Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!
    फूड काॅर्नर

    शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरOctober 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, Recipe, शारदीय नवरात्र, पेशवाई थाट, सुगंधी केशरी भात, नवरात्र उत्सव, नवरात्रौत्सव, केशरी भाताच इतिहास, पर्शियाचा झर्दा, इराणचा केशरी भात, इराणचा झर्दा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शारदीय नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र, उर्जादायी आणि आनंदाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून (घटस्थापनेपासून) नवमीपर्यंत चालणारा हा नऊ दिवसांचा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून तो सृष्टी, ऊर्जा आणि चैतन्याचा महोत्सव आहे.

    शारदीय नवरात्रीचे महत्त्व खालील प्रमुख पैलूंमधून स्पष्ट होते. हा काळ साक्षात आदिशक्तीच्या नऊ रूपांची (शैलपुत्री ते सिद्धिदात्री) आराधना करण्याचा असतो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा करून जीवनात धैर्य, बुद्धी, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. हे नऊ दिवस म्हणजे असुरी प्रवृत्तीवर दैवी शक्तीचा विजय प्राप्त करण्याचे दिवस! विजयादशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि रामाने रावणाचा संहार केला. या आख्यायिकांवरून या सणांचा उद्देश लक्षात येतो. दसरा आपल्याला संदेश देतो की, कितीही बलवान अंधार असला, तरी सत्याचा आणि दैवी तेजाचा विजय ठरलेला असतो.

    हा निसर्गातील ऋतू बदलाचा काळ आहे. वर्षाऋतू संपून शरद ऋतूच्या आगमनाने निसर्गात नवीन टवटवी येते. नवीन पिके घरात आल्यामुळे शेतकरीवर्ग आणि संपूर्ण समाज निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ऋतू बदलाच्या या काळात हलका आहार, उपवास आणि सात्विक अन्नामुळे शरीराची आंतरिक शुद्धी होते आणि मन शांत राहते म्हणजेच मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारते.

    हेही  वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    नवरात्राच्या घटस्थापने पासून गरबा, दांडिया आणि भक्तीगीतांमुळे नवचैतन्य निर्माण होते. सर्व जाती-धर्म आणि वयोगटातील लोक एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात. त्यामुळे समाजात एकोपा राहुन सामाजिक एकात्मता वाढते. थोडक्यात सांगायचे तर, शारदीय नवरात्री हा बाह्य वाईट प्रवृत्तींचा नाश करून आपल्यामधील आंतरिक शक्ती, संयम आणि चैतन्य जागृत करण्याचा एक सुवर्णकाळ आहे!

    या शारदीय नवरात्रात सर्वांमध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये अतिशय उत्साह आणि सकारात्मकता दिसून येते. उपवासाच्या नवनवीन पदार्थांसह या काळात देवीला जो षडरस पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो, त्यातही मोठी विविधता दिसून येते. गेल्या काही वर्षांत नवरात्रीमध्ये नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचा प्रघात सुरू झाला आहे, त्याचप्रमाणे आहारातसुद्धा नऊ दिवसांच्या नऊ रंगांप्रमाणे पदार्थ समाविष्ट करण्याकडे बायकांचा कल दिसून येतो. यास्तव नवरात्राच्या पहिल्या माळेतील केशरी रंगाला अनुसरूनचं केशरी भाताचा उगम कसा आणि कुठे झाला आणि तो भारतात कसा रुजला, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी या लेखातून केला आहे. सोबतच केशरी भाताच्या रेसिपीची जोड या लेखाला दिली आहे.

    निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे आणि निसर्गाशीच निगडित आपले सर्व सण आहेत. त्याच कारणाने ऋतुचक्रानुसार आपल्या सणावारांमध्ये आपल्या आहारात वेगवेगळे पदार्थ समाविष्ट केले जातात. तसा केशरी भात किंवा नारळी भात राखी पौर्णिमेला खूप लोक करतात, आणि तो पदार्थ एकच आहे, असं काहीजण समजतात. परंतु केशरी भात आणि नारळी भातामध्ये फरक आहे. नारळ भातात घालून केला जातो, तो नारळी भात! केशरी भातात नारळाचा चव वापरत नाहीत; यात शुद्ध केशर दुधात मिसळून ते भातात घातले जाते, ज्यामुळे त्याचा रंग केशरी येतो म्हणून तो केशरी भात!

    राजाश्रयापासून आपल्या घरापर्यंत पोहोचलेल्या या केशरी गोड भाताचा इतिहास तसा फार रंजक आहे. तांत्रिकदृष्ट्या केशरी भाताची मूळ संकल्पना भारतीय नसली, तरी भारतीय आचाऱ्यांनी तिला आपलेसे करून एक अस्सल ‘शाही’ रूप दिले. या पदार्थाचे मूळ पर्शियामध्ये (इराण) आहे. तिथे तांदळात केशर आणि सुकामेवा घालून बनवल्या जाणाऱ्या या पिवळधम्मक गोड भाताला ‘झर्दा’ (Zarda) म्हटले जाई (पर्शियन भाषेत ‘झर्द’ म्हणजे पिवळा).

