Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार
    ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यAugust 21, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, शर्वायचे आराध्यावर प्रेम, क्षितिज 9 प्रोजेक्ट हायजॅक, प्रोजेक्ट हायजॅकमागे माधव, शर्वायचा विश्वासघात, शहराबाहेरील व्हिला, माधवचा खेळ संपणार
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 39

    आराध्याने खिडकीबाहेर पाहिलं, थोडं पुढं वाकून… “हां… हाच तो व्हिला?” — तिच्या मनात विचार आला. शहराच्या बाहेरून जाताना दिसणारा हा व्हिला… नेहमी प्रश्नच पडायचा — कोण राहत असेल इथे? इतक्या उंचीवर, इतक्या एकांतात?

    आज मात्र तिची कॅब थेट त्या व्हिलाकडे जात होती. क्षणभर तिला असंही वाटलं, की कदाचित चुकून ही वाट निवडली गेली आहे. पण समोरच बसलेला कॅब ड्रायव्हर शांत होता.

    गेटजवळ गाडी येताच सेन्सरवरून ते आपोआप उघडलं. कॅब आत गेली आणि तिच्या छातीत एक अनाम धडधड सुरू झाली.

    व्हिलाच्या दरवाज्यापाशी येताच कॅब थांबली. आराध्या बाहेर उतरली — कदाचित काही बोलण्याच्या आधीच, दार उघडलं गेलं आणि समोर तो उभा होता… शर्वाय. त्याच्या डोळ्यांत आज एक वेगळी शांती होती, पण त्याचबरोबर एक अनाम हूरहूरही.

    “इथे?” ती बोलण्याआधीच त्याने स्मित करत विचारलं,

    “नेहमी लांबून पाहिलास ना हा व्हिला… आज इथे तू आहेस…”

    त्या क्षणी आराध्याला समजून चुकलं — ही जागा म्हणजे फक्त वास्तू नव्हती. ही त्याचं एक  स्वप्न होतं… जिथं तो तिला घेऊन यायचं स्वप्न बघत होता.

    पावसाच्या हलक्या सरी हवेत दरवळत होत्या… आणि या संध्याकाळी, त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय उघडत होता.

    हो… हा व्हिला फक्त एक बांधलेलं घर नव्हतं, तो शर्वायच्या स्वप्नांचा एक जिवंत भाग होता … काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेला… कुणालाही न सांगितलेला… फक्त आपल्या स्वप्नांसाठी उभा केलेला…

    आराध्या दाराशी उभी होती, आणि समोर उभा होता तो — शर्वाय. डोळ्यांत हलकी ओल होती, पण ओठांवर एक नाजूक स्मित!

    “हे घर मी खूप आधी स्वप्नात पाहिलं होतं…” तो हळूच म्हणाला.

    हेही वाचा – ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    “पण तुझ्यासोबतच ते खरं वाटायला लागलं. हे स्वप्नं तुझ्याशिवाय पूर्णच झालं नसतं.”

    ती थोडी पुढे आली. अंगणाच्या ओलसर दगडांवरून हळूच चालत, त्याच्याजवळ…

    “हे इतकं सुंदर कसं शक्य झालं?” तिचा स्वर हलकासा थरथरला.

    “कारण, मी ते तुझ्यासाठी उभं केलं आहे,” शर्वाय शांतपणे म्हणाला.

    “तू कुठेतरी होतीस म्हणूनच माझ्यात ती उर्मी निर्माण झाली आणि हे घर… हे काही भिंतींचं नाही, हे आपल्या दोघांचं एक स्वप्न आहे, जे मी तुला प्रत्यक्षात दाखवू शकलो — तुझा हात हातात घेत.”

    त्याचं हे म्हणणं ऐकून आराध्या स्तब्ध झाली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहात राहिली. त्याच्या बोलण्यात एकही मोठे शब्द नव्हते, पण त्या प्रत्येक शब्दामागे एक जग होतं — प्रेमाचं, समर्पणाचं, न बोललेल्या वचनांचं.

