Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण
    ललित

    कवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 28, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, एखाद्याचे नशीब, कवितेचे रसग्रहण,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संगीता भिडे (कमल महाबळ)

    काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी

    काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी

    काही जाऊनि बैसती प्रभुपदी, पापापदा वारी ते

    एखादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते।

    कोणी पर्वत आपुल्या शिरी धरी हेमप्रभा शीतला

    कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला

    कोणाला वनदेवता वरितसे मोहात जी नाहते

    एखाद्यामधुनि परंतु जळती ज्वाला नदी वाहते ।

    झाडे जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती

    स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती

    सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते

    एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते!

    चाले खेळ असा जगात, बहुदा सौख्यात सारे जरी

    एखादा पडतो तसाच चुकुनी, दुःखार्णवी यापरी

    पाही कोण अशा हताश ह्रदया, जो तो असे आपला

    देवा, तू तरी टाकी अश्रू वरूनी, त्यासाठी तो तापला

    – कवी गोविंदाग्रज

    रसग्रहण

    कवी गोविंदाग्रज म्हणजेच प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांची ‘एखाद्याचे नशीब’ ही कविता वाचल्यावर सर्वप्रथम जाणवते ते, आयुष्याचे अत्यंत प्रमुख सूत्र… हे सूत्र म्हणजे प्रत्येक जण आपले नशीब सोबत घेऊनच जगत असतो. परंतु जो दुःखसागरात डुंबलेला असतो, त्याच्यासाठी दोन अश्रू ढाळायलाही कोणाला सवड नसते.

    ही कविता वाचल्यावर अजून एका कवितेची आठवण होते, ती म्हणजे ‘दोन फुलांची कथा’ ही. याही कवितेत एकाच वेलीवरची दोन फुले कशी वेगळे नशीब घेऊन जगतात याचे वर्णन केले आहे. एक फूल देवाच्या मस्तकी विराजमान होते तर, दुसरे प्रेतावर चढते. हाच भाव उपरोक्त कवितेतही आढळतो.

    हेही वाचा – पोटभर आशीर्वाद

    पहिल्याच कडव्यात गोविंदाग्रज म्हणतात, काही फुले स्वर्गातील देवतांच्या शिरी विराजमान होतात, तर काही रसिक आपल्या हृदय मंदिरात या फुलांना धारण करतात. जो परमेश्वरप्रभू पापक्षालन करतो, अशा प्रभूच्या पायाशी काही फुलांना स्थान मिळते. एखाद्या फुलाचे नशीब मात्र असे दुर्दैवी की, ते बिचारे प्रेताला शृंगारण्यातच खर्ची होते.

    प्रत्येक पर्वताचे नशीब सुद्धा वेगळे. एखादा पर्वत आपल्या मस्तकावर शीतल अशा हिमाचे, बर्फाचे तेज धारण करतो तर, एखाद्याच्या पोटातून निर्मळ अशा मोठमोठ्या नद्या वाहतात. एखादी वनदेवता आनंदाने न्हाऊन निघते आणि त्या पर्वतालाच वरते. पण एखादा पर्वत असा की, त्याच्या उदरातून इतरांना जाळत जाणारी ज्वालानदी वाहते.

    झाडे आपले दोन हात (म्हणजे जणू काही दोन पाने) जोडून मेघाला प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेचे फळ म्हणजे पानापानांवर स्वच्छंदपणे जलबिंदू नाचू लागतात. झाडांना नवीन पालवी फुटते. फुले त्यावर विलसू लागतात. झाडे पूर्णत: शोभायमान होतात. पण एखाद्या झाडाचे नशीब असे की, पाणी बरसणारा मेघ त्यावर वीज टाकून मोकळा होतो आणि ते झाड अंतरबाह्य जाळून पिळून निघते. सारे होत्याचे नव्हते होते.

    असा हा एकूण सुखदु:खाचा खेळ या जगात अव्याहतपणे चालताना दिसतो. वरवर सारेच सुखात आहेत, असे भासते; पण एखाद्याचे नशीब असे की, तो अंतरबाह्य दुःखसागरात बुडलेला असतो. या जगात प्रत्येकजण एवढा आत्ममग्न असतो की, या हताश ह्रदयाकडे बघायला, त्याला धीर द्यायला, त्याचे सांत्वन करायलाही त्याच्याकडे सबड असत नाही.

    अशी ही जगरहाटी पाहिल्यावर कवी देवाला प्रार्थना करतो की, ज्याने या संसारात अनंत ताप साहिले आहेत, त्याच्यासाठी तरी तू अश्रू ढाळ.

    प्रस्तुत कवितेशी थोडे फार साधर्म्य साधणारी कवी गोविंदाग्रज यांची आणखी एक कविता आहे. त्यातील आठवतात तेवढ्या पंक्ती पुढे देते –

    यावज्जीवही काय मी न कळले आप्तांप्रति नीटसे!

    मित्रांतेही कळे न गुढ, न कळे, माझे मलाही तसे

    अज्ञाता! मरणोत्तर प्रकट ते होईल तूते कसे!

    कोठे आणि कधी तरी जगती मी होऊन गेलो असे ।।

    परीक्षणार्थ दिलेली कविता कवीने शार्दूलविक्रिडित या वृत्तात. बांधली आहे. वरवर पाहता हे वृत्त फार सोपे वाटते, कारण मंगलाष्टकांना हेच वृत्त वापरले जाते (दुर्दैवाने त्यात शब्दांची वाट्टेल तशी ओढाताण होते!)

    या कवितेत मात्र गण आणि मात्रा यांची लय अत्यंत उत्तमरित्या साधली आहे. कोणत्याही शब्दाची ओढाताण करावी लागत नाही, त्यामुळेच या कवितेला उत्तम नाट्यमाधुर्यही लाभले आहे.

    हेही वाचा – अनोखा बंधूभाव

    थोडक्यात प्रत्येकाचे जगणे ‘असणे आणि नसणे’ या दोन बिंदूतून कसे जात असते याचे उत्कृष्ट वर्णन कोठेही शब्दबंबाळ न होता वर्णिले तर आहेच, पण कवितेच्या शेवटच्या पंक्तित उत्कर्षबिंदू साधला आहे, जो तुमच्या आमच्या हृदयाला जाऊन भिडतो आणि प्रत्येकालाच अंतर्मुख करतो आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यास प्रवृत्त करतो.

    इति अलम् !


    (साधारण 1997 साली ‘नौपाडा हिंदू भगिनी मंडळ मंडळ’ ठाणे या संस्थेतर्फे आयत्या वेळी ‘काव्यरसग्रहण’ स्पर्धा घेण्यात आली आणि या रसग्रहणास प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Most Popular

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.