू लिंबाच्या झाडाच्या खोडाला बांधलेल्या बाकड्यावर टेकता टेकता अब्दुल मनापासून हसला…

    “क्या करींगे रे फल्ली बदल को? मेरी बेगमकू थोडीच बिठाना उसपे? छोड़ उनो, चा पियेगा क्या?” जुम्मनचाचा स्वतःच्याच विनोदावर हासत स्टोव्हचा पंप मारायला लागले.

    “अपनी म्हतारी को बिठाव तो. खुशीसे आयंगी उनो,” अब्दुल म्हणाला तसे चाचाने डोळे वटारले.

    “अब्दुल!”

    “माफी, माफी चिच्या, गुस्ताखी माफ. मैं तो ऐसेइच मजाक कर रा चिच्या. गुस्सा मत होना…”

    “गुस्सा नही मियाँ, तुम पे क्या गुस्सा होना? बस्स दर्द होता इसलिए…”

    “काही म्हणा जुम्मनचाचा, पण या वयातही तुमचा उत्साह बघून आम्हालाच लाजायला होते.”

    बाकड्यावर आधीच ठिय्या मांडून बसलेल्या जगदाळे मास्तरांनी सफाईने विषय बदलला. हा विषय म्हाताऱ्याची दुखती रग होती. चाचाला त्रास होऊ नये म्हणून विषय बदलून मास्तर चंचीतली तंबाखू डाव्या हाताच्या तळव्यावर घेत तिला चुना लावून रगडू लागले.

    हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!

    “डबल लगाओ तो गुर्जी जरा. भोत टेम व्हा देको, तमाखू खाने को चान्सच नै मिला. चिच्चा, दो चा बनाव तो एकदम फक्कड़ दुध में का… होर क्यां चल रा चिच्या? कुच नया-जूना?”

    “कूच नै मियाँ. अपनी उंडगी जिंदगी में क्या होना रे. लेकिन सुब्बे से बायी अँख्खी भोत फडफडा रई देखो, डर लग रा कुच बुरा ना मिले सुनने को करके”

    “क्या चिच्या तुमे बी, होर क्यां बुरा होना अपनी जिंदगी में?”

    अब्दुलने हसतच जगदाळे मास्तरांच्या पुढे हात केला. डबल लावलेल्या तंबाखूतली एक चिमुट मास्तरांनी अब्दुलमियांच्या हातावर टेकवली आणि उरलेली आपल्या दाढेखाली दाबली, दोन्ही हात झटकून धोतराला पुसले. डोक्यावरची गांधी टोपी काढून झटकली आणि बाजूलाच बाकड्यावर ठेवली. तेव्हा ते थोडेसे एका बाजूला कलले आणि डाव्या पायावर जरा जोर पडला तसे विव्हळले.

    “क्यां हुवा गुर्जी, पावा में दर्द होना क्यां?” स्टोव्हवर चहाचे आधण ठेवत जुम्मन चाचाने विचारलं.

    “नाही हो, चप्पल खराब झालीय. दर दोन दिवसांनी कुठला तरी खिळा वर येतो आणि टोचतो झालं. दगड़ाने ठोकून- ठोकून चपलीचं कातडं झिजलय. परवा तुकारामच्या दुकानात चौकशी केली तर नवीन चप्पल चाळीस रुपयाला पडेल म्हणाला. महिना अखेरीस चाळीस रुपये खर्च करायचे, त्यापेक्षा म्हटलं चालवू अजून काही दिवस तशीच…”

    मास्तर स्वत:शीच कानकोंडे होत हासले. जुम्मन चाचाने दोन कान तुटके कप भरून चहा आणून दोघांना दिला. चहा पिता-पिता अब्दुलने मास्तरांच्या चपलीकडे बघितले.

    “गुर्जी, दुकान पे आव, चा पिने के बाद. वो जगन्नाथ काका की बैलगाडी के चक्के कू लगानेके लिये थोड़ा चमड़ा लाया था, वो लगाकू देता तुमेरी चप्पलकू. कुच दिन होर चलेगी बेचारी.”