    पाऊस हलकासा पडत राहिला… अंगणात मंद वारा वाहत होता आणि त्या वाऱ्याबरोबर दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या… ती पुढे सरसावली, त्याच्या छातीजवळ थांबली… आणि एका शांत, नाजूक क्षणात — जिथं शब्द थांबले, तिथं त्यांनी एकमेकांना अलगद मिठीत घेतलं…

    त्या मिठीत होता एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद, एक विश्वास – की आता काहीही होवो, आपण सोबत आहोत! आणि एक वचन – की हे घर, हे स्वप्न, आणि हे नातं… आयुष्यभर जपायचं आहे. आजवर कितीदा त्याने हे स्वप्न पाहिलं होतं — पण आज ते श्वास घेऊ लागलं होतं… तिच्या अस्तित्वाने.

    शर्वाय आराध्याला व्हिलामधून फिरवत होता — प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, जणू त्याच्या मनातल्या खोल गुह्य आठवणी उलगडत होता…. संपूर्ण व्हिला हवेशीर होता, मोठमोठ्या खिडक्या, टेराकोटा फरश्या, आणि शांत रंगसंगतीने सजवलेला — शांततेचा आणि निवांतपणाचा एक आत्म्याशी जुळणारा कोपरा…

    तिने सहज विचारलं, “इतकं सुंदर ठिकाण… पण इथे कोणीच कसं दिसत नाही?”

    तेव्हा शर्वाय थांबला. एक क्षण शांत राहिला आणि मग तिच्याकडे पाहत म्हणाला… “हा व्हिला माझं दुसरं जग आहे आराध्या. इथं मी एरवी एकटाच असतो आणि इथे फक्त माझे बाबा दिवाकर, आई आनंदी आणि आजी सुमित्रा — हेच येऊ शकतात… राहतात  सुद्धा मधे मधे.”

    ती थोडी आश्चर्यचकित झाली, “बाकी कोणीच…? नातेवाईक…?”

    शर्वायचा चेहरा थोडा गंभीर झाला… “नाही. बाकी कुणालाही इथे यायची परवानगी नाही. कारण इथं जे काही आहे, ते खूप वैयक्तिक आहे. हे माझं सुरक्षित स्थान आहे… आणि आता… तुझंही.”

    त्याच्या या शब्दांत केवळ घराची सुरक्षा नव्हती — तर त्याच्या मनाच्या बंद दरवाज्यांच्या आतली कबुली होती.

    जणू तो सांगत होता — “हे ठिकाण तुझ्यासारख्याच खास व्यक्तीसाठी आहे.”

    आराध्या शांत झाली. त्या क्षणी तिच्या मनात एक जाणीव ठसली —

    शर्वायच्या आयुष्यात ती आता फक्त एक व्यक्ती म्हणून नाही, तर त्याच्या सुरक्षिततेच्या, विश्वासाच्या, आणि सत्याच्या परिघात स्थान मिळवलेली व्यक्ती होती.

    “म्हणजे हे घर… आता आपलं आहे?” तिच्या तोंडून सहज निघालं.

    शर्वाय हसला. हलक्याच आवाजात म्हणाला,

    “आता हे घर म्हणजे ‘आपलं’ आहे, आराध्या… आणि जे काही माझं आहे, त्यावर आता तुझंही नाव कोरलं गेलंय.”

    त्या क्षणी, त्या व्हिलाच्या भिंतींना एक नवा अर्थ मिळाला होता. त्या घराने आज पहिल्यांदाच कोणाला खरं घरपण दिलं होतं — तिच्या अस्तित्वाने.

    आराध्या एका मोठ्या काचेच्या खिडकीजवळ उभी होती. बाहेर काळोख पसरत चालला होता… हळूहळू क्षितिजावर चांदण्याच अस्तित्व जाणवू लागलं — एक दिवस अस्तंगत होत होता आणि त्या अस्तात ही काही नवं जन्म घेऊ पहात होतं…

    शर्वाय अजूनही तिच्या मागे होता, पण आराध्याच्या चेहऱ्यावर एक गहन विचार दिसत होता. तिच्या मनात काहीतरी हलत होतं… नुसतं सौंदर्य, घर, नातं — इतक्यावरच ती थांबणार नव्हती.

    “शर्वाय…” तिचा आवाज गंभीर होता. शर्वायने तिच्याकडे वळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत पण सावध भाव त्याच्या लक्षात आला.

    “तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती… पण हे सगळं पाहिल्यानंतर क्षणभर मी विसरले, “ती म्हणाली, “प्रोजेक्ट क्षितिज 9” त्याबद्दल मला एक शंका आहे.”

