नीलिमा विजय खडतकर
कलिंगडाच्या सालीचे डोसे
साहित्य
- मध्यम आकाराच्या कलिंगडाच्या हिरव्या सालीच्या फोडी – 5-6 (लाल गर काढलेल्या)
- भिजवलेले तांदूळ – अर्धा कप
- बारीक रवा – एक कप
- हिरव्या मिरच्या – 3-4
- मीठ – चवीनुसार
- जिरे – एक टी-स्पून
- तेल – एक पळी
कृती
- प्रथम सालींचे बारीक तुकडे करावेत.
- सालींचे हे तुकडे, भिजलेले तांदूळ, जिरे, मिरच्या आणि थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवावे आणि छान पेस्ट करून घ्यावी.
- नंतर त्या पेस्टमध्ये अर्धा कप रवा घालून पंधरा मिनिटे बाजूला ठेवावे.
- पंधरा मिनिटांनंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे. (हवे असेल तर थोडे पाणी घालावे.) हे मिक्ष्रण डोशाच्या बॅटरसारखे पातळ असावे.
- या मिश्रणाचे नेहमीप्रमाणे तव्यावर जाडसर डोसे करावे. हे डोसे छान लुसलुशीत होतात.
- खोबऱ्याच्या चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करावे.
- इतक्या साहित्यात सात-आठ डोसे तयार होतात.
हेही वाचा – Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे
रताळाच्या घाऱ्या
रताळाच्या घाऱ्या करायला सोप्या आणि पौष्टिक आहेत. चवीला छान लागतात. प्रवासात खाण्यासाठी मस्त.
साहित्य
- रताळी – दोन मोठी
- गव्हाचे पीठ – एक कप
- गूळ – अर्धा कप
- साजूक तूप – एक मोठा चमचा
- मीठ – चवीनुसार
कृती
- प्रथम रताळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये चार-पाच शिट्ट्या घेऊन मऊ उकडून घ्यावीत.
- उकडलेली रताळी थंड झाल्यावर यांची साल काढून हाताने कुस्करून घ्यावीत.
- त्यात किसलेला गूळ घालून छान मिसळून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे.
- नतंर त्यात थोडे थोडे गव्हाचे पीठ मिसळून घट्ट गोळा करून घ्यावा.
- त्याचे छोटे गोळे करून पुरीपेक्षा मोठी घारी/ पोळी लाटावी.
- लाटताना गव्हाचे पीठ वापरावे म्हणजे गोळा पोळपाटाला चिटकणार नाही.
- लाटलेली घारी तव्यावर साजूक तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावी.
- अशा प्रकारे सर्व घाऱ्या कराव्यात.
हेही वाचा – Recipe : शेवग्याच्या शेंगांची गोडी आमटी
टीप
- गूळ न घालताही घाऱ्या करू शकतो. छान लागतात.
- उपवासासाठी देखील घाऱ्या करू शकतो. त्यासाठी गव्हाच्या पीठाऐवजी राजगिरा किंवा शिंगाडे पीठ वापरावे.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