    अब्दुलने दोघांच्याही चहाचे पैसे जुम्मन चाचाच्या हातावर टेकवले आणि ‘आता हूं चिच्चा शामकू, अब्बी काम का टेम है’ म्हणत उठला. बुडाखालचं बाकडं केविलवाणं करकरलं.

    “चिच्चा, अगले मयने में पारगांवका एक काम मिलेंगा शायद. जरा बड़ा काम है. वो मिला तो कुच लकड़ा बचिंगा. तब तुमेरी बुढ्ढी फल्ली होर ये बाकडेका कुच करींगे. चलो गुर्जी, तब तलक तुमेरी चप्पल को दवादारू करते है!”

    जुम्मन चाचाचा निरोप घेऊन जगदाळेमास्तर अब्दुलच्या बरोबर निघाले.

    “चिच्चा, पचास ग्राम शक्कर देना तो. होर तीन रुपेका तेल देने को बोलाय अम्मीने,” समोर उभ्या पोराने हातातली काचेची बाटली काऊंटरवर ठेवत दहा रुपयाची एक नोट चाचाच्या हातात दिली. “अम्मी बोली बाकी पैसे वापस लेको आ!”

    “होर पैलेवाली सात रुपेकी उधारी का क्यां?” चाचाने हसत विचारलं आणि पुढे स्वतःच म्हणाला, “बस, बस, पता है मेरेकू तू आगे क्या बोलेगा वू… पता हे मेरेकू तुम लोगा कहीं भगके नै जा रे करके.”

    सुट्टे पैसे त्याच्या हातात टेकवताना चाचाने बरणीतली एक गोळीही त्याच्या हातावर टेकवली आणि म्हणाले, “सकीना बेटी को एकबार मिलनेकू बोलना. वो हंबीरकाका के शेतमें कुछ कामा होने. उत्तेच थोडेशे पैशे मिल जैंगे बच्चीको!”

    “हौ जी चिच्च्या, बोलता अम्मीको,” म्हणून पोरगं गोळी चघळत घराकडे पळालं.

    तर, सांगायचं असं की जुम्मन चिच्च्याचं ‘फायुस्टार हाटेल’ ही चिंचवड्यातल्या लोकांची येता-जाता टेकायची हक्काची जागा होती. ‘फायुस्टार’ नाव असलेल्या त्या आठ-बाय दहाच्या टपरीतच चिच्या वाणसामानही ठेवायचा. सगळे कस्टम्बर असे उधारीवालेच. कित्येकांच्या उधाऱ्या तर गेल्या चार-पाच वर्षांपासून होत्या. रक्कमही केवढी मोठी. कुणाची उधारी बेचाळीस रुपये तर कुणाची चोपन्न. पैसे हातात पडले की, लोक पाच-दहा रुपये आठवणीने आणून द्यायचे आणि पुन्हा उधारीवर सामान घेवून जायचे. नशीब चिच्च्या शिकलेला नव्हता फारसा, त्यामुळे चक्रवाढ व्याज वगैरे गोष्टी ऐकिवात नव्हत्या त्याच्या.