    शर्वायची नजर तीव्र झाली.

    “कसली शंका?”

    ती पुढे आली, एकदम जवळ. आणि अगदी हळू पण ठामपणे म्हणाली —

    “आपल्याकडे इनिशियल ब्रिफिंगमध्ये जी फाइल दाखवली गेली होती आणि नंतर माधवने जी अपडेटेड प्रेझेंटेशन दिले… दोन्हीमध्ये काही डेटा मिसमॅच होता… मी आधी दुर्लक्ष केलं होतं, पण आता जे घडलं त्यानंतर मला नक्की वाटतं — त्या प्रोजेक्टच्या कोअर फाइल्समधून काही गोष्टी मुद्दाम बदलल्या गेल्या आहेत.”

    शर्वायचा चेहरा कठोर झाला. तो एकदम शांत झाला, पण डोळ्यांत एक स्फोटक बेचैनी चमकली होती.

    “तुला खात्री आहे का?” त्याने विचारलं.

    आराध्या थोडं थांबली. मग एका दमात म्हणाली —

    “मी पुन्हा तपासलंय… आणि काही ट्रेस डेटा मागे राहिला होता — तो सहज कोणी लक्षात आणणार नाही. पण मी वेगवेगळ्या डेटाफॉरमॅट्समधून तो पुनः शोधला.”

    “शर्वाय, मला वाटतं माधवने मुद्दाम काही माहिती लीक केलीय. पण अजून पुरावे अपुरे आहेत.”

    शर्वायने ती माहिती ऐकून तिच्याकडे पाहिलं… फार वेगळ्या नजरेनं.

    “तू हे सगळं… एकटीने?”

    ती हसली, पण थोडा ताण त्या हास्यात होता.

    “हो. आपण दोघं जेव्हा एकत्र होतो, ते क्षण खूप मौल्यवान होते. पण माझं लक्ष मागे कुठेतरी लागतच होतं…”

    “कारण हा प्रोजेक्ट फक्त व्यवसायासाठी नाही, हे तुमचं स्वप्न आहे… हे आपलं भविष्य आहे. आपली जबाबदारी आहे.”

    शर्वायचा हात तिच्या खांद्यावर होता आता… त्याचे डोळे तिच्या डोळ्यांत स्थिर…

    “मी तुला अनेक रूपांत पाहिलंय आराध्या — एक सॉफ्ट, भावनिक, हळवी मुलगी… पण आज तू जशी समोर उभी आहेस, ती माझी खरी पार्टनर आहे.”

    तो थोडा थांबला. मग जणू काही मनात ठरवल्यासारखं म्हणाला —

    “माधवचा खेळ संपवायची वेळ आलीय आणि यावेळी आपण दोघं एकत्र त्याच्यासमोर उभं राहणार!”

    त्या क्षणी व्हिलाच्या शांततेत एक निर्धार उमटलेला होता — एक संघर्ष उडण्याच्या आधीची निश्चिंती, आणि दोन मनांची एकवटलेली ताकद उद्दिपीत झाली होती.

    प्रोजेक्ट क्षितिज 9 आता केवळ एक फाइल नव्हती — ती दोघांच्या एकत्र लढाईची सुरुवात ठरली होती. शर्वायला आनंद वाटतं होता, पहिल्यांदा भेटलेली आराध्या  आणि आताची आराध्या वेगळी जाणवत होती.

    हेही वाचा – आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    इथे पहिली आराध्या असती तर, आपल्या नशिबाला कोसत बसली असती, हार मानून घेतली असती. आता मात्र तिला लढताना पाहून त्याला बरं वाटलं.

    ती नुसती लढायला तयार नव्हती तर तिने कल्पकतेने, एकटीने स्वतः पुढे होऊन अगदी बारीकसारीक सगळे तपशील जाणून घेऊन ते जसेच्या तसे शर्वायसमोर मांडले होते.

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    चमचम

    August 21, 2026 ललित

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026 ललित

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चमचम

    By डॉ. विवेक वैद्यAugust 21, 2026

    तर ही गोष्ट मी सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो तेव्हाची. आमच्या फ्लॅटच्या शेजारचे साठेकाका रिटायर होऊन…

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 403
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 543
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 866
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.