    तेराव्या ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आशियातून आलेल्या पर्शियन आचाऱ्यांनी हा भात दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या शाही बावर्चीखान्यात आणला. सम्राट अकबराच्या काळातील ‘आइन-इ-अकबरी’मध्ये ‘झर्दा’ आणि ‘मुझाफर’ या नावांनी याच्या पाककृतींची नोंद आढळते.

    मुघल दरबारातून पुढे हा गोड भात अठराव्या शतकात मराठेशाहीत आणि पेशव्यांच्या शाही पंगतींमध्ये रुजला. महाराष्ट्रात आल्यावर यात आपल्या मातीतील सुवासिक आंबेमोहर तांदूळ, अस्सल साजूक तूप आणि जायफळ-वेलचीची सुगंधी जोड पडली आणि तो आपला ‘केशरी भात’ बनला!

    “वदनी कवळ घेता नाम घेता हरीचे…” या श्लोकाचा शांत वातावरणातील घोष, पेशवेकालीन शनिवारवाडा, गंगाळातले सुगंधी पाणी आणि चांदीच्या ताटाभोवती मांडलेली आरास! असा पेशवाई पंगतीचा नजारा जरा डोळ्यासमोर उभा करून पाहा… काय थाट असेल तेव्हा अशा पंगतींचा आणि खानपानाचा!!

    शनिवारवाड्यावर एखाद्या मोठ्या उत्सवाच्या प्रसंगी जेव्हा शाही पंगत बसत असे, तेव्हा त्याचे नियम आणि शिस्त अत्यंत कडक असायची. पंगतीसाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्या-पितळाच्या डेगांना आणि ताटांना खास कलईगरांकडून नवसागराची पांढरीशुभ्र कलई करून घेतली जाई. नाना फडणवीसांच्या शिरस्त्यानुसार ताटाची डावी बाजू चटण्या-लोणच्यांसाठी आणि उजवी बाजू रस्से, भाज्या, आमट्यांसाठी ठरलेली असे. ताटाच्या अगदी मध्यभागी पांढऱ्याशुभ्र आंबेमोहर तांदळाची मूद आणि त्याच्या शेजारी साजूक तुपाची संततधार धरत, वाढप्यांनी हातातील पितळी झाऱ्याने हा सुगंधी ‘केशरी भात’ वाढणे म्हणजे पंगतीचा सर्वोच्च मान मानला जाई! हे सर्व वर्णन वाचून केशरी भात करून तो खाण्याची इच्छा तर सहाजिकच होणार, नाही का? त्याकरताच मी येथे केशरी भाताची रेसीपी दिली आहे.

    साहित्य

    • सुवासिक तांदूळ : एक कप (आंबेमोहर किंवा बासमती)
    • साखर : पाव कप
    • साजूक तूप : 3 ते 4 मोठे चमचे
    • केशर : 15-20 काड्या (2 चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
    • वेलची आणि जायफळ पूड : एक छोटा चमचा
    • सुकामेवा : काजू, बदाम काप आणि मनुके (आवडीनुसार)
    • खडे मसाले : 2 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 1 छोटा दालचिनीचा तुकडा
    • पाणी : दोन कप

    कृती

    1. तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा, जेणेकरून भाताचा प्रत्येक कण मोकळा होईल.
    2. जाड बुडाच्या पातेल्यात तुपात काजू, बदाम आणि मनुके हलके सोनेरी तळून बाजूला काढा. त्याच तुपात खडे मसाले (लवंग, वेलची, दालचिनी) परता.
    3. भिजवलेला तांदूळ तुपात एक मिनिट परतून घ्या. त्यात दोन कप गरम पाणी घालून, झाकण ठेवून भात 75% शिजवून घ्या. म्हणजे भात बोटचेपा होता कामा नये. त्या आधीच त्यात साखर टाकायची असते.
    4. भात 75% शिजल्यावर त्यात साखर, दुधात भिजवलेले केशर, वेलची-जायफळ पूड आणि तळलेला सुकामेवा हलक्या हाताने मिक्स करा.
    5. वरून दोन चमचे साजूक तूप सोडा. पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे वाफ येऊ द्या. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटे झाकण तसेच ठेवा.
    6. केशराचा घमघमाट सुटलेला हा सात्विक आणि शाही केशरी भात खाताना वर सांगितलेली शाही पंगत आठवून जणू काही इतिहासातील एखाद्या सुवर्णपानातलाच घास घेतल्याचा आनंद मिळतो!

    हेही वाचा – साजूक तुपाची धार आणि इतिहासाची फोडणी… आजचा बेत दाल-बाटीचा!

    टीप

    • साखर आधीच घातल्यास तांदूळ कडक होतो आणि शिजत नाही, म्हणून भात आधी अर्धवट शिजवून घेऊन मगच साखर घालावी.

    केशरी भात जगदंबेच्या नैवेद्याला समर्पित करते…

    अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो

    प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करूनी हो

    उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

    उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो

    उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    By माधवी जोशी माहुलकरOctober 9, 2026

    मला बाय रोड प्रवास करायला खूप आवडतं! कारने प्रवास करताना एखाद्या ढाब्यावर जेवण करणे म्हणजे…

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026

    शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!

    October 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुणवृद्धिनिरूपण, तीं श्लोकीं सांगितलें जाण

    October 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑक्टोबर 2026

    October 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 467
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 626
    • फिल्मी 72
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 31
    • ललित 987
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.