    चिच्या इथला नव्हता खरेतर. खूप पूर्वी कधीतरी उत्तर प्रदेशातलं आपलं गाव सोडून जगायला म्हणून महाराष्ट्रात आलेला. कसा कोण जाणे, पण शहर सोडून या गावात येऊन स्थिरावला. आधी मजुरीच करायचा. पण मग त्याचा मनमिळाऊ स्वभाव, मेहनती वृत्ती पाहून सरपंच हंबीरकाकांनी त्याला ही टपरी टाकून दिली, वर भांडवल म्हणून चार पैसे दिले… त्या गोष्टीला सुद्धा आता चाळीसेक वर्षे झालेली. तरुणपणी शेजारच्या गावातली एक पोरगी बघून लग्न केलं होतं, म्हणतात त्याने. पण ती बिचारी पहिल्या बाळंतपणातच गेली, लेकरू पोटातच गेलं होतं. त्यानंतर मात्र चिच्या त्या भानगडीत पडलाच नाही. आता चिच्या सत्तरीच्या पुढे होता. गावात पाच-सहा मुस्लिम घरे होती, त्यांच्याबरोबरच राहायचा. पण तेवढाच काय तो त्याचा धर्माशी संबंध. दुकानातून लोक असेल ते सामान घेऊन जायचे, पण चाचाने कधी कुणाला पैसे नाहीत म्हणून माल द्यायचे नाकारल्याचे ऐकिवात नव्हते. गावात मंदिराबरोबर एक मशीदही होती. सुदैवाने, गावाला अजूनही दुहीचा शाप नव्हता. दुकान हा जुम्मन चिच्याचा उरलेलं आयुष्य घालवायचा एकमेव विरंगुळा होता. कदाचित…

    मुळात चिंचवड इनमीन साठ-सत्तर घराचं गाव. गावाला वळसा घालत वाहणारी एक मरतुकडी नदी सुद्धा होती. गाव तसे नदीच्या बेचक्यातच वसलेले. तिला कधी फारसे पाणी नसेच, त्यामुळे लोकांनी तिला नदी म्हणायचे मागेच सोडून दिले होते. तिचा उल्लेख सरसकट ‘येशीपल्याडचा वडा’ (ओढा) असाच केला जात असे. कधीकाळी गावात भरपूर पाऊस पडलेला तेव्हा नदीत एका ठिकाणी खोल खड्डा तयार झालेला… कसे कोण जाणे पण आतून काही झरे लागले आणि त्या खड्यात कायम पाणी राहत होते. तशात एके दिवशी शेजारच्या गावातल्या एका अभागी पोरीचं प्रेत त्या खड्यात सापडलं आणि लोक तिथे जायलाही घाबरायला लागले. नदीपात्रातला एकमेव पाण्याचा डोह ‘भुताळीचा ढव’ म्हणून बदनाम झाला.

    हेही वाचा – सलग 131 डॉट बॉल्स…

    गावातले बहुतेक लोक शेती, खरेतर शेतमजुरी करून जगणारे. गावात मालकीची जमीन असलेली मोजून नऊ-दहा घरं. त्यातही सगळ्यात जास्ती जमीन हंबीरकाकाची, बावीस एकर. आणि अजून एक-दोन डोकी दहा-बारा एकर जमीन बाळगून असलेली. बाकीचे सगळे मजूरच. एसटी थांबायची तो फाटा सुद्धा गावापासून पाच मैल लांब. गावात एकुलती एक चौथीपर्यंत असलेली शाळा. सगळा मिळून तीस-चाळीस मुलांचाही पट नसेल. त्यामुळे कुणी मास्तर इकडे यायला तयारच नसायचे. गेल्या सात-आठ वर्षापासून जगदाळे मास्तरच एकाच वर्गात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग चालवायचे. मास्तरांची बायको फार पूर्वीच वारलेली. निपुत्रिक होते बिचारे त्यामुळे इथे रमलेले.

    शेतीची अवजारं बनवणारा, दुरुस्त करणारा अब्दुल. जुम्मन चाचाच्या हॉटेलशेजारीच त्याचे राहते घर होते. तिथेच अंगणात तो गावातल्या शेतकऱ्यांची लहानसहान कामे करून गुजराण करायचा. त्याची बायको घरातल्या दारिद्रयाला कंटाळून कुणाचा तरी हात धरून पळून गेली. तेव्हापासून घरात तो आणि त्याची सदैव आजारी असणारी म्हातारी असे दोघेच जगत होते. एक मुलगा होता म्हणे त्याला. पण तो नोकरीसाठी म्हणून जिल्ह्याच्या गावी गेला, तो परत आलाच नाही. सुरुवातीला काही काळ अब्दुलने शोध घेतला, पण नंतर त्यानेही नाद सोडून दिला.

    क्रमश:
    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 868
